Skip to main content

ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...

लेखक मार्मिक गोडसे यांनी शुक्रवार, 22/09/2017 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को... ये कैसे लाये? जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा.. एक एक पाई हिन्दुस्थान की वापीस लाई जाएगी और हिन्दुस्थान के गरीबोंके लिये काम लायी जायेगी... ये जनता के पैसे है, गरिब के पैसे है... हमारा किसान खेत मे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है.. उस धन पर हिन्दुस्थान का अधिकार है ,हिन्दुस्थान के कोटी कोटी गरिबोंका अधिकार है, और उनको वो धन मिलना चाहिये..... तुमच्यावर विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले.. तेही प्रचंड बहुमताने.. सत्तेचा गाडा सुरळीत चालवण्यासठी कुठलेही कडबोळ्याचे लोढने तुमच्या गळ्यात अडकवले नाही. विदेशातला भारतीय काळा पैसा आणणे तुम्हाला जमले नाही.. एकतर त्या विषयाचा अभ्यास नाही.. पक्षातील जाणकारांचे ऐकायचे नाही.. बिनडोक दोन चार लोकांना बरोबर घेवून असा काळा पैसा परत येत असतो काय? सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली... एक फुटी कवडीही विदेशातून तुम्हाला आणता आली नाही..(आणता येणार नाही हे पहिल्यापासूनच सांगत होतो) थोड्याच दिवसात जनतेला कळून चुकले ... अरे ह्याला देशाचा गाडा काय , साधी बैलगाडीही हाकलता येत नाही. तुम्हाला टेंशन आलं... आणि मग साक्षात्कार झाला ,अरे देशातील काळा पैसाच येथील अर्थव्यवस्थेला कमकुवत बनवत आहे...मग तुमच्या डोक्यात एका बिनडोकाने (अशी लोकं तुम्हालाच सापडू शकतात) त्याच्या डोक्यातील अर्थक्रांतीचा कीडा तुमच्या डोक्यात हळूच सोडला...विदेशातील काळा पैसा आणण्यात आलेल्या अपयशामुळे तुमच्या डोक्यात किडे पडायची वेळ आली होती..अर्थक्रांतीचा हा कीडा तुमच्या डोक्यात फिट्ट बसला.. पुन्हा एकदा बिनडोक निर्णय घ्यायला तुम्ही सज्ज झालात. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता. आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत. जुन्या बाद केलेल्या जवळ जवळ सगळ्या नोटा परत आल्या हे RBI ने घोषित केले व नोटाबंदी फेल गेली ह्यावर शिक्कामोर्तब झाले.नोटाबंदीमुळे GDP ग्रोथ घटणार(प्रत्यक्षात तसंच झालं) असं बोलणार्‍यांची तुम्ही खिल्ली उडवत होता. नोटाबंदी विरोधकांना 'नोटाबंदीभक्त' देशद्रोही ठरवू लागले . विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सत्य स्विकारण्याऐवजी तुम्ही त्याकडे काणाडोळा करत आहात. ये अच्छी बात नही है!

वाचने 122752
प्रतिक्रिया 261

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

त्यांना फेकू म्हणण्याची आपली लायकी काय आहे? याचाही विचार करा असं एखाद्या मिपा सदस्याची लायकी काढणे मिपा धोरणात बसतं का ?

In reply to by मार्मिक गोडसे

अशी भाषा आपण देशाच्या लोकनियुक्त पंतप्रधानांबद्दल परत परत वापरत आहात ते सुद्धा "आवाज दाबू नका' असा धागा काढून. आपण आम्हाला भक्त म्हणता येथ पर्यंत ठीक आहे. आम्ही कस्पटासमान आहोत हे हि मान्य. असेच अनुदार उद्गार डॉ आंबेडकरांबद्दल किंवा प्रेषित महंमदाबद्दल काढण्याची हिम्मत दाखवा आणि मग व्यक्तिस्वातंत्र्य आवाज दाबू नका इ म्हणा. तेंव्हा भावना दुखावल्याबद्दल आपली काय स्थिती होईल ते पहा . तसेच श्री मोदींना बोलल्याबद्दल आमच्या सारख्यांच्या भावना दुखावतात याबद्दल आपले काय म्हणणे आहे? श्री मोदींना फेकू म्हणण्याची आपली "लायकी आहे" हे पहिल्यांदा आपण सिद्ध करा. अशा तर्हेचे अनुदार उद्गार यापूर्वी मी फक्त मोगा उर्फ जामोप्या उर्फ चंपाबाई यांच्या बद्दल काढले होते.( त्याबद्दल मला खेदही नाही)

In reply to by सुबोध खरे

आंबेडकरांबद्दल किंवा प्रेषित महंमदाबद्दल काढण्याची हिम्मत दाखवा आणि मग व्यक्तिस्वातंत्र्य आवाज दाबू नका इ म्हणा. काय काढण्याची हिम्मत दाखवू म्हणता? तुम्हाला त्रास होत असेल तर करा की तुम्ही हिम्मत. कायदा - सुव्यवस्था बघायला तुमचे लाडके सरकार समर्थ आहे . सरकारवर भरोसा नाय का?

In reply to by मार्मिक गोडसे

गोडसे, मोदींना फेकू असे संबोधणे अल्पसंख्याक नागरिकांच्या भावनांस क्षती पोचवणरे आहे. अल्पसंख्यांकांच्या भावनांचा आदर ठेवत जा. भारतात ते सर्वात महत्त्वाचे आहे. खरेंचे ऐका. त्यांच्या भावना दुखावतात. मोदींना फेकू म्हणू नका, फेकू फेकू असे म्हणून मोदींचा अपमान करायचा नाही. साक्षात मोदींना फेकू म्हणणे मान्य नाही होणार. अजिबात कोणीही मोदींना फेकू म्हणून त्यांची खिल्ली उडवायची नाही. तुमच्यावर खटला दाखल होऊ शकतो. सावधान, मोदींना फेकू म्हणाल तर.

In reply to by तर्राट जोकर

असेच अनुदार उद्गार डॉ आंबेडकरांबद्दल किंवा प्रेषित महंमदाबद्दल काढण्याची हिम्मत दाखवा जोकर बुवा तुम्हाला हि हेच आव्हान आहे बोला घेता का?

In reply to by सुबोध खरे

हायला तुम्ही कोण, कधी, केंव्हा, काय बोललं हे लक्षात ठेवता ?आणी ते उकरून काढता धन्य आहे ! इतकी हतबलता (DESPARATION) कामाची नाही. आडनावाप्रमाने 'खरे' कधी बोलणार? स्मृतीभ्रंश झाला का?

In reply to by मार्मिक गोडसे

ह ह ह.... भारतासारख्या सार्वभौम देशाच्या पंतप्रधान पदासारख्या सर्वोच्च जबाबदार आणि शपथेने बांधील, घटनात्मक पदावर बसून जो माणूस बिन्दास खोटारडी फेकाफेक करतो, त्याला आपल्या खोटं बोलण्याबद्दल अजिबात काहीही वाटत नाही, पण त्याला खोटारडा म्हटला की कुणाच्या बुडाला का आग लागती? गोडसे तुम्हाला माहिती असंल तर सांगा.

In reply to by मार्मिक गोडसे

अहो नथुराम त्या डांगे अण्णांच्या 20 लाखाच्या ट्रक सारखं तुमचं स्विस बँकेतले पैसे किंवा ते "फक्त हजार बाराशे स्क्वेअर फुटाचे" रेल्वेच्या अतिक्रमित जमिनीवरील घर हे "लक्षात ठेवावे" लागते नाहीत.

In reply to by सुबोध खरे

आंबेडकरांबद्दल अनुद्गार काढण्याइतके काय केले त्यांनी हे ऐकायला आवडेल तुमच्याकडून. बाकी, इतक्यातच मोदी हे प्रेषित आणि महामानव पदांशी बरोबरी करू लागलेत हे पाहून आनंद झाला. कुठल्या व्यक्तीला काय बोलावे हे प्रत्येकाला डीक्टेट करण्याइतकी ऑथॉरीटी तुमच्याकडे असते हे सुद्धा आजच कळाले. ते ही आवाज दाबू नका नावाच्या धाग्यावर हे एक विशेष. :)

In reply to by थॉर माणूस

चुकीच्या दिशेने विचार करताय. पंतप्रधानांवर अश्लाघ्य टीका केली तरी तुमच्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही आणी आवाज दाबला जातो आहे हा दावा खोटा आहे असे दाखवत आहे. असहिष्णुता काय आहे/असू शकते हे अशा लोकांना दाखवणे आहे. यात डॉ आंबेडकर किंवा प्रेषित महंमदाशी तुलना करण्याचा संबंध नाही.

In reply to by सुबोध खरे

:) अडीचशेच्या वर प्रतिसाद आहेत ह्या धाग्यावर, तुम्हीच एकदा काळजीपूर्वक रोख बघा धाग्याचा. कार्यवाही होत नाही हे वर्षानुवर्षे गृहीत धरूनच चालले होते लोक. म्हणूनच याआधीच्या पंतप्रधान, मंत्री इत्यादींवर लोक टीका करत आणि कुठलीही टोळधाड झूंडीने त्यांच्या अंगावर येईल का याची चिंता करावी लागत नसे. गेल्या काही वर्षात हे चित्र कणभरही बदललेले नाही असे तुमचे म्हणणे असेल तर मग प्रश्नच मिटला. आणि हो, त्यांच्या असहिष्णुतेपेक्षा आमची असहिष्णुता चांगली असा दावा करणे तरी योग्य आहे का याचाही विचार करा. कारण ज्या दोन समुदायांवर आपण आत्ता असहिष्णुतेविषयी आरोप केलेत, त्यांनी सुद्धा हे सरकार निवडून आणण्यात हातभार लावलेला आहे.

In reply to by तर्राट जोकर

तजो, का आमच्यासारख्या गरिबाला दम देता? तो गूगलबाबा 'फेकू ' शब्द सर्चला टाकल्याक्षणी लाडक्या पंतप्रधानांना आपल्यासमोर उभे करतो. त्यानेच आम्हाला असं बोलायला शिकवले त्याला का दम देत नाही?

In reply to by मार्मिक गोडसे

अहो नथुराम म्हणजे काय आहे "गोडसे" टाकलं तर गुगल बाबा नथुराम गोडसें बद्दलचं सगळं साहित्य दाखवतात. ते स्विस बँकेतले पैसे आपले नाहीत तर कुणाचे याचं तुम्ही अजून उत्तर दिलं नाहीये. का सापडत नाहिये? गुगल करून पाहा.

In reply to by श्रीगुरुजी

गुगलवर "पप्पू" टंकलं तर कोण दिसेल हो? काल कोणीतरी महिलांच्या स्वच्छतागृहात घुसला होता म्हणे. जो कोणी दिसेल त्याबद्दल तुम्ही काहीही लिहिलं तरी माझ्या भावना ह्यापूर्वी कधी दुखावल्या गेल्या नाहीत ,भविष्यातही दुखावल्या जाणार नाही. बिनधास्त लिहा.

In reply to by मार्मिक गोडसे

जाऊ द्या हो नथुराम भावना दुखावण्यासाठी माणूस भावनाप्रधान असावा लागतो. भावनाशून्य माणसाच्या भावना दुखावत नाहीत. ते स्विस बँकेतले पैसे कुणाचे सापडलं काय?

In reply to by सुबोध खरे

भावना दुखावण्यासाठी माणूस भावनाप्रधान असावा लागतो. मी कोणाचा भक्त नाही. आणि अंधभक्तां सारखा रडका स्वभावही नाही. जे खटकते ते थेट बोलतो, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम धरत नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

भावनाशून्य माणसाच्या भावना दुखावत नाहीत. ते स्विस बँकेतले पैसे कुणाचे सापडलं काय? याचा उत्तर मात्र तुम्ही देत नाही. आणि पंतप्रधानांना फेकू म्हणताय.

In reply to by सुबोध खरे

आपण कोण? भारतीय नागरिक आपला पगार किती? विद्यार्थीदशेत असताना केले होते पगारावर काम. सध्या स्वतःचा व्यवसाय. कष्टाने मिळेल त्यात समाधानी. चौकशी बद्दल धन्यवाद! परंतू यंदा कर्तव्य नाही... पंतप्रधानांनी आपल्याला उत्तर का द्यावे? त्यांनी तशी सार्वजनिक घोषणा केली आहे. जमत नसेल तर कशाला फुकाच्या घोषणा करायच्या?

In reply to by मार्मिक गोडसे

Prime Minister Narendra Modi asked all BJP legislators and parliamentarians on Tuesday to submit their bank transaction details to party president Amit Shah, three weeks after he abruptly recalled high-value banknotes to drain illegal cash from the economy. त्यांनी आपल्या( भाजपच्या) आमदार खासदारांना हि माहिती पक्षाध्यक्षांना द्यायला सांगितली आहे. आपण उपटसुंभ कोण?भाजप शी आपला काय संबंध? संबंध असेल तर हि माहिती श्री अमित शाह याना विचारा मान न मान मै तेरा मेहमान उगाच सार्वजनिक स्थळावर आपला कडवा द्वेष व्यक्त करायची गरज नाही. तरीही गरळ ओकायचीच असेल तर आपली मर्जी

In reply to by सुबोध खरे

आपण उपटसुंभ कोण?भाजप शी आपला काय संबंध? दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत धोरणात नाक खुपसताना तुमचा त्या पक्षाशी जितका संबंध उपटसुंभ ? सभ्य भाषा वापराल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by मार्मिक गोडसे

नोटाबंदीची घोषणा केल्यावर आपल्या पक्षाच्या आमदार खासदारांचे ८ नोव्हें १६ ते ३१ डिसें. १६ पर्यंतचे बँक व्यवहाराचे तपशील तपासणार होते निस्वार्थी पंतप्रधान , झाले का तपासून ? की नुसती फेकुगीरी? आमदार, खासदारांचे बँक व्यवहार पंतप्रधानानी तपासले की नाहि याची माहिती, 'माहिती अधिकार कायद्या'च्या माध्यमातून पंतप्रधान किंव्हा पंतप्रधान कार्यालयाकडून तुम्ही मागवू शकता. ते तुम्ही करणार नाही, फक्त मिसळपाव व मायबोलीवर धागारुपी जिलब्या टाकून त्या धाग्यावर पंतप्रधानांनी येऊन तुम्हाला उत्तर द्यावे हि अपेक्षा ठेवणार?

In reply to by प्रसाद_१९८२

पण राजकीय पक्ष आणि त्यांचे आर्थिक व्यवहार अजूनही RTI मध्ये समाविष्ट नाहीत. त्या दृष्टीने कुठल्याच सरकारने फारशी हालचाल केली नाहीये. त्याची कारण सरळ सरळ आहेत. हा पक्ष पण त्याला अपवाद नाही. निवडुणकामध्ये देणग्या कोणाकडून किती येतात हे लोकांनाही समजले तर सत्य बाहेर पडेल याची भीती वाटते. SC to Centre, EC: Why political parties are not under RTI ambit हे संपादकीय पण वाचा. Making parties accountable

In reply to by शब्दबम्बाळ

लोकशाहीचे चारही "आधार स्तंभ" सवता सुभा कसा राखून ठेवता येईल याचा प्रयत्न करीत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम पासून ते बाबू लोकांच्या शासकीय सेवा नियमावली पर्यंत कोणतीही गोष्ट अपारदर्शक ठेवण्यात सर्वांचा रस आहे. त्याला राजकारणी अपवाद ठरतील हि अपेक्षा ठेवणे हेच चुकीचे आहे. मग तो कोणताही पक्ष असो. सरकारे बुडीत असली तरी आमदार खासदारांचे पगार वाढवून घेताना एकमत होताना सर्व देशभरच दिसून येते. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल गळा काढताना आपली पक्षीय निष्ठा बाजूला ठेवून सगळे पत्रकार रांगेत उभे राहतात. आपली लोकशाही अजूनही रांगते आहे तिला उभे राहायला आणि चालायला वेळ लागणार आहे धावायची गोष्ट तर दूरच आहे. दुःखात सुखाची एकच किनार आहे ती म्हणजे इस्त्रायल पासून ते दक्षिण कोरिया पर्यंत भारत हा असा एकच देश आहे ज्यात लोकशाही नांदते आहे भले मग ठेचकाळत का असेना?

In reply to by सुबोध खरे

म्हणजे इस्त्रायल पासून ते दक्षिण कोरिया पर्यंत भारत हा असा एकच देश आहे ज्यात लोकशाही नांदते आहे भले मग ठेचकाळत का असेना?
लोकशाही आहे कारण नाइलाज आहे आणि त्याचे कारण आहे भारताचा आकार आणि लोकसंख्या. लोकसंख्या पण अशी की जात, धर्म, भाषा, प्रांत ह्यात पूर्णपणे विभागली गेलेली. कोणी एक व्यक्ती किंवा सैन्य सुद्धा एकाधीकार शाही आणु शकत ह्या विभाजनामुळे.

In reply to by गंम्बा

भारतात लष्करशाही अली नाही याचे कारण आपण म्हणता ते नसून मूळ लष्करी अधिकारी यांच्या मनात लोकशाही बद्दल असलेली भावना आहे आणि त्यासाठी घटनाकारांनी आखून दिलेल्या सीमारेषा आणि त्यावर सावध मनाने केलेले काम आहे .https://www.thequint.com/news/world/indian-militarys-architectural-comp…

In reply to by ट्रेड मार्क

मोदींच नाव कुठेही नव्हतं घेतलं तरीही मोदीविरोध आलाच वाटत! छान! :) असेही भारतात राजेशाही नाहीये, मी सरकारला दोषी धरतोय त्यात त्या त्या खात्याचे मंत्री देखील असतात. जर मोदी त्यांना काम करून देत असतील तर... नाही म्हणजे समर्थकांच्या मते तेच सगळे निर्णय घेतात ना, मग सगळंच कळत असावं त्यांना! कशाला उगाच मंत्री हवेत... असो! तर तुम्ही उगीचच समर्थन करण्याच्या नादात इतके वाहवत गेलात कि आपण कोणाची लिंक शेअर करतोय तेही लक्षात नाही आलं कि हो तुमच्या. ती सोशल कोस्ट ची लिंक आहे ती अरिंदम चौधरी नावाच्या "भामट्याची" आहे. ज्याने अनेकांना मॅनेजमेंट कोर्सेस मध्ये गंडवले आहे. त्याचे IIPM नावाचे गंडवण्याचे कॉलेज देखील बंद करण्यात आले आहे. Don’t ‘Dare to think beyond the IIMs’, Arindam Chaudhuri finally shuts down his infamous b-school IIPM ज्याने स्वतः scam केले आहेत तो त्यांची सोशल कोस्ट काय असते यावर भाष्य करतोय वा रे वा! आता तो मोदींची तळी उचलण्याचे काम करतोय त्यामुळे प्रसिद्ध पण होईल पुन्हा! तर पुढच्या वेळी अशा लिंक देताना जरा "बघा" कि कोणाच्या आहेत, समर्थन करा पण जरा डोळसपणे करा.

In reply to by arunjoshi123

दरवर्षी नव्या नोटा छापण्याचा खर्च हा वाढता असतो (नवे सिक्युरीटी फिचर्स इत्यादीमुळे). त्या वर्षी किती नोटा बाद ठरवल्या आणि किती नव्या नोटा छापल्या जाणार या निर्णयावर किती खर्च होणार हे ठरते. ग्राफ नीट पाहील्यास लक्षात येते की २०१५ ला दिसणारा आकडा २०१४ पेक्षा फार मोठा नाही २०१५ जवळ सुद्धा तो वाढता असला तरी फरक फार मोठा नाही. पण २०१६ आणी २०१७ मधे फार मोठी तफावत दिसते. कारण नोटबंदीमुळे नोटा बाद ठरवण्यात आल्या आणि पुनर्मुद्रण करण्याचा खर्च वाढला.

मार्मिक गोडसे,
परंतू औषधाचे साइड इफेक्ट झटपट दिसायला लागले, पेशंट गडबडा लोळू लागला, डोके आपटू लागला,
या विधानाशी पार असहमत. इतके भीषण दुष्परिणाम असतील तर लोकांनी एव्हाना एखादं आंदोलन उभारलं असतं. मोदींचे राजकीय विरोधक टपून बसलेलेच आहेत मोदी केव्हा घसरताहेत. त्यांनी अशी काही चळवळ वा आंदोलन करण्यात कसलाही उत्साह दाखवला नाहीये. कारण की जनतेचा फुटक्या कवडीइतकाही पाठींबा मिळणार नाहीये हे त्यांना पक्कं ठाऊक आहे. जनतेला खरंच इतका त्रास झाला का याची शंकाच आहे. आणि झाला असला तरी जनता ते सहन करायला तयार आहे. प्रश्न मिटला. तुम्ही हकीमाचं औषध तुच्छ म्हणता, पण मात्रा लागू पडंत नसेल तर रोग्याने बोंब तरी ठोकायला हवी ना? आ.न., -गा.पै.

आमच्याकरिता पेट्रोल आधी सुद्धा महाग होते आणि आता सुद्धा. पण याच्या आधी टॅक्स चा पैसा घोटाळ्यामध्ये जात होता. आता विकासासाठी आणि आतंकवाद्यांना ठोकण्यासाठी. ज्यांना बदलायचे त्यांनी विचार बदला. प्रधानमंत्री तर आम्ही बदलू देणार नाही.

In reply to by सुनिल साळी

>>>प्रधानमंत्री तर आम्ही बदलू देणार नाही. हे तुमच्या आमच्या हातात असतं तर मग आणखी काय हवं? :)

In reply to by सुनिल साळी

प्रधानमंत्री तर आम्ही बदलू देणार नाही.
२०२४ ला योगी आदित्यनाथ पंतप्रधान होणार असं म्हणतात.

मोदींना फेकू म्हटले तर भगतलोक्स स्वतःच्या पिताश्रींचा उद्धार केल्यागत पिसाळायला लागलेत.

In reply to by तर्राट जोकर

@तर्राट जोकर एखाद्याच्या विचारसरणी बद्दल आदर नसेल तरी त्याला आदरार्थी संबोधावे अशीच आमची शिकवण आहे. डॉ मनमोहन सिंह यांच्या काळात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली ज्याला ते अप्रत्यक्ष पणे जबाबदार(act of omission) आहेत तरीही त्यांच्या बद्दल कधीही अनादराचा शब्द मी उच्चारलेला नाही. एवढेच नव्हे तर श्री राहुल गांधी किंवा श्रीमती सोनिया गांधी (जे केवळ खासदार आहेत घटनात्मक पदावर नाहीत) यांच्याबद्दलही असे उद्गार कधीही काढल्याचे मला स्मरत नाही. भाजपच्या खासदार आमदारांचे आर्थिक व्यवहार हे सार्वजनिक नसताना(श्री मोदी यांनी ते पक्षाध्यक्षांकडे देण्याची घोषणा केली आहे० त्यांनी ते व्यवहार पक्षाध्यक्षांना दिले कि नाही हा पक्षाचा अंतर्गत मामला आहे याचा जनतेशी (किंवा गोडसेंशी) संबंध नाही. एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करायची गोडसेंची सवय आहे. गोडसे उगाच त्यावर आपला माहितीचा अधिकार आहे( जो अजिबात नाही पण ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणा गोडसेंकडे नाही) हि दर्पोक्ती करत आहेत. याच लेखात गोडसे स्विस बँकेतील पैसे आपले नाहीत असा दावा करतात आणि त्याबद्दल वारंवार विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र देत नाहीत मुळात आपल्याशी संवाद होत नसताना ( हा माझ्या आणि गोडसेंमध्ये चालू असलेल्या) संवादात आपण आगंतुक पणे भाग घेतलात. कारण नसताना श्री मोदींबद्दल गरळ ओकलीत हेही ठीक आहे. यानंतर आपण आमच्या पिताश्रींवर घसरलात यावरून आपली पातळी आपण दाखवून दिलीत. असो. यापुढे आपल्याशी प्रतिवाद करण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. धन्यवाद आपले कल्याण होवो.

In reply to by सुबोध खरे

मी शाकाहारी आहे म्हणून माझ्या आसपास ठराविक लोकांनी चिकन खायचे नाही असा हट्ट झाला हा. तुमचे एक मत आहे आणि मी त्याच्याशी काही अंशी सहमत देखील आहे. पंतप्रधानच काय कुठल्याच व्यक्तीला अपमानास्पद किंवा हीन विशेषणे देणे मला पटत नाही. पण म्हणून मी एका ठराविक विचारसरणीच्या लोकांना तुम्ही कसे बोलायला हवे याचे डोस देत फिरत नाही, खास करून आपल्या विचारसरणीचे लोक तशाच प्रकारचे वर्तन करत असताना कानाडोळा करत तर नाहीच नाही.

In reply to by थॉर माणूस

आपले म्हणणे बरोबर आहे. मी त्यांच्या पातळीवर येऊ शकत नाही. म्हणूनच मी माझ्या बाजूने वाद थांबवला आहे.

In reply to by सुबोध खरे

मी त्यांच्या पातळीवर येऊ शकत नाही. तुम्ही तर माझी लायकी काढली, पगार काढला, लाडाने उपटसुंभही म्हणाले. एकदा नव्हे तर दोनदा नथुराम नावाने संबोधले , हे सर्व कोणत्या पातळीवर केले?

खरे साहेब पिसाळलेल्या कुत्र्याला बघुन तुम्ही जवळ जाता कि त्याच्यापासुन लांब जातात हो.ह्यांच्यासारख्या (संपादित) लोकांना भ्रष्टाचार चालतो पण पुढच्या भविष्यासाठी घेतलेले निर्णय चालत नाहीत.हे लोक्स खाजगी व्यापार्या कडे कपडे सोडुन येतील पण ह्यांना पेट्रोल चे भाव कमी पाहीजे, देवदर्शना साठी रात्र भर उभे राहतील पण बँकेच्या लायनीत ह्यांचे सांधे दुखायला लागतात.

मी मुंबईत राहतो. मला मागील नोटाबंदी चा काहीही त्रास झाला नाही . मी २,3 महिन्यात मुंबई किंवा डोम्बिव्लीच्या ज्या ज्या ATM मधून बँके मधून पैसे काढले तिथे रांग होतीच पण पैसे पैसे करीत कुणी गतप्राण किंवा मूर्च्छित झाल्याचे पाहायला मिळाले नाही , माझ्याकडे ज्या जुन्या नोटा होत्या - बर्याच होत्या - त्याही बँकेत भरायला दर वेळी साधारण १५ ते २० मिनिटे रांगेत उभे राहलो , पण तेथेही कुणी चक्कर येऊन पडला, attack ने मेला असे बघायला मिळाले नाही. एक मनात शंका येते की सिनेमा , concert इ तिकिटाच्या रांगेत, रेल्वे रिझर्वेशन रांगेत,मंदिरात , अन्य अनेक ठिकाणच्या रांगेत माणसे खूप वेळ उभी राहतात ,पण कुणीही मेल्याचे ऐकले नाही . पण नोटा बंदीच्या काळात अचानक माणसे कशी काय मरू लागली ?

नोटा बंदी रद्द करून पुन्हा ५०० , हजार च्या नोटा चलनात आणल्या तर ???? सर्व प्रोब्लेम संपतील

In reply to by ओम शतानन्द

हा निष्कर्ष कुठून काढलात आता? इतके उद्विग्न होऊ नका होऊ हो. माझ्या माहितीत तरी कुणीही नोटा रद्द करण्याला विरोध केला नव्हता. उलट विरोध हा ज्या पद्धतीने ती राबवली गेली त्याला झाला होता. बर्‍याच लोकांना २००० ची नोट आणणेसुद्धा आवडले नव्हते. यावर भरपूर चर्चा झाली असल्याने इथे उगाच फाटे फोडण्यात अर्थ नाही.

In reply to by थॉर माणूस

काय सांगता? कोणीच नोटबंदीला विरोध केला नव्हता? लोक अमर्त्य सेन, ममो सिंग, रघुराम राजन आणि जो कोणी विरोध करेल त्याचे दाखले देऊन विरोध करत होते.

In reply to by ओम शतानन्द

मोदींनी सरकार बरखास्त करावं. तसंही लोक मोदींना वैतागलेले असल्याने परत निवडून येणार नाहीतच. मग राहुल गांधी, ममो सिंग, ममता दीदी, मायावती, लालू, थरूर, दिग्विजय, केजरीवाल ईई लोकांपैकी जो नवीन पंप्र होईल त्याने सगळी नोटबंदीच रद्द करावी. म्हणजे पैसाच पैसा उपलब्ध होईल. सर्वांना आधी न मिळालेले १५ लाख वाटतं येतील. काय म्हणता.... नवीन सरकारने गेल्या ३-४ वर्षातील नुकसानाची भरपाई करण्यासाठी आधारची सक्ती रद्द करावी, सबसिडी जी परस्पर खात्यात जमा होते ती पण प्रोसेस परत जाण्यासारखी करावी, समस्त जनतेला गॅस, धान्य, भाजीपाला वगैरे सगळंच सब्सिडाइज्ड रेट मध्ये किंवा फुकट देऊन टाकावं, सर्व एजंटांना व दलालांना मानाने परत बोलावून मुक्तपणे काम करण्याची मुभा द्यावी, काळाबाजारवाल्यांना पुनःप्रस्थापित करावे आणि गेल्या ३ वर्षात झालेले त्यांचे नुकसान भरून द्यावे. राफाएल, बुलेट ट्रेन, सध्याची रेल्वे सुधारण्यासाठी चालू असलेले काम, नद्या जोड प्रकल्प ई सर्व बंद करून टाकावे. ज्या बांग्लादेशींना भारताबाहेर काढलं होतं त्यांना सन्मानाने परत बोलावून त्यांना आणि रोहिंग्यांना भारताचे नागरिकत्व बहाल करावे. काश्मीरमधील शांतताप्रिय तरुणांना दगडफेकीचे प्रशिक्षण द्यावे तसेच दगडांचा पुरेसा पुरवठा सतत चालू राहावा यासाठी निविदा मागवाव्यात, त्याचबरोबर सैनिकांना पॅलेट गनच काय खेळण्यातलीही बंदूक या काश्मिरींवर रोखण्यास बंदी करावी. पाकिस्तानने कितीही हल्ले केले तरी त्यांच्याबरोबर शांततेची बोलणी करत रहावं. पाकिस्तान आणि चीनला त्यांना पाहिजे तो भूभाग देऊन टाकावा.

मी स्वता २०१४ मधे मोदीजीन्ची एवढी चाहती नव्हते! पण ८ नोवेम्बेर २०१७ नन्तर झाले.. बेअक्कल भारतीयाना सरळ करायला एक हुकुम् शहाच हवा असे आपले माझे मत. इन्दिरा गान्धी यासाठी आवडायच्या... पण त्यान्चे communist आणि मुस्लिम लान्गुलचालन आवडायचे नाही आत्ता देखिल भारताचा पन्तप्रधान हा धर्म व जातीपलीकडे जाउन देश म्हणुन सर्वाना एकत्र आणणारा हवा असे अत्यावश्यक असताना देशप्रेम या शब्दाची लोक थट्टा करतात. भारतीयाना (सामान्य माणसाला) जगायला कसलितरी kick लागते, मग जात, धर्म, प्रान्त यापेक्शा देशप्रेमाची हाक बरी... अहमदाबादला रहाणार्या माझ्या नातेवाइकान्कडुन तर positive feedback मिळाला मोदीनबद्दल (२ वर्षान्पुर्वी झाले होते बोलणे) भारताचा पन्तप्रधान हा अस्सल भारतीय असावा, त्याने सर्व धर्माना समान वागवावे...व अतिरेकी आणि आततायी धार्मिक विचारधारान्चा नायनाट करावा.. आज मी एक भारतीय स्त्री जे स्वातन्त्र्य उपभोगते आहे ते माझ्या पुढच्या पिढ्याना देखिल मिळावे. जेव्हा लोक बागुल्बुवा करतात परत मनुस्रुतितल्या वाइट प्रथा आचरणात येतिल, तर कस शक्य आहे ते? हिन्दु लोक सुधारलेले आहेत पण मुसलमान राज्य/लान्गुल्चालन मात्र नको कारण त्यान्चा धर्म इतर धर्मियाना सम्पवायला सान्गतो.. तेव्हा लोकानो उगिच कशाला मोदीन्च्या नावाने गळे काढताय?