८ आणि ९ ऑक्टोबर - मोदक की सवारी, चली कन्याकुमारी! - ३५०० किमी.. १२ दिवस..! (समाप्त) - Live Updates
२८ सप्टेंबर २०१७
२८ सप्टेंबर २०१७ आज कन्याकुमारीला जायला निघायचे होते. पण अचानक ऑफिसमध्ये मीटींग्स आल्याने २ ला निघणार होतो ते ४ ला निघालो. आता मुक्कामाला इस्लामपुरला पोहोचलो आहोत. वाटेत येताना मस्त ढगाळ वातावरण होतं. विजा वगैरे चमकत होत्या. छान झाडीतून प्रवास झाला. पुणे ते कोल्हापुर ह्या एन.एच ४ हा रस्ता पुण्यातुन बाहेर पडेपर्यंत ठीक ठाक होता. पण तिथे फ्लाओव्हर्सचं काम चालू असल्यामुळे बर्यापैकी डायव्हर्जन्स आहेत. त्यानंतर शिरवळ ते सातारा हा सगळ्यात खराब भाग. कारण त्या रस्त्यावर मार्किंग्सच नाहीयेत. रात्री गाडी चालवताना मार्किंग्स महत्वाची असतात. त्यामुळे गाडीचा स्पीड कमी झाला. पुण्यातून ६ ला बाहेर पडलो आणि सातार्याला ७.४५ पर्यंत पोहोचलो. त्यानंतर माझा अत्यंत आवडता पॅच - सातारा ते कराड! तिथे मात्र गाडी चालवायला मजा आली. पण तिथे माझी आणि शंतनूची चुकामूक झाली. एकमेकांना शोधण्यात आमची पंधरा - वीस मिनिटं गेली. अंधार आणि पुढे मागे न थांबल्याने असं झालं, पण हरकत नाही. ते आजच्या दिवसाचं लर्निंग आहे. आता मित्राच्या घरी आलोय, उद्या सकाळी पुन्हा प्रवासाला सुरुवात. उद्याचा मुक्काम म्हैसुर येथे. सध्या तरी इथे धो धो पाऊस पडतोय.
***************************************************************************************
२९ सप्टेंबर २०१७
२९ सप्टेंबर २०१७ सकाळी इस्लामपुरातुन ७च्या दरम्यान बाहेर पडलो, कामेरी आणि येलुर करुन कोल्हापुर क्रॉस केल. क्रॉस करतानाच गाडी रिझर्वला लागली. एका पेट्रोल पंपावर गेलो तर तिथे कळालं की पुढे १५ किमी वर कर्नाटक बॉर्डर आहे आणि तिथे पेट्रोल स्वस्त आहे. असं त्या पेट्रोल पंपवाल्यानीच सांगितलं! मग पुढे १५ किमी वर पेट्रोल पंप सापडला. तिथे ९ रुपयांनी पेट्रोल स्वस्त होतं. पण तिथे कार्ड चालत नव्हतं. मग आणखीन पुढे गेलो. एका ठिकाणी पेट्रोलपंप सापडला. तिथे गाड्या पेट्रोल भरायला बाजुला घेतल्या घेतल्या की दोन तीन लोकं आले आणि कॅमेराला हात लावून, गार्डला हात लावून हे काय आहे, ते काय आहे असं नेहमीप्रमाणे प्रश्न सुरू झालं. मग हे कशासाठी, कुठे चाल्लाय वगैरे विचारू लागले. त्यांना उत्तरं देत बसलो. तो पेट्रोल पंपही अगदी मोठा होता. प्रशस्त एकदम. फक्त डिझेलचे ३ -४ सेक्शन. पेट्रोलचे वेगळे. तिथून निघालो.
आता कर्नाटकच्या हद्दीतला रस्ता सुरू झाला होता. तो रस्ता फारच स्मूथ होता. मोठाच्या मोठा रस्ता. म्हणजे एखादी गोळी आपण त्या रस्त्याच्या दिशेने झाडली तर ती गोळी सरळ जाऊन परत शेवटी तिची क्षमता संपली की रस्त्यावरच पडेल इतका सरळ! कर्नाटकातले रस्ते चांगले आहेत. तीन तीन लेनचे रस्ते. बस आणि ट्रक लेन बाय व्यवस्थित आहे. तिथे टॉयलेटची सोयही असते. डेझिग्नेटेड एरिया असतो. नीट मार्क असतो त्याचा. त्यामुळे थांबायला सेफ वाटतं.
आज जाताना टेकड्या टेकड्यातला पॅच होता. म्हणजे आपण एका खिंडीतून बाहेर पडायचं, उतरायचं की लगेच पुढची खिंड किंवा टेकडी तयार. रस्ता सरळच. तिथून पुढे आम्ही कावेरी हॉटेलला आलो. हे ते हॉटेल जिथून गोवा किंवा आंबोलीला रस्ता जातो. तिथे नाश्ता केला. इडली वडा , उपीट अशी खादाडी झाली. कॉफी चांगली मिळते इथे. इथला मालक म्हैसुरचा होता. त्याने इकडून असं जावा, तसं जावा अशी सगळी सगळी माहिती सांगितली.
म्हैसुरच्या दसर्याबद्दल बरंच काही सांगितलं. त्याच्याशी गप्पा मारुन बाहेर पडलो. तिथून मग सरळ रस्ता परत पकडला. बेळगाव विधानसभा वगैरे क्रॉस केलं. हुबळी नंतर अचानक सिंगल लेन रोड चालू झाला. तिथे बराच वेळ गेला. एनएच ४ ला सिंगल लेन जरा सरप्राईजिंग होतं. तिथे बर्याच ठिकाणी रस्त्याची एक लेन एका साईझच्या खडीने आणि दुसरी दुसर्या साईझच्या खडीने केलेली असं होतं. लेन बदलताना ते स्पष्ट जाणवायचं. ते खूप डेंजरस होतं. नंतर मग एन.एच ४ मध्येच खड्डे पण सुरु झाले. कागल ते बेळगाव आणि हुबळी पर्यंत रस्ता चांगला होता. त्यानंतर मात्र रस्ता ओके ओके. ३०-४० किमीचा तो एक पॅच जरा खराब होता. नंतर परत चांगला रस्ता. टोललाही कुठे गर्दी नव्हती. व्यवस्थित स्पीडने बाहेर पडता येईल इतके मोठे रस्ते होते. सर्व्हिस रोड वगैरे व्यवस्थित होते. पुढे अचानक एका ठिकाणी पवनचक्क्या सुरु झाल्या. त्या बघायला थोडा वेळ थांबलो. इरसाल बुवांशी बोलणं झालं ते इथेच. तिथे फोटो काढून निघालो.
दावणगिरीच्या आसपास आम्ही जेवायला थांबलो. आत जाण्यापेक्षा बाहेरच्या बाहेरच एक धाबा बघितला आणि तिथे थांबलो. जेवण अगदीच काही तरी होतं. त्या धाबेवाल्यानी पराठ्याचं अगदी चांगलं वर्णन केले म्हणून तो मागवला. पण प्रत्यक्षात मात्र अत्यंत तेलकट सारण असलेला पराठा. त्या ताटाला सुद्धा आजुबाजुने स्पष्ट तेल दिसत होतं. वाटीभर तरी तेल असेल. कसा बसा तो खाल्ला. दाल - तडका रोटी वगैरे खाऊन ४ च्या सुमारास तिथून बाहेर पडलो. त्यानंतर असाही एक पॅच आला जिथे कुठेही डोंगर नव्हते. पुण्यात असं होत नाही. कुठेही गेलो तरी डोंगर दिसतातच. इथे मात्र क्षितिजा पर्यंत फक्त हिरवीगार शेती. नुकतीच लावलेली असल्याने जमिनीला लगतच. हिरवे लांब लांब पट्टे. इथे गाडी चालवताना मजा आली. पुढे चार थेंब पडल्या सारखा पाऊस आला.
तिथून पुढे आम्हाला कुठे तरी राईट टर्न घ्यायचा होता. एक तर तो चित्रदुर्गला घेता आला असता. एन.एच ४ चित्रदुर्गच्या बाहेरून जातो. मोठे मोठे फ्लाय ओव्हर्स आहेत. आणि त्यांना दगडी तटबंदी करून हिस्टोरिक लूक दिलाय. तिथून एक रस्ता म्हैसुरला जातो असं एकानी आम्हाला सांगितलं होतं. पण शेवट पर्यंत तो रस्ता काही आम्हाला सापडला नाही. कुठेही बोर्ड नव्हता की काही नव्हतं. पुढे एका टोलनाक्याला एका ट्रॅव्हल्सवाल्याला विचारलं. त्यानी खाणाखुणांसकट कसं जायचं हे आम्हाला सांगितलं. आम्ही हिरीयुरपासून राईट टर्न घेतला. ह्या भागात हायवेला प्रचंड चतुर किटक होते. धडाधड आमच्या हेल्मेट, मास्क, गॉगलला धडकत होते. आम्ही सांगितलं होतं तसं सरळ जात होतो. आणि अचानक एन.एच ४ लाच परत लागलो. तिथे अगदी "टुवर्डस पुणे" असा बाण दाखवलेला बोर्ड बिर्ड होता. मग आमच्या पक्कं लक्षात आलं की आम्ही रस्ता चुकलोय. परत यु टर्न मारला. एका सर्कलला आम्ही राईट ऐवजी लेफ्ट टर्न घ्यायला हवा होता असं काही तरी लक्षात आलं. तो बरोबर टर्न घेऊन आम्ही योग्य रस्त्याला लागलो. आम्हाला हुल्ल्याळ गावापर्यंत जायचं होतं. तो रस्ता म्हणजे.. अहाहाहा! तिथे काहीही मार्किंग नव्हतं. आजुबाजुला फक्त शेती. वाईट गोष्ट म्हणजे समोरची सगळी वहानं अप्पर लाईट लावून चालवत येत होती. तो खेळ बघत बघत पुढे यायचं होतं. त्यात बराच वेळ गेला.
हुल्लाळच्या पुढे आम्हाला सांगितलं होतं तसं एका मोठंच्या मोठं नाव असलेल्या (नाव विसरलो) जंक्शन पासून आम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा होता. तिथे आम्ही म्हैसुर ११६ किमी चा बोर्ड पाहिला होता. तिथून पुष्कळ पुढे आलो. छोटी छोटी गावं लागत होती. मार्किंगचे रस्तेही आले. त्या रस्त्यावर आम्ही जवळपास १.५ तास होतो. तिथून पुढे किमान ७० किमी राहिले असावेत असा आमचा हिशोब होता. त्या वेळी "तुरुवेकेरे" गावात एक बोर्ड, म्हैसुर ११३ किमी! एक तर आम्ही रस्ता तरी चुकलो किंवा काय माहिती काय झालं. चकवा लागणे म्हणतात तसा प्रकार झाला. शेवटी ह्याच गावात मुक्काम करायचं आम्ही ठरवलं. इथे खंडे नवमी निमित्त गाड्या घरं ट्रॅक्टर सगळं छान छान केळीच्या पानांनी सजवलं आहे. पेट्रोल पंप सुद्धा सजवला होता. छान गाण्यावर ढिच्चिक ढिच्चिक नाचणारं लाईटिंग केलंय.गावाला तीन टोकं आहेत वेगवेगळी, सगळी कडे फिरुन वेशीचे बोर्ड पाहुन आलो. धाबे वगैरे काही नाहीये. शेवटी चिवडा आणि वेफर्स खाऊन झोपू. आणि उद्या सकाळी उठून आम्ही म्हैसुरला निघु.
***************************************************************************************
३० सप्टेंबर २०१७
३० सप्टेंबर २०१७ दिवसभर गाडीवर असल्याने झोपताना आणि आता उठल्यावर बुलेटचा "डग डग डग डग..." असा आवाज कानात साठून राहिला आहे. गणपतीत ढोल ताशाचा आवाज असाच साठून राहतो... हे एक फार भारी फिलिंग असते. सकाळी या आवाजाचा आनंद घेत थोडावेळ पडून होतो, अचानक बांग झाली, शंतनुही उठला. शेजारीच कुठेतरी मशीद असावी.. आवरले, गाडीला बॅगा अडकवल्या आणि बाहेर पडलो. सकाळी सकाळी खेड्यातले रिकामे रस्ते आणि आजूबाजूला हिरवीगार शेती.. मग आम्ही गाड्यांचा वेग थोडा वाढवलाच. या रस्त्यावरून जाताना थोड्या थोड्या अंतरावर गावे लागत होती. दसऱ्यानिमित्त सजवलेली घरे, गाड्या दिसत होत्या. लोकांनी 'दिल खोलके' केळ्याचे खुंट जिकडे तिकडे लावले होते. ट्रॅक्टर, सायकल, सार्वजनिक बसेस इतकेच काय एका ठिकाणी विजेच्या खांबाला पण खुंट आणि हार गुंडाळले होते. मग आम्ही का मागे राहू, आम्ही पण एका गावात थांबून गाड्यांना हार घातले. हारवाल्याशी थोडे बारगेन करायचा प्रयत्न केला तर त्याने पटकन हाराची लांबी कमी केली. मग त्याला सांगितलेली किंमत मान्य करावीच लागली कारण इतके छोटे हार गाडीच्या हेडलाईटलाच बसले असते, मग गप ते हार विकत घेतले, दुकानदार आणि उत्साही लोकांनी ते गाडीला बांधले नंतर त्या दुकानदाराकडे केळी विचारली तर त्याने चार सोनकेळी तशीच दिली. पैसे नकोत म्हणाला. आम्ही निघताना गडबडीने दुकानाबाहेर आला आणि गाडीच्या पुढच्या चाकाखाली लिंबू ठेवून "आता जावा" अशी खूण केली. आम्ही थोडे पुढे येऊन फोटोसेशन केले. नंतर थोडे पुढे आलो आणि अचानक आडवा प्रवास करत हायवे लागला. आता हा पुणे बेंगलोर की काय असा विचार करेपर्यंत लक्षात आले की हा मेंगलोर-बेंगलोर हायवे आहे. तिथेच एके ठिकाणी भरपेट नाष्टा केला. मध्ये एकदा नाराळाचे पाणी प्यायला थांबलो. स्ट्रॉ वगैरे काही भानगडच नाही. सरळ तोंडाला नारळ लावायचा!
तिथून पुढे आम्ही म्हैसुरला पोहोचलो. तिथलं युथ हॉस्टेल शोधलं. रुम ताब्यात घेऊन बॅगा टाकल्या आणि लगेच रिक्षा पकडून राजवाड्याच्या दिशेने निघालो. तिथे मिरवणूक चालू होणार होती. पुण्यात जसं गणपतीच्या वेळेला वातावरण असतं तसं वातावरण होतं. प्रचंड गर्दी होती. आम्ही एक जागा पकडून तिथेच सेटल झालो. ढकला ढकली सुद्धा भरपूर चालू होती. तोवर शोभारथ असतात तसे रथ यायला सुरुवात झाली. प्रत्येक जिल्ह्याचे रथ, असे ३२ रथ आले. नंतर प्रत्येक खात्याचा रथ. म्हणजे पोलीस, अग्निशामक दल. एक एस.बी.आयचा रथ सुद्धा होता. जिल्ह्यांच्या रथांसोबत तिथले स्थानिक पारंपारिक कलाकारही होते. ह्या नंतर ६ च्या सुमारास अश्वदल आलं. त्यामागे अंबारी. मुख्य देवीची अंबारीतून मिरवणूक होती. लोक देवीच्या घोषणा देत होते. इथे कार्यक्रम संपला आणि लोक परत जाऊ लागले. ह्या गडबडीत माझ्या हिमाचलच्या ट्रिपमधल्या एका मैत्रिणीचा, पल्लवीचा फोन आला. तिने आम्हाला एका कार्यक्रमाची तिकिटं आणून दिली. मग तासभर आम्ही तिथेच टाईमपास केला कारण प्रचंड ट्रॅफिक होतं. ज्या अंतरासाठी आम्ही मगाशी ६० रुपये दिले होते, त्यासाठी आता रिक्षावाले २००/- मागत होते.
थोड्यावेळाने हॉस्टेलवर जाऊन गाड्याकाढून म्हैसुरच्या दुसर्या टोकाला असणार्या त्या कार्यक्रमासाठी निघालो. ह्या कार्यक्रमाचे नाव म्हणजे "टॉर्चलाईट". जाताना रस्त्यात आम्हाला थांबवून ठेवलं कारण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपालांची गाडी जाणार होती. हा कार्यक्रम म्हणजे पोलीस, एन.सी.सी अशा युनिफॉर्ममधल्या दलांचे संचलन असते. त्या दरम्यान त्यांनी बदुकांच्या फैरी झाडल्या. मग घोडेस्वारीची प्रात्यक्षिकं झाली. ह्यानंतर इंडियन आर्मीचे टॉर्नेडो नावाचे एक मोटरसायकलचे युनिट आहे, ते रॉयल इन्फिल्ड वर कसरती करतात. त्यांनी जबरदस्त प्रयोग केले! ३० मोटरसायकली एकमेकांच्या अत्यंत जवळून जाणे, क्रॉस्मध्ये जाणे इ. प्रयोग झाले. त्या युनिटच्या कॅप्टनने मोटरसायकलवर उभे राहुन पूर्ण स्टेडियमला चक्कर मारली. गाडीवर उभे राहणे, चालत्या गाडीवर बागेत बसल्यासारखं पेपर वाचणे, दोघांनी मिळून एक बार नेणे आणि तिसर्याने त्या बारवर व्यायामप्रकार करणे, चालत्या गाडीवर शिडीवर चढणे असे एकाहून एक थक्क करणारे प्रयोग केले. त्यांच्या टीमचे प्रतिक म्हणून "टी" आणि "म्हैसुर दसरा" असे फॉर्मेशन्सही बनवले. आम्ही कार्यक्रम संपायच्या १५ मिनिटं आधीच निघालो कारण इतके लोक निघाले की खूप जाम झाला असता. आता बाहेरुन जेवुन हॉस्टेलवर येऊन पडलो आहोत. रात्रीच्या वेळेला झाडांना केलेली सुंदर रोषणाई दिसते आहे.
***************************************************************************************
१ ऑक्टोबर २०१७
१ ऑक्टोबर २०१७ काल गडबडीत पॅलेस बघायला जमलं नाही म्हणून आज मुक्काम वाढवला आणि पॅलेस पहायचा प्लान केला. रिसेप्शनवर जाऊन एक दिवस मुक्काम वाढवून द्यायला गेलो. हॉस्टेल मध्ये कुणीही नसल्याने अगदी आनंदाने त्यांनी तो वाढवूनही दिला! रुमवरुन बाहेर पडलो "मल्लिगा इडली" खायला. मल्लिगा म्हणजे मोगरा. ही इडली मोगर्याच्या सुंगधाच्या तांदुळाचे एक वाण इथे डेव्हलप केले आहे त्यापासून बनवलेली असते. ती शोधायला झू पाशी गेलो. ते हॉटेल काही सापडेना. पण एका रिक्षावाल्याने "मल्यारी" नावाच्या एका वेगळ्या हॉटेलला पाठवलं. तिथे डोसा चांगला मिळेल म्हणे. तिथे गेलो तर २० - २५ मिनिटांच्या वेटींग नंतर आमचा नंबर लागला. एक अगदी लहानसे हॉटेल आहे. डोसा खरंच मस्त होता. छोट्या साईझचा मसाला डोसा होता. मसाला मात्र वेगळा बनवला होता. फारच टेस्टी प्रकार होता तो. झू मध्ये गेलो तर तिथे न्युज बाईट घेण्याचा कार्यक्रम चालू होता. एका माणसाला रिपोर्टर्सनी गराडा घातला होता. मग ती मजा बघत बसलो. ह्या प्राण्यांचे पण फोटो घेतले!
म्हैसुरचा झू अत्यंत प्रशस्त आहे. अनेक विभाग आहेत. झू मध्ये अनेक प्राण्यांना पिंजरे नाहीत, नॅचरल हॅबिटॅट सारखं ठेवलेलं आहे. नीट स्वच्छता राखलेली आहे. बाराच्या सुमारास झू मधून बाहेर पडलो. जेवायला सिद्धार्थ हे व्हेज नाही तर ज्वेल रॉक हे नॉन व्हेज हॉटेल असे पर्याय होते. ज्वेल रॉकला गेलो तर ते बार सारखं वाटलं म्हणून सिद्धार्थला गेलो. साऊथ इंडियन खाल्लं. आणि मग बाहेर येऊन २.५ स्कूपचं मोठं ड्रायफृट्स वगैरे घातलेलं मस्त आईसक्रिम घेतलं. पोट एकदम फुल्ल!
पॅलेसकडे आलो. तिकीट काढुन प्रचंड गर्दीत पॅलेस पाहिला. तो पाहून होईस्तोवर ४ वाजले होते. तिथून जवळच गांधी सर्कल आहे. तिथे तांब्याच्या वस्तुचे एक दुकान पल्लवीने सांगितलं होतं. तिथून एका प्रकारचे ग्लास मला आवडले ते घेतले. आणि परत लाइंटिंग बघायला पॅलेसला आलो. हळू हळू गर्दी जमत होती. लाईटींग सुरु झालं. फोटोत जे एक कळसासारखं दिसतंय ते पॅलेसमधलं मंदिर आहे.
इथून आम्ही आणि पल्लवी चामुंडा हिलला गेलो. म्हैसुरजवळ एक टेकडी आहे, तिथे एक मोठ्ठं मंदिर आहे. ओळख असल्याने आम्ही गाड्या सरळ आत नेऊ शकलो. पल्लवीची ओळख असल्याने गाभार्यात पुजा चालू होती तिथे गेलो. त्यांनी आम्हाला बाईकवरून चाललोय म्हणून तिथले दोन हार दिले बाईकला घालायला! आणि पुजा साहित्यही दिलं. ते आता आम्ही उद्या आम्ही बाईकला घालु. टेकडीवर वेगवेगळे व्ह्यु पॉईंट्स आहेत. तिथून संपुर्ण शहर दिसतं. ते पाहिलं.
आता रात्री जेवायला ज्वेल रॉकला आलो! रात्रीचे बारा वाजलेत, जस्ट रूमवर आलोय. उद्या मदुराईला जाऊ. रस्ता चांगला असावा अशी अपेक्षा. बघू काय काय होतंय.
***************************************************************************************
२ ऑक्टोबर २०१७
२ ऑक्टोबर २०१७ आज सकाळी बाहेर पडलो. म्हैसुर ते मदुराई ह्याचे तीन रूट्स आहेत. प्रत्येक जण वेगवेगळी माहिती सांगत होता. शेवटी गुगल ने सुचवलेला जो सर्वात लवकर पोहचवेल तो मार्ग घेतला. जाताना रुचीसागर नावाच्या हॉटेलमध्ये नाश्त्याला थांबलो. हॉटेल मालक पण असला भारी की मी जाताना एक टिश्यु पेपर घेतला तर त्याने थांबा म्हणून १०० चा एक पॅक आणून दिला. असू दे म्हणे तुमच्या प्रवासासाठी! आमच्या गाड्या आणि कपडे वगैरे पाहून तिथे आलेल्या काकांनी आम्हाला नेहमीप्रमाणे प्रश्न विचारायला सुरूवात केली! कुठून आलो.. कुठे चाललो. सगळं ऐकून घेतल्यावर म्हणाले "घरचे कसे काय जाऊ देतात? आम्ही इथे कुठे १० मिनिटावर गेलो तर १० फोन येतात." गाडी चालवून अंग दुखुन येत नाही का हे ही त्यांनी आवर्जुन विचारलं. आता सवय झाली म्हणालो. मग त्या काकांनी आम्हाला मदुराईपर्यंतचा मॅप अगदी गावांच्या नावासहित काढून दिला.










३ ऑक्टोबर २०१७
३ ऑक्टोबर २०१७ आज सकाळी साधारणपणे ६:३०- ७ ला उठून मंदिरात गेलो. अजिबात गर्दी नव्हती. स्पेशल तिकिट घेऊन ५ व्या मिनिटात गाभार्यात गेलो. तिथे आरती आणि नैवेद्य चालु होता. अर्ध्या तासाने तिथे देवीची दिव्यांमध्ये उजळलेली मूर्ती पहायला मिळाली. मंदिर फारच छान आहे. तिथली शिल्पं आणि खांब फार कलात्मक आणि आखीव रेखीव आहेत. त्याचे फोटो घेतले. गाभार्यातलाही एक फोटो घेता आला. मंदिराच्या आजुबाजुला हॉल्सचे फोटो काढले. मंदिराच्या परिसरात फिरुन तिथले हॉल वगैरे पाहिले. त्याच परिसरात मंदिर प्रशासनाचा नाश्ताचा स्टॉल होता. तिथे पोंगल आणि लाडू खाल्ले. पोंगल म्हणजे केळीच्या पानात गुंडाळलेली गरम गरम तुपात केलेली गव्हाची खीर होती. तिथला लाडू म्हणजे तिरुपतीच्या लाडवात अजून भरपूर तूप ओतायचं! छानच चव होती. मग बाहेर येऊन एक म्युझियम पाहीलं. मला मुर्तिंमधलं काही कळत नाही फारसं पण नटराजाची मुर्ती सुंदर होती. सगळीकडेच खांब फार सुंदर होते. बाहेर येऊन किरकोळ शॉपिंग केलं. पुर्षांसाठी काही मिळत नाही. हां.. एके ठिकाणी अगदी बोटाएवढ्या बारक्या बारक्या काकड्या मिळाल्या. त्या खाऊन रूमवर आलो. तिथे थोडावेळ विश्रांती घेऊन कन्याकुमारीसाठी निघालो. मदुराई ते कन्याकुमारी हायवे आहे. वाटेत एका ठिकाणी जेवायला थांबलो. नंतर आरामात थांबत थांबत ७.१५ पर्यंत कन्याकुमारीला पोहचलो. कन्याकुमारीच्या वेशीवरच विवेकानंद केंद्र आहे. तिथे बुकिंग करुन रुम घेतल्या. आल्या आल्या पहिल्यांसा मराठी पुस्तकं घेतली. इथे मराठीतली पुण्याला केंद्रात किंवा रामकृष्ण मिशनमध्येही मिळत नसलेली पुस्तकं बघायला मिळाली. ती लगेच विकत घेतली. आता उद्या सकाळी ६ ला सुर्योदय बघायला बीचवर जायचे आहे.

































४ ऑक्टोबर २०१७
४ ऑक्टोबर २०१७ आज सकाळी लवलर उठुन सूर्योदय बघायचा होता. अलार्म लावून ५ ला उठलो. आवरून तयार होऊन ५:३० ला सनराईज पॉईंट आहे विवेकानंद केंद्रात, तिथे गेलो. तोवर फटफटलं होतं. दगडातली एक जागा बघून कॅमेरा सेट केला आणि सूर्योदयाची वाट पहात बसलो. समुद्रात होणार सूर्योदय बघण्याची पहिलीच वेळ होती म्हणून छान वाटत होतं. थोड्यावेळानी सूर्य वर आला, त्याचे फोटो काढून ७ ला निघालो.
सूर्योदय बघायला जाताना मेमोरीयलचे पहिले दर्शन





सकाळी अशा फुलांचा सडा पडला होता
ह्यांनी पण दर्शन दिलं. सकाळी अलार्म सोबत मोराच्या केकांनी जाग आली - एकदम भारी वाटले












हत्तीच्या पाठीवरील झूल दगडाची आहे आणि त्याला कापडाप्रमाणे फोल्ड केला आहे





मंदिरात विकायला असणारे दिवे
हाल्फ डे टूर दरम्यान... vattai kottai किल्ल्यावर
सूचिन्द्रम मंदिर
हाल्फ डे टूर - दत्ताचे मंदिर
सनसेट पॉईंटजवळ टाईमपास
"रॉयल" पूजा!

सूर्यास्त

केंद्रातील रामायण दर्शन इमारत
केंद्रातील गणपती मंदिर
५ ऑक्टोबर २०१७
५ ऑक्टोबर २०१७ आज सकाळी उठून बाहेर पडलो, उठायला उशीर झाल्याने सनराईजचा प्लॅन कॅन्सल केला आणि सरळ गाड्यांना बॅगा बांधायला सुरुवात केली. मी बॅग बांधून केंद्राच्या रिसेप्शनला पोहोचलो तर तेथे पंढरपूर / माळशिरस भागातले चारपाच शेतकरी आजोबा भेटले. त्यांच्याशी गप्पा मारताना बघून मुंबईचे आणखी चार जण गप्पा मारायला आले. कुठले? काय? कुठे प्रवास वगैरे बोलणे झाले. मी 2018 च्या मार्च / एप्रिल मध्ये जो प्रवास ठरवला आहे तो प्रवास ते आज सुरू करणार होते फक्त नेमक्या उलट्या दिशेने... मग त्यांचा नंबर घेतला आणि नंतर एकमेकांना फोन करायचे ठरले. कन्याकुमारीतून बाहेर पडलो, केरळच्या छोट्या रस्त्यावरून गाडी चालवायला मजा येत होती. लहान रस्ते, बाजूने वाहणारे कॅनाल आणि मस्त हिरवाई.. पण हे दृष्य बदलेल असे वाटत होते ते बदलले नाहीच. हिरवाई चालेल पण लहान रस्ते आणि त्यावर पसरलेल्या लोकांचे काय? लहान रस्ते कुठे तरी मोठे होतील, गाव संपलं की ट्रॅफिक कमी होईल असा विचार करत गाडी चालवत होतो. ३० किमी नंतर लक्षात आलं की केरळातली गावं एकाला एक जोडून आहेत. एक गाव संपून दुसरं कधी सुरू झालं ते कळत नाही. बँकावरच्या पाट्या बदलल्या की गाव बदललं हे कळायचं! त्यामुळे आमचा स्पीड ड्रास्टिकली कमी झाला. कन्याकुमारीपासून 250 किमी आलो आहे पण वाटेत एकही किमान 5 किमीचा पॅच नव्हता जेथे गांव / घरे नव्हती.
असा अखंड ट्रॅफिकचा रस्ता होता
पद्मनाभ मंदिर
असे ताजे मासे पुण्यात (घरपोच) मिळायला हवेत!
स्ट्रॉबेरी सोडा, हा चेन्नईचा एक वेगळाच ब्रॅण्ड आहे ६ ऑक्टोबर २०१७
६ ऑक्टोबर २०१७ आज सकाळी अॅलप्पीहून निघायची तयारी करत होतो. तेव्हा खालचं रेस्टॉरंट सुरु झालं होतं. त्याला विचारलं काय तयार आहे तर म्हणाला इडीअप्पम तयार आहे. म्हणून इडीअप्पम आणि कॉफी मागवली. त्याने इडीअप्पम सोबत अत्यंत स्वादिष्ट कुर्मा दिला होता. एकदम मजा आली!
इडीअप्पम
कोचीदरम्यान मुसळधार पाऊस
उजव्या बाजुला बॅग खाली आलेली दिसतेय ते पाणी साचलंय
ब्रिज






७ ऑक्टोबर २०१७
७ ऑक्टोबर २०१७ आपण लहानपणी चित्र काढताना जसं काढायचो.. डोंगर आहे..त्याला हिरव्यागार झाडांनी लपेटलेलं आहे.. मग एखादं छोटसं घर आहे.. बाजुने एक नदी वहात आहे.. आणि ह्या सगळ्यातून एक रस्ता जातोय.. तो गुळगुळीत रस्ता म्हणजे आजचा रस्ता! नितांत सुंदर असा रस्ता होता. आम्ही सकाळी बाहेर पडलो. हायवे लगतच राहिलो त्यामुळे कन्नुर वगैरे गावं लगेच क्रॉस केलं. गेले दोन दिवस रस्त्यावर सतत गर्दी होती, तसं आज काहीही नव्हत. अगदी मोकळे चाकळे रस्ते. छान मेन्टेन केलेले. बाजुने मस्त नारळाची झाडं आणि बॅकवॉटर. आम्ही किनारपट्टीच्या बाजुने प्रवास करत असल्याने सतत कोणता न कोणता ब्रिज लागत होता. त्याच्या बाजुचा नजारा अप्रतिम! फक्त ब्रिज अत्यंत अरुंद असल्याने थांबून फोटो काढायला जमलं नाही. पण अगदी खरोखर बघण्यासरखा नजारा!
केरळातील सुंदर रस्ते

नारळपाणी ब्रेक
केरळात खुले आम गवेराचे होर्डीग्स लावले होते... (बादवे.. बसचे रंग बघा..)
मंगलोरकडे जाताना
फीश मील
फोर लेन हायवे
फोटोग्राफीचे प्रयोग
३०,००० किमी पुर्ण झाले
अजून एक व्ह्यू
मुरुडेश्वर
मुरुडेश्वर
मुरुडेश्वर
शंकराची भव्य मूर्ती
भूकैलास केव्ह्ज




८ ऑक्टोबर २०१७
८ ऑक्टोबर २०१७ काल थिल्चरी बाहेर पडल्या पडल्या एक टोल नाका लागला होता. तिथे आम्हाला एक ट्रक दिसला होता एम.एच ११ पासिंगचा. त्या मामांना ट्रक बाजुला घ्यायला लावला. आम्हाला पुढचा रस्ता नक्की कळत नव्हता. येल्लापुरहुन जावं की गोव्याहून वरती यावं हे क्लिअर होत नव्हतं. ते त्या मामांना विचारलं. त्यांनीही सगळी चौकशी केली. त्या मामांनी सांगितलेल्या रस्त्याने यायचं ठरवलं. आज मुरुडेश्वरला शंकराची मोठी मुर्ती आणि गोपुर बघण्याचा प्लान होता. त्यामुळे पहाटेच उठलो आणि ५:३० ला मंदिरात गेलो. मंदिर ६ ला उघडणार होतं. मी पहिलाच! त्यामुळे मागून आलेल्या लोकांना मी लाईनमध्ये उभं रहायला लावलं! मंदिर उघडल्यावर पहिला असल्यामुळे लाईन वगैरे काही भानगड नव्हतीच. दर्शन घेतलं. फोटो घेतले. गोपुरापाशी ६:३० लाच पोहचलो. ते मात्र ७:३० ला उघडणार होतं. त्यामुळे तिथेही मी पहिलाच! ७ च्या सुमारास तिथला माणूस आला. त्याने लगेच सगळं सुरु केलं. १८ व्या मजल्यावर जाता येतं. चारी बाजुंचा व्ह्यु बघता येतो. तिथे फोटो काढले आणि रुमवर आलो.
मुरुडेश्वर
गोपुराच्या १८ व्या मजल्यावरुन दिसणारा नजारा
मुरुडेश्वर मंदिर













भन्नाट भेळ
रस्त्यात पडलेले झाड
आक्खा मसूर
९ ऑक्टोबर २०१७
९ ऑक्टोबर २०१७ आजच्या प्रवासाला ७:३० ला सुरुवात केली. अगदी ओळखीचा रस्ता. खंडाळ्याजवळ वडा खाल्ला. ११ ला घरी पोहचलो. खूप छान ट्रिप झाली. बरोब्बर ३५०० किमी प्रवास आणि १२ दिवस! ह्या दरम्यान वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. जसं की केरळ मध्ये आपण कुठेही पाणी मागितलं की गरम उकळत्या पाण्याचा जगच समोर ठेवतात! मग प्लेन वॉटर मागितलं की रुम टेम्परेचरचं पाणी देतात. केरळमध्ये हायवेला लागून जी हॉटेल असतात, त्याच्या बाहेर एक माणूस हॉटेलच्या नावाची पाटी घेऊन दिवसभर बाहेर उभा रहातो! तसं उभं रहाण्याचं कारण काही कळलं नाही, पण तशी पद्धत आहे खरी! भरपूर इडली वडे, इडीअप्पम खाल्ले, फिश मोईली २-३ दा खायला मिळाली. तरी २-३ गोष्टी ह्या ट्रिपमध्ये जमल्या नाहीत. त्यासाठी एक वेगळी ट्रिप इकडे प्लान करावी लागेल. कर्नाटक किनारपट्टीला किल्ले आहेत बरेचसे. मुंबई ते कोचीन हा एक अत्यंत सुंदर रस्ता आहे. त्यावर स्पेशल राईड करायचा एक प्लान करायचा आहे. तर मग भेटत राहूच अशाच राईड्सवर! धन्यवाद!
In reply to अतिशय उत्तम वर्णन, आमच्या by जेम्स वांड
In reply to दुरुस्ती केली आहे! by पिलीयन रायडर
In reply to अतिशय उत्तम वर्णन, आमच्या by जेम्स वांड
In reply to धाग्याच्या सुरूवातीलाच आता by पिलीयन रायडर
In reply to वाह ! मोदकचं सीमोल्लंघन by स्रुजा
In reply to तुझ्या रेसिपी खपवु शकतेस ;)! by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ए.. ए.. शुक शुक, कोणंय रे..? by मोदक
In reply to ख्या ख्या ख्या - कंपुबाजीची by स्रुजा
In reply to मस्तय सफर.. पि रा ताई धन्यवाद by शलभ
In reply to मस्त भटकंती सुरू आहे. by एस
In reply to असे कांही नव्हते हो, आम्ही by मोदक
In reply to मोदक वाचतोय रे. फीलींग जळजळ by कॅप्टन जॅक स्पॅरो

In reply to ३ ऑक्टोबरचे अपडेट्स टाकलेले by पिलीयन रायडर
ते लिंक वरून धाग्यात त्या ओळीवर जायचं वैशिष्ट्य आवडलं. फारच सोयीचं. +१
त्रिवेंद्रमच्या वाटेवर तकलाइ गावाजवळचा पद्मनाभपुरम पॅलेस मोदकने पाहिला का?In reply to एका हॅाटेलच्या जाहिरातीतला by कंजूस
In reply to मंगळूर-हसन/ गोवा कुठून वरती by कंजूस
In reply to अजून ठरवले नाही. बहुदा मंगळूर by मोदक
In reply to गोकर्ण-हुबळी? by लई भारी
.

सकाळी अशा फुलांचा सडा पडला होताते बुचाचं (Indian cork) फूल आहे. खूप छान मंद गंध असतो बुचाच्या फुलांना. मधुमालतीच्या फुलांसारखा लांब देठ असतो, त्यामुळे देठ गुंफून वेणी करता येते.
In reply to ६ ऑक्टोबरचे अपडेट्स टाकले by पिलीयन रायडर
In reply to त्या चित्रातल्या पकिटावर DRY by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हायला!!! हो की! =)) by पिलीयन रायडर
In reply to बादवे तेथे मला अशी म्हणजे by मोदक
"मासा कोवळा आहे का जून?" यकदम क्लासिक प्रश्न आहे हा... हाहाहा, हीहीही, होहोहो !
रच्याकने, कोवळ्या माश्याला फारशी चव नसते. प्रत्येक माशाची खरी चव त्याची पूर्ण वाढ झालेली असल्यावरच लागते. त्यातही विशेषतः अंडी घालण्याच्या काळात मशाची चव अधिकच वाढते. माश्यांच्या अंड्यांच्या पिशवीला पेर म्हणतात. अंडी घालण्याच्या काळातला मासा म्हणजे "चवदार मासा + चटकदार पेर" अशी डबल बेनेफिट स्कीम असते. (इती : पेरीचा पंखा इए)
याला एक अपवाद म्हणजे "जवळा उर्फ बालकोलंबी". तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा गरमागरम कालवणभाताबरोबर किंवा तसेच नुसते ताज्या जवळ्याचे वडे म्हणजे अहाहा ! In reply to "मासा कोवळा आहे का जून?" यकदम by डॉ सुहास म्हात्रे
बालकोलंबी:)) कठिण आहे. हसूनहसून पोटात दुखायला लागलंय.
In reply to बालकोलंबी by निशाचर
In reply to आता पूर्ण शाकाहारी लोकांना by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आता पूर्ण शाकाहारी लोकांना by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बादवे तेथे मला अशी म्हणजे by मोदक
अरे वा ! नवीन लाईव्ह भटकंती