मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खूप दूध शिल्लक आहे

गम्मत-जम्मत · · पाककृती
घरी २ लिटर दूध शिल्लक आहे. खाणारी तोंडे २ च आहेत. कृपया आरोग्य दायक पाकृ/ पर्याय सुचवा. १. पिउन टाकणे हा पर्याय करून झाला आहे. जास्त प्यायला जमत नाही. २. नवरोबा जास्त गोड खात नाही. हे मला प्रश्नोत्तरे मध्ये लिहायचे होते. पण access denied. धन्यवाद.

वाचने 20276 वाचनखूण प्रतिक्रिया 31

रेवती Sat, 09/23/2017 - 18:48
१) पनीर करा. त्यात एक लीटर संपेल. २) उरलेल्या दुधाचा खवा करा. ३)किंवा अर्धा लिटर कणिक भिजवायला म्हणजे दशम्या करायला वापरा. या दशम्या टिकावू आहेत म्हणून प्रवासात नेतात. मग प्रवास प्लॅन करा. तेवढेच फिरणे होईल. ४) उरलेल्या अर्ध्या लिटरधील पाव लिटर दुधाचा चहा करा व बेकरीतून खारी, टोस्ट असे आणून त्याबरोबर संपवा. मी चहा घेत नाही पण आमच्या पूर्वीच्या शेजार्‍यांना हे प्रकार आवडायचे म्हणून सुचवतिये. ५)अजूनही दूध उरले आहेच ना, हरभरा डाळीचे पीठ थोड्या थोड्या दुधात कालवून चेहर्‍याला मास्क म्हणून लावा. अठवडाभरात सतेज कांतीचा लाभ होईल. ६) आता इतकं छान दिसल्यावर नवरा खूष होऊन शॉपिंगला नेईल. संसारी बायकांना कितीही शॉपिंग केलं तरी स्वयंपाकघारील एखादी संपलेली डाळ, रवा, कणिक असे आठवतेच. मग ग्रोसरीत जावा. तुम्हाला हवी ती खरेदी करा. आपल्याकडे दोन लीटर दूध खपत नाही हे एव्हाना लक्षात आले असेलच. मग एकच लीटर विकत घ्या व तेवढे तरी संपतेय का हे बघा. (तुमच्याकडून धपाटे मिळण्याआधी मी पळते)

In reply to by रेवती

अभिजीत अवलिया Sat, 09/23/2017 - 19:04
वा. ह्याला म्हणायचे उत्तर. असो. पण घरी फक्त २ तोंडे असताना इतके दूध मुळात आणलेच कशाला हा प्रश्न पडून राहिलाय.

पैसा Sat, 09/23/2017 - 21:01
दही लावा, ते जमेल तेवढे संपवा. मग दह्याचे काय करू म्हणून धागा काढा.

ज्ञानेश Mon, 09/25/2017 - 14:50
नमस्कार, एक चांगला पर्याय... गरीब मुलांना द्या. बऱ्याच वेळा सिग्नल वर लहानमुले असतात, त्यांना दिले प्यायला तर पुण्य हि मिळेल आणि मानसिक समाधान त्याहून हि जास्त.

In reply to by कपिलमुनी

पगला गजोधर Mon, 09/25/2017 - 19:53
नै मले भीती वाटून राहिलेली, की तुमाले "खरवसची " रेशिपी द्यायची व्हती का कांय ? म्हणून एवढी तपशिलात चौकशी करताय दुधाच्या उद्गमाबद्दल ! :)

In reply to by पुंबा

अभ्या.. Mon, 09/25/2017 - 19:32
चा बि करायची अन सग्ग्ग्गळ्या शेजार्‍यांना बोल्वायची काय गरज आहे? नुसते एखाद्याला बोलावले तर रेकॉर्ड होईल म्हणा.

अभिदेश Tue, 09/26/2017 - 23:28
एवढ्या लोकांना विचारले आणि त्यांनी एवढे सल्ले दिले .. निदान काय केले हे लिहिण्याचे सौजन्य दाखवा.

गम्मत-जम्मत Wed, 09/27/2017 - 17:06
धागा काढण्या आधी च्या माझ्या कल्पने प्रमाणे केले. दही लावले मग त्याचा चक्का केला. आणि मग अर्थात श्रीखंड. भरपूर जायफळ घालून. अप्रतिम झालेलं. मला वाटलं होतं इथे विचारून काही नवीन कल्पना मिळेल. असो. @पिंगु- पनीर चा पर्याय ही चांगला आहे. दूध 'शिल्लक 'राहिले होते. मुद्दाम इतके का आणेन २ साठी!! खवा वगैरे मेरे बस की बात नाही ओ.. धन्यवाद!!

In reply to by गम्मत-जम्मत

पगला गजोधर Wed, 09/27/2017 - 17:24
दूध 'शिल्लक 'राहिले होते. मुद्दाम इतके का आणेन २ साठी!
पण शिल्लक राहण्यासाठी, आधी त्याला "आणावेच" लागते न ?