
मिपाकरहो, नमस्कार!
आपल्या मिपाचा २०१७ दिवाळी अंक घेऊन आज आपल्यासमोर येत आहोत.
सभोवताली माहितीचा आणि संपर्काचा विस्फोट होत असताना मिपासारख्या संस्थळांचं नक्की स्थान काय आहे, असा प्रश्न हल्ली वारंवार मनात येत असतो. मिपावर सकस लेखन तर वाचायला मिळतंच, आणि इच्छा असेल तर मिपाचा उपयोग समाजमाध्यमासारखाही (सोशल नेटवर्कसारखाही) करता येतो. मिपाचं समाजमाध्यम-रूप आणि फेसबुक, ट्विटरसारखी अन्य समाजमाध्यमं पाहिली, तर अलीकडे प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे जनमताचं सातत्याने होत असलेलं ध्रुवीकरण (पोलरायझेशन). प्रत्येकाला एकाच वेळी अनेक अस्मिता असतात, आणि प्रसंगी त्या परस्परविरोधीही असू शकतात. त्यातलीच एक अस्मिता सामान्य, उत्सवप्रेमी माणसाची. याच सामान्य, उत्सवप्रेमी वाचकासाठी मिपाचा हा दिवाळी अंक घेऊन आलो आहोत.
आज पदार्थविज्ञानाला / पुंजभौतिकीला मान्य सिद्धांतांप्रमाणे काळ सलग असतो. पण भावनिक पातळीवर आपल्या आयुष्याच्या प्रवाहाकडे पाहता 'सुखाचे क्षण' आणि 'दु:खाचे क्षण' अशी सरळसोट विभागणी जाणवते. सणवार, उत्सव हे संस्कृतीने दिलेले सुख साजरं करायचे क्षण आहेत. अशा प्रसंगी येत असलेल्या उत्सवी दिवाळी अंकाचा आस्वाद अभिनिवेशाच्या टोप्या आणि भूमिकांची कवचकुंडलं उतरवून घेतला, तर ते योग्य ठरेल.
***
दिवाळी अंकातून दर वर्षी काहीतरी नवं द्यायचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी अंकात विशेष विभाग आहे - व्यक्तिचित्रांचा. मराठी साहित्यात व्यक्तिचित्रांचं दालन खूप समृद्ध आहे. मिपाकर लेखकांनीही आपल्याला प्रत्यक्ष (किंवा कल्पनेत) भेटलेल्या व्यक्तींबाबत लिहावं, या हेतूने हा विशेष विभाग दिवाळी अंकात समाविष्ट केला आहे. या विभागाला भरभरून प्रतिसाद मिळाला. मुख्य म्हणजे हा प्रतिसाद हा इतर
लेखनाऐवजी न येता इतर
लेखनाबरोबर आला आहे. यामुळे अंकाचं स्वरूप हे सर्वसमावेशक झालं आहे. भरल्या ताटात पक्वान्न उठून दिसावं, तसंच बाकी सगळेच पदार्थ निगुतीने शिजवलेले, चविष्ट असावेत असं काहीसं चित्र तुम्हाला दिसेल.
गतवर्षी 'गोष्ट तशी छोटी' या मिपाच्या दृक-श्राव्य उपक्रमानेही पदार्पणातच देदीप्यमान यश मिळवलं. यामुळेच, यंदाच्या दिवाळी अंकात 'गोष्ट तशी छोटी'ची टीम दृक-श्राव्य विभाग घेऊन आली आहे. या विभागाचं वैशिष्ट्य म्हणजे मिपावरच्या काही अक्षर वाङ्मयाचं अभिवाचन यात ऐकायला मिळेल. ('मोकलाया' त्यात नाही. कल्जी क्रू नये.) या दृक-श्राव्य विभागाला भरघोस प्रतिसाद मिळो आणि हा विभाग मिपाच्या दिवाळी (आणि अन्य) अंकांचा कायमचा भाग होवो, अशी शुभेच्छा इथे व्यक्त करतो.
व्यक्तिचित्रांची आणि अन्य लेखनाची संख्या आणि नवा गडी असलेला दृक-श्राव्य विभाग धरून दिवाळी अंक नेहमीपेक्षा आकाराने मोठा झाला आहे. मिपाचे वाचक कितीही विचक्षण असले, तरी जवळजवळ सत्तरेक धागे अचानक एके दिवशी अंगावर सोडणं योग्य वाटलं नाही. या पद्धतीमुळे चांगल्या लेखनालाही प्रसंगी कमी प्रतिसाद मिळतात, हेही निरीक्षण होतंच. त्यामुळे यंदा मिपाचा दिवाळी अंक दिवाळीच्या पाच दिवसांत टप्प्याटप्प्याने प्रकाशित होईल. संपूर्ण अंक एकदम वाचायची इच्छा असणार्यांसाठी पाच दिवसांनंतर पीडीएफ प्रकाशित करूच.
