✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Making of photo and status : २. जावळ.

स
सचिन काळे यांनी
Sun, 10/15/2017 - 08:30  ·  लेख
लेख
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 छायाचीत्राचा खालचा भाग पहा बरं ! काय दिसतंय ? काळ्या कातळावर केसासारखं काहीतरी दिसतंय ना ? फसलात ! ते आहे हत्तीच्या टाळक्यावर उगवलेलं जावळ ! Making of photo and status : हा! हा!! हा!!! आहे की नाही सगळीच गंमत. आपलं डोकं कितीही लढवलं तरी ह्या फोटोवरून कोणाच्याही लक्षात येणार नाही की हा कसला फोटो आहे. मी केरळला गेलो असता तिथे हत्तीची राईड केली होती. आम्ही हत्तीच्या पाठीवर बसलो होतो, तर समोरच हत्तीचं भलं मोठं डोकं डुगुडुगू डुगुडुगू हलताना दिसत होतं. आणि त्याच्या डोक्यावर जावळासारखे दिसणारे काळेभोर विरळ केससुद्धा! It was so cute looking!! मी पट्कन हत्तीच्या डोक्याचा आणि त्याच्या केसांचा फोटो काढून घेतला. काय सुंदर दिसत होते ते केस!! एकेका केसांमध्ये चांगलं अर्ध्या सेंटिमीटरचं अंतर! आणि उंचीने भरपूर वाढलेले! खरं सांगू! मला त्या केसांवरून हात फिरवावासा वाटत होता. पण माझी हिंमतच झाली नाही. न जाणो त्याला ते आवडलं नाही तर!!? माझंच जावळ धरून उपटायचा. हा! हा! हा! पण काहो!? जशी सिंहाची आयाळ असते तसे हत्तीच्या डोक्यावरचे केस हे त्यांच्यात सौन्दर्याचे लक्षण मानले जाते का? Hmmm! कोणाला तरी विचारायला पाहिजे. हत्तीच्या राईडची एक गंमत सांगतो. हत्तीची राईड ही घोड्याच्या राईडसारखी उडी मारून टांग टाकून बसायची नसते काही!! हत्ती पार्किंग करण्याच्या जागी एका बाजूला कायमस्वरूपी एक उंच मचाण बांधलेलं असतं. त्याला टेकूनच हत्तीला उभं करतात. आपण शिडीने मचाणावर चढायचं आणि डायरेक्ट हत्तीच्या पाठीवर बसायचं. पण मांडी ठोकून नाही. हत्तीच्या पाठीवर रेक्झिनची जाड गादी टाकलेली असते. आपण एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे टाकून बसायचे असते. ते बसणेपण सुखाचं नसतं हो! हत्ती काही घोड्यासारखा बारीक नसतो. हत्तीची ही मोठ्ठी पाठ आणि हे मोठ्ठं पोट. आपला एक पाय डावीकडे आणि दुसरा पाय उजवीकडे असा १८० कोनात ताणले जातात. थोड्यावेळाने आपल्या पायाच्या दोन्ही जांघेत जोराची कळ मारायला लागते. अर्ध्यातासाने जेव्हा आपली राईड संपल्यावर आपण हत्तीवरून खाली उतरतो ना, तेव्हा कितीतरी वेळ आपण फेंगडेच चालत असतो. हा! हा!! हा!! मग बघणार ना कधीतरी हत्तीची राईड करून!!!? --- सचिन काळे. माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
4451 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

@ आवडाबाई, मी तुमची मार्क

सचिन काळे
Sun, 10/15/2017 - 22:17 नवीन
@ आवडाबाई, मी तुमची मार्क देण्याची वाट पाहतोय. ह्यावेळी मेकिंगचेही मार्क द्या, बरं का!!! :वाट पाहणारी बाहुली:
  • Log in or register to post comments

नाही जमलं!!

