नमस्कार,
यंदा दिवाळी मध्ये आई आणि दोन आज्या ह्यांना घेऊन एखाद्या धार्मिक स्थळी अथवा अशी एखादी जागा जिथे शांतपणे ध्यानधारणा करता येईल, राहायची व खायची सोय योग्य असेल, आणि जिथे शांतपणा अनुभवता येईल अशा ठिकाणी जायचा मानस आहे. साधारण ५-६ दिवस हाताशी आहेत. शक्यतो जिथे खूपच गर्दी असेल ती ठिकाणे टाळायची आहेत (अर्थात दिवाळी सुट्ट्यांमुळे हे कितपत शक्य आहे माहित नाही ). गोंदवल्याला आणि निंबाळ ला साधारण वर्षातून ४-५ वेळा जाणे होते त्यामुळे ह्यावेळेस नवीन ठिकाणी जायचा विचार आहे. गेले काही महिने रमण महर्षिंबद्दल बरेच वाचन झाल्यामुळे अरुणाचल ला जायची इच्छा आहे पण तिकडे राहायची सोय होते का / बंगळुरू वरून कसे जावