शेअरबाजारः येतील जातील परीट रगड, धुण्याचा दगड तोच आहे -गदिमा
99/00 म्हणजे Y2Kच्या जमान्यातली गोष्ट आहे..
HCL Tech चा पब्लिक ईश्शु तुफान हिट झाल्यानंतर आलेल्या प्रत्येक IPO वर गुंतवणुकदारांच्या उड्या पडु लागल्या, Oversubscription चे प्रमाण खुप वाढु लागले. अर्ज केल्यावर शेअर्स मिळणे दुरापास्त झाले. IPO मार्गे स्वस्तात मिळालेले शेअर्स् विकुन नफा हा सर्वात सोपा मार्ग, आणि दुसरीकडे जोराची आर्थिक निकड यामुळे सुरवातीला प्रत्येक IPOला अर्ज केल्यावर आम्ही मित्र लगेचच मुंगेरीलाल, शेखचिल्ली अशा भुमिका करायला सुरवात करीत असु, होणाऱ्या फायद्याची विल्हेवाट कशी लावायची याचेही आमचे प्लॅन्स तयार असत... ते अगदी पार रिफंड ऑर्डर यईपर्यंत. आम्ही 'तिच्यावर' मनापासुन प्रम करीत असणारे,'तीने' आपल्याकडे किमान एखादा कटाक्ष टाकावा म्हणुन झुरणारे... पण तिने हिंग लावुन विचारु नये ..अशीच अवस्था झाली होती Allotment बाबत.
याच धुमश्चक्रीत बाजारात आलेला Kale Consultants चा ईश्शु खुप भाव घेवुन जाणार असे वाटत होते,आम्ही मित्र आमच्या ऐपतिप्रमाणे अर्ज करावे या विचारांत होतो,पण ईश्शुकरिता जवळ्जवळ 75 पट भरणा झाल्याची बातमी कळल्यावर आम्ही ढेपाळलो. परत एक नकार पचवायची तयारी आम्ही करु लागलो.
संध्याकाळी मी काही कामाने कोठारी पायोनियर म्युचुअल फंडच्या (म्हणजेच आजचा फ्रॅन्क्लीन टॅम्प्ल्टन ) जे.एम रोडवरील ऑफिसमध्ये गेलो. तेंव्हा एक तरुण, तरतरीत,हुषार अधिकारी तेथील कार्यभाग सांभाळायचे (आजमितीस ते म्युचुअल फंड व्यवसायांतील एक वरिष्ठ अधिकारी आहेत) गप्पांच्या दरम्यान पुर्ण बाजारांत फक्त कोठारी फंडाकडेच Infotech हा त्या क्षेत्राला(Sector) समर्पित (Dedicated) फंड असल्याने नियमानुसार शेअरवाटपांत या फंडाने केलेल्या मागणीला प्राधान्यक्रमाने ( preferential Allotment) शेअर द्यावेच लागतात आणि फंडाने खुप मोठा मागणी अर्ज केला आहे, सबब या IPOतील काही लाख शेअर्स हे Kothari Pioneer Infotech Fund या योजनेला मिळायलाच हवेत अशी मौलिक माहिती साहेबांनी मला दिली..नक्की किती शेअर्स मिळतात हे ही आपल्याला कळेल असे ते म्हणाले.
झाले.. आम्ही सुतावरुन स्वर्ग गाठला.. शेअर्सची मोठी संख्या आणि लिस्टींगला प्रतिशेअर होणारा नफा याचे प्रतिबिंब युनिटसच्या किंमतीत पडणार होते हे निश्चितच होते त्या अनुषंगाने Kale Consultants च्या शेअरचा भाव पहिल्या दिवशी 100रु ने जास्त असेल तर कोठारीच्या योजनेला किती रुपयांचा फायदा होईल आणि त्या योजनेची NAV कितीने वाढेल अशा आकडेमोडची वेगवेगळी समिकरणे मी मांडली, शिवाय त्यावेळी Funds मधील गुंतवणुकीवर Entry Load असे ज्यातील बरासचा भाग कमिशन म्हणुन मला परत मिळे आणि ब्रोकरेज,(जे त्याकाळी जास्त होते) वाचत असे ते वेगळेच, असा सारासार विचार करुन मी एक निर्णय घेतला... IPOसाठी जवळचे पैसे गुतविण्यापेक्षा या शेअ(ची बाजारात नोंद (listing) होण्याच्या अगदी आधी आपण Infotech Fundमध्ये ते गुंतवायचे..
अहो भाग्यमहो भाग्यं... .आमच्या अपेक्षा फलद्रुप झाल्या, नक्की भाव आठवत नाही, पण Kale Consultants चे लिस्टींग फार वाजत गाजत झाले , सहाजिकच योजनेच्या NAVत मोठी वाढ झाली.. आम्हाला 3/4 दिवसांत धसधशीत फायदा झाला...
दीड दशकाहुनही आधी केलेला हा उपदव्याप आज आठवायचे कारण म्हणजे IPO बाजारातील आजकालची तेजी..
Indian Energy Exchange Ltd (IEX) या कंपनीचा IPO येत्या 09 ते 11 ऑक्टोबर दरम्यान येवु घातला आहे. कंपनीने 1,645-1,650 अशी किंमत निश्चित केली आहे. बाजाराच कल पहाता ईश्शुला उत्तम प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे. आता दुसरीकडे बाजारांत X. X. Ltd नावाची, XXX समुहातील, नोंदणीकृत कंपनी आहे.(ताजा बंद भाव 124.30) तीचा वार्षिक अहवाल (annual report) चाळला असता पान क्र. GD वर एक रंजक तथ्थ्य आहे.. या कंपनीकडे IEX चे थोडेथोडके नव्हे तर 3,03,286 शेअर्स आहेत जे साधारण 709 रु प्रतिशेअर भावाने विकत घेतलेले दिसतात. म्हणजेच IEXची अगदी चालु किंमतीला नोंदणी झाली तरीही त्या दिवशीच XXX ला 30 कोटी रुपयांचा फायदा होईल.
गंमत म्हणजे याच कंपनीकडे Suryoday Small Finance Bank या येऊ घातलेल्या चर्चित IPOचेही 1,637,013 शेअर्स आहेत (फक्त) रु. 109 भावाने घेतलेले..
मी पुण्यांतील एका कार्यालयात अंतरी वसता नारायणे..लक्ष्मीसी काय उणे..I ज्याची लक्ष्मी, आपणे बळकटे धरावा II असे संतवचन वाचले होते त्याची आठवण होवुन मी आपल्याला विचारायचंय की जयासी झाले आहे 'वाटप' ,आपणे.... या सुत्राने IEX/ Suryoday ह्या IPOs च्या मागे धावण्यापेक्षा ह्या, XX कंपनीतच थेट गुंतवणुक करावी का ??
जाता जाता, बाजारांत नोंद होण्यापुर्वीच एखाद्या कंपनीचे समभाग विकत घेता येतात, आम्ही या प्रकारे RBL Bank (pre IPO buy rate 125 ), ICICIPru Life (225), BSE (500) हे शेअर्स विकत घेतले होते जे बाजारांत आता लिस्ट झाले आहेत. या काहीश्या नवीन प्रकाराबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आपले स्वागत आहे. -
प्रसाद भागवत 9850503503
डिस्क्लेमरः - या पोस्टमधील मजकुर केवळ सर्वसामान्य माहितीकरीता आहे त्यातुन कोणताही समभाग घेण्याची/विकण्याची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शिफारस केलेली नाही वा अशा संभाव्य व्यवहारापासुन विशिष्ट नफा होईल किंवा नफा होईलच, याचीही हमी दिलेली नाही
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
छान आणि उपयुक्त माहीती.
सेबीच्या इन्सायडर ट्रेडिंग
कृपया गैरसमज नसावा, मला
हे मॉरल पोलिसिंग कसं काय बुवा
कदाचित इन्सायडर ट्रेडिंग मधुन
हम्म, पूर्णपणे पटलं नाहीये.
कोणी कोणत्या मुद्द्याला किती
तात्त्विक मुद्दा:
एका कुतुहलजनक प्रश्नावरुन
त्यावेळ्च्या नियमानुसार आनि
कृपया XXX कंपनीचे नाव कळवा
लिस्टिंगनंतर IPO चं नक्की काय
जुगार..धोका..या विषयीच्या
सोपे आहे.
..तुम्हाला माहिती द्यायचीच
छान वाचनीय ...
धन्यवाद. पण आपण माझ्या WA
लिहा हो सर बिनधास्त,
हे SME IPO बद्दल आहे का ?
SME IPO ?? नाही. यातुन खरेतर
Tata Technologies च्या
या बाबत माझ्याकडे निश्चित अशी
धन्यवाद
गुंतवणूक ही व्यक्ती सापेक्ष
The IPO offers shares of face
..तुम्हाला माहिती द्यायचीच
भागवत साहेब,
या वाक्याचा अर्थ काय?
जाता जाता, बाजारांत नोंद
जाता जाता, बाजारांत नोंद होण्यापुर्वीच एखाद्या कंपनीचे समभाग विकत घेता येतात, आम्ही या प्रकारे RBL Bank (pre IPO buy rate 125 ), ICICIPru Life (225), BSE (500) हे शेअर्स विकत घेतले होते जे बाजारांत आता लिस्ट झाले आहेत. या काहीश्या नवीन प्रकाराबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आपले स्वागत आहे.भागवत साहेब, ती जी काही प्रोसिजर आहे ती इथे उधृत केलीत आणि मग संपर्काचे आवाहन केलेत तर ते उचित दिसेल. कारण प्रायमरी आणि सेकन्डरी मार्केट आणि त्या अनुषंगिक कर्ब मार्केट्सच्या उलाढाली त्यातले धोके सामान्यांना माहित नसतात आणि माझा प्रवास त्या सर्व गल्ल्यां मधून झाला असल्याने मिपाकरांना (अर्थात, ज्याना मार्केटची सर्वागीण ओळख नाही )सांगावेसे वाटते कि कुठलेही प्रोसिजर पूर्ण समजल्याशिवाय(कुठल्याही मार्केटला) पैसे लावू नका. प्री आय पी ओ साठी आजही मला बोलावणे आहे तसेच सेकंडरी मार्केट मधले शेअर्स डिस्काऊंट मध्ये मिळतात तिथेही मला शिरकाव आहे पण हे सर्व मोह कसे टाळावेत ते इथे लिहावे असे मला वाटते. तुमची प्रोसिजर (प्री आय पी ओ allotment) कदाचित शुद्ध सात्विक कायदेशीर असेलही त्या बद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही पण जर आय पी ओ चे मार्केट गरम असताना तुम्ही आय पी ओ मध्ये शेअर्स कसे मिळत नाहीत आणि ते हमखास मिळावेत म्हणून काय करावे हे सांगत असाल तर माझ्या सारख्याला ते संशयास्पद वाटते आहे. तुमचे इतर लेख आणि आजचा लेख ह्यात बराच फरक जाणवतो आहे आणि माझ्यासारख्या तुमच्या लेखांच्या चाहत्याला त्याने मानसिक त्रास होतो.भागवत साहेब आपण जी माहीती
आणि हो हा
लेख, लेखाचा उद्देश, वाचकांचा
भागवत साहेब आपण जी माहीती