बाजीप्रभू
Mon, 10/16/2017 - 10:14 नवीन
खरं सांगू का "जावळ" शब्द शिर्षकात देऊन तुम्ही चूक केलीत. अगदी उडतं उडतं पाहूनही हत्तीचं डोकं आहे हे कळत.
  • Log in or register to post comments

हो!

सचिन काळे
Mon, 10/16/2017 - 10:38 नवीन
@ बाजीप्रभू, खरं सांगू का "जावळ" शब्द शिर्षकात देऊन तुम्ही चूक केलीत. अगदी उडतं उडतं पाहूनही हत्तीचं डोकं आहे हे कळत. >>> हो!मला बऱ्याच जणांनी अगदी हाच प्रतिसाद दिलाय. मला वाटलं होतं कोणाला कळणार नाही, काय आहे ते! पण उघड गुपित निघाले. :खोखो: बरं! Making आवडलं का ते सांगा की!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

मला तो फोटो रेड्यावर उलटा

आनन्दा
Mon, 10/16/2017 - 18:46 नवीन
मला तो फोटो रेड्यावर उलटा बसून काढलाय असे वाटले होते.. आम्हाला कसला मिळतोय हत्ती बघायला? सगळे रेडेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

हा! हा! हा!

सचिन काळे
Mon, 10/16/2017 - 19:45 नवीन
@ आनन्दा, मला तो फोटो रेड्यावर उलटा बसून काढलाय असे वाटले होते.. >>> चला! मला एकजण तर असा भेटला, ज्याने फोटोतल्या हत्तीला ओळखले नाही. हा! हा! हा!! मी आणि माझं making भरून पावले. मी तृप्त झालो. :डोळा मारा:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

@ सतिशजी गावडे, राग सोडा! मी

सचिन काळे
Mon, 10/16/2017 - 11:37 नवीन
@ सतिशजी गावडे, राग सोडा! मी तुमच्याही प्रतिक्रियेची वाट पहातोय.
  • Log in or register to post comments

खरचं सांगतो...........

दीपक११७७
Mon, 10/16/2017 - 15:30 नवीन
हत्तीच आहे हे पटकन ओळखता येते!
  • Log in or register to post comments

आयडिया अच्छा है .

सिरुसेरि
Mon, 10/16/2017 - 15:50 नवीन
what an idea .
  • Log in or register to post comments

@ दीपक, हत्तीच आहे हे पटकन

सचिन काळे
Mon, 10/16/2017 - 16:17 नवीन
@ दीपक, हत्तीच आहे हे पटकन ओळखता येते! >>> हो ना!!! माझा अंदाज चुकला खरा. :स्मित: @ सिरूसेरी, what an idea . >>> आपले आभार! पण मला 'आपकी अदालत'मध्ये उभे राहिल्यासारखे वाटतेय. :खोखो:
  • Log in or register to post comments

छान ....

संग्राम
Mon, 10/16/2017 - 17:08 नवीन
फोटो बघुन लगेच ओळखल की हत्ती आहे ते ... :-) .... बाकी, एका आठवड्यात २ वेळा प्रकाशित करता येईल ...
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सचिन काळे
Mon, 10/16/2017 - 18:00 नवीन
@ संग्राम, प्रतिक्रियेकरिता धन्यवाद!! बाकी, एका आठवड्यात २ वेळा प्रकाशित करता येईल ... >>> मला धक्क्यातून सावरायला आठवडा कमी पडतो हो!! :खोखो: तसं पाहिलं तर मी पाच दिवसांत पाच अगोदरच लिहून ठेवलेत. :स्मित: बादवे, मिपावर पूर्वी स्मायली टाकता येत होत्या. आता ती सोय बंद झालीय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संग्राम

मला तो हत्ती आहे इतकं लक्षात

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/16/2017 - 19:49 नवीन
मला तो हत्ती आहे इतकं लक्षात आलं होतं. फक्त त्या डोक्याच्या भागाला मी मागचा भाग समजलो होतो.
  • Log in or register to post comments

हा! हा! हा!

सचिन काळे
Mon, 10/16/2017 - 20:55 नवीन
@ अमरेंद्र बाहुबली, फक्त त्या डोक्याच्या भागाला मी मागचा भाग समजलो होतो. >>> हा! हा! हा! झक्कास!! Making जमलंय का? हेही सांगा ना, अमरेंद्रजी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जमतय जमतय! उपक्रम चांगलाय पण

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/16/2017 - 23:19 नवीन
जमतय जमतय! उपक्रम चांगलाय पण एका वेळेस एका ऐवजी 4/5 फोटो टाका. लेख झक्कास होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन काळे

धन्यवाद!

सचिन काळे
Tue, 10/17/2017 - 07:18 नवीन
@ अमरेंद्रजी, एका वेळेस एका ऐवजी 4/5 फोटो टाका. लेख झक्कास होईल. >>> आपल्या सुचनेकरिता आभार. एक फोटो, त्याला साजेसं असं एक स्टेटस आणि त्यादोघांशी संबंधित Making of photo and status, असा तिघांचा मिळून एक सुंदर गुलदस्ता वाचकांना सादर करणे अशी या मालिकेची संकल्पना आहे. त्यामुळे एका लेखात एकापेक्षा अधिक फोटो एका लेखात देऊ शकत नाही. कारण प्रत्येक फोटोची status आणि making वेगळी लिहून होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कमीतकमी 2 फोटो आणी त्याचं

अमरेंद्र बाहुबली
Tue, 10/17/2017 - 13:27 नवीन
कमीतकमी 2 फोटो आणी त्याचं स्टेटस टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन काळे

@ अमरेंद्रजी, आपली माझ्या

सचिन काळे
Tue, 10/17/2017 - 16:10 नवीन
@ अमरेंद्रजी, आपली माझ्या मालिकेबाबत एवढी उत्सुकता पाहून मला खरोखरच आनंद होत आहे. मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे आठवड्याला दोन गुणवत्ता सांभाळून 'मेकिंग' लिहिणे अत्यंत कार्यबहुल्यामुळे सध्यातरी मला शक्य होईलसे वाटत नाही. माफी असावी. तरी मध्ये कधी जमलेच तर आपल्या सूचनेचा नक्कीच विचार करेन. पुन्हा एकदा आपले आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

स्टेटस

कपिलमुनी
Wed, 10/18/2017 - 16:42 नवीन
Image removed. या फोटोवर तुम्ही स्टेटस लिहाच अशी आग्रहाची ईनंती आहे
  • Log in or register to post comments

@ कपिलमुनी, तुम्ही दिलेल्या

सचिन काळे
Wed, 10/18/2017 - 18:02 नवीन
@ कपिलमुनी, तुम्ही दिलेल्या फोटोवर स्टेटस लिहिणे खरंच मला जमत नाहीए हो!! मला माफी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बादवे कपिलमुनीजी, माझ्या

सचिन काळे
Wed, 10/18/2017 - 18:35 नवीन
बादवे कपिलमुनीजी, माझ्या लहानपणी माझ्या वयाच्या दहा ते पंचवीस वर्षांपर्यंत 'कपिल मल्होत्रा' नावाचा माझा एक पंजाबी जिवलग मित्र होता. गेल्या तीस वर्षांत आमची भेट झालेली नाही. की त्याचा पत्ताही मला माहित नाही. तुमचे नांव वाचले आणि मला माझ्या मित्राच्या भेटीचा आनंद झाला. डोळे पाणावले. आपले फार फार आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन काळे

पुढील भाग उद्या रविवारी

सचिन काळे
Sat, 10/21/2017 - 19:58 नवीन
पुढील भाग उद्या रविवारी दुपारी १ वाजता टाकतोय. आपणां सर्वांस आग्रहाचे निमंत्रण आहे. पाहण्या आणि वाचण्यासाठी नक्की या. आणि आपली प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका बरं का!!! :स्मित:
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा