कधी कधी मिपासाठी काम करताना "याच साठी केला होता अट्टाहास" असं वाटतं. मार्टिनशी ओळख ही त्याच प्रवासाची सुरूवात. मार्टीन हा आपल्या कौशिक लेलेंचा शिष्य. वेल्लाने त्याचा युट्युबवर एक व्हिडीओ पाहुन आपल्या अंकासाठी काही बोलण्याची गळ घातली. तो सुद्धा उत्साही माणूस निघाला आणि त्याने लगेच होकारही दिला. होकार तर दिला पण पहिले आठ पंधरा दिवस काहीच हालचाल नाही. आम्ही आपले मध्येच त्याला हलवून यायचो. देतोय देतोय.. काही तरी काम करतोय.. असं म्हणत म्हणत अंक आठवड्यावर आला. अजून काहीच हाती आले नव्हते.
अखेर एक दिवस महाशय म्हणाले की आपण स्काईप करुया का? आम्ही तर एका पायावर तयार होतोच! स्काईपवर पहिला बॉम्ब फुटला जेव्हा मार्टीन म्हणे मी चाललोय परवा विपश्यनेसाठी पोलंडला! मला खरं तर तुम्हाला सरप्राईज द्यायचंय म्हणे. पण आता वेळ नाही पुरत तर सांगावच लागेल. म्हणलं भाऊ, आक्खं मिसळपाव.कॉम आहे सरप्राईज व्हायला, तू आम्हाला तर दे ना फाईल! म्हणला माझं एक आवडतं मराठी गाणं आहे, त्याच्या बीट्स वर सगळं बसवताना माझा वेळ गेलाय. तरी मी जाईपर्यंत हे काम करणारच. अत्यंत जड मनानी फार तर स्क्रिन प्ले देतो म्हणाला. त्याचं सरप्राईज हजारो लोकांपैकी २ लोकांसमोर फुटलं ह्याचं काय ते अतोनात दु:ख!
आणि महाराज, तो स्क्रिन प्ले पाहिला तोच क्षण जेव्हा वाटलं याच साठी केला होता अट्टाहास!


वाचने
9394
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच जमलयं.. मार्टीन च विशेष
खूपच छान , मजेशीर आणि
अप्रतिम...
सुंदर
अतिशय
भारी व्हिडीओ.. लै लै आभार्स..
भन्नाट, मार्टिनभाऊ!!
भन्नाट, मार्टिनभाऊ!!
पिरा छान झाली आहे मुलाखत.
मार्टीन भावा तोडलंस बाबा. एक
तुमच्या मैत्रिणीला माझ्या मराठी शिकवणाऱ्या ब्लॉगची ओळख करून द्या
In reply to मार्टीन भावा तोडलंस बाबा. एक by पाषाणभेद
छान.
या चित्रफितीत तो छान बोलला
हा विडीओ पण मस्त..
In reply to या चित्रफितीत तो छान बोलला by कौशिक लेले
वा
एकच नंबर!
प्रत्येकवेळी प्रतिसाद देताना
मस्त जमलयं ...
क्या बात है मार्टीनभाऊ. मस्तच
मस्त झालाय व्हिडिओ!
छान.
सलाम मार्टिन भाऊंना !