१. श्री. राजेश परांजपे - शास्त्रीय गायन राग :- बिलासखानी तोडी रचना आणि संगीत :- राजेश परांजपे श्री. राजेश परांजपे हे उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले एक नामवंत गायक. आपले वडील श्री. विनायक परांजपे ह्यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी डॉ. राम देशपांडे ह्यांच्याकडून ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा घराण्यांच्या संगीताचे शिक्षण घेतले. स्वतः इलेक्ट्रिकल इंजीनिअर असूनही त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीतालाच वाहून घेण्याचे ठरवले. ते गंधर्व महाविद्यालयाचे संगीत विशारद आहेत. आपल्या गुरूंसोबत त्यांनी संपूर्ण भारतभर गायनाचे कार्यक्रम केले आहेत. न्यू यॉर्क येथील भारतीय वकिलातीत त्यांच्या गायनाचा कार्यक्रम झालेला आहे. मिसळपावच्या विनंतीला मान देऊन त्यांनी खास आपल्यासाठी ह्या रचनेची निर्मिती केली आहे. ह्या गाण्याचे बोल आणि संगीत, दोन्ही राजेश ह्यांचेच आहे.

वाचने
7279
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
तृप्त झाले कान ! एकसे एक
'श्रीरंगा कमलाकांता..' आणि
धन्यवाद
In reply to 'श्रीरंगा कमलाकांता..' आणि by यशोधरा
सुंदर..!!!!
प्रसन्न, सुरीली दिवाळी पहाट.
सुंदर. श्रीरंगा कमला... मस्त
धन्यवाद
In reply to सुंदर. श्रीरंगा कमला... मस्त by पाषाणभेद
मस्त झालीये दिवाळी पहाट!
सर्व सादरीकरणे आवडली .
झक्कासच!