***
आमच्या गावाकडे शेतीच्या कामासाठी किंवा गावातल्या एखाद्या लग्नकार्यासाठी 'इर्जिक' घालतात. गावात सगळ्यांकडे सगळं नसतं. नांगर असेल, पण बैल एकच असेल. किंवा खुरपी पुरेशी नसतील. लग्नकार्यात तर वस्तू आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागतं. तर गाव एकत्र येतं, आणि लोकसहभागातून कार्य पार पडतं. कार्य संपल्यावर, मांडवपरतणीच्या वेळी, यजमान सगळ्यांना जेवू घालतो. लग्नातल्या पक्वान्नांच्या तुलनेत जेवण साधंसंच असतं, पण यजमानाने आपल्या सहकार्यांप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता असते.
असंच हे दिवाळी अंकाचं इर्जिक घालतो आहे. इतक्या लोकांचे हात या कार्याला लागले आहेत की या अंकावर संपादक म्हणून केवळ माझं नाव लागावं याने चांगलंच कानकोंडं वाटतं आहे. सगळ्यांनी आपुलकीने घेतलेल्या कष्टांची परतफेड आभारप्रदर्शनाचे निव्वळ औपचारिक, कोरडे शब्द लिहून होणार नाही. इर्जिकात असलेल्या स्निग्ध कृतज्ञतेचे भाव माझ्या मनी आहेत.
या सगळ्यांची नावं खाली (अकारविल्हे):
- अभ्या..
- आनंदयात्री
- एस
- किसन शिंदे
- जव्हेरगंज
- डॉ सुहास म्हात्रे
- नीलकांत
- नीलमोहर
- पद्मावति
- पिलीयन रायडर
- पैलवान
- पैसा
- प्रचेतस
- प्रशांत
- प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
- मूनशाईन
- यशोधरा
- वेल्लाभट
- श्रीरंग_जोशी
- सुधांशुनूलकर
- स्नेहांकिता
- स्रुजा
लिहिणारे हात नसते, तर या सुसज्ज टीमचा काहीच उपयोग नव्हता. अंकासाठी आवर्जून लेखन पाठवणार्यांचे, दृक-श्राव्य विभागात योगदान देणार्यांचे आभार.
...आणि वाचकहो, तुम्ही नसतात, तर या खटाटोपालाच काही अर्थ उरला नसता. त्यामुळे तुमचे सर्वात जास्त आभार, आणि आम्हां सर्वांकडून दिवाळीच्या शुभेच्छा!

शुभ दीपावली...
अंक वाचते!
सुंदर दिसतो आहे दिवाळी अंक.
प्रस्तावना आवडली.
शुभेच्छा आणि आभार!!
प्रस्तावना आवडली.
प्रस्तावना आवडली.
मस्त
In reply to मस्त by नंदन
नंदनच्या वरील प्रतिसादाला
प्रस्तावना आवडली आहे.
आबा छान लिहले
वर वरुण म्हणतोय तसं मोजक्या
In reply to वर वरुण म्हणतोय तसं मोजक्या by सूड
त्या प्रतिमेच्या वरती
एक सम्यक आणि परिपक्व
छान!
वा!
शुभेच्छा
संपादकिय अतिशय आवडले..
आमच्या गावाकडे शेतीच्या
In reply to आमच्या गावाकडे शेतीच्या by सुबक ठेंगणी
+१ खुपच मस्त वाटतोय अंक
चिमणला मिस्स केले
छान ....
एक ताजा कलम / निरीक्षण :
अंक छान दिसतोय!
आटोपशीर
प्रांजळ इर्जिक खूप आवडलं.
फार सुरेख
दिवाळी अंक-
उत्तम संपादकीय. सहज सुंदर आणि
संपादकीय मनाला भावल. इर्जिक
संपादकीय लेख उत्तम .
सुरेख इर्जिक घातलंय.
छान.
मिपाकरांनी मिपाकरांसाठी
अंकाच्या कामामधे सहभागी
सुंदर संपादकीय
वाचायला अंमळ उशीर झालाय. पण
दिवाळी अंक आवडला