सध्या रोज संध्याकाळी येणार्या पावसावर मी केलेली कविता...
सध्या रोज संध्याकाळी येणार्या पावसावर मी केलेली कविता...
आता कशाला पावसा
तू उगाच कोसळतोस
उभी राहिली पिके ही
का त्यांना भिजवतोस
नक्षत्रे पावसाची सारी
संपली ती आता रे
सरला आश्विन आता अन्
आली आली दिवाळी रे
असा अवेळी तू येता
उडे खूपच धांदल
मेघ गर्जना विद्युत
काळे काळे हे बादल
नको रागाने बरसू
नको आणू रोगराई
दिवस सण उत्सवाचे
आहे लगबग घाई
निरोप घेऊन धरणीचा
पुढल्या वर्षी रे तू यावे
आगमन होईल शिशिराचे
तू आता उगी राहावे
-- शब्दांकित (वैभव दातार )
लेखनविषय:
याद्या
1680
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
किती सुंदर लिहीता तुम्ही,
चांगली आहे कविता. आवडली.
तुमच्या कंमेंट बद्दल आभारी
वाह, टाका ना ती पण!!
In reply to तुमच्या कंमेंट बद्दल आभारी by वैभवदातार
धरणीचे मनोगत हि कविता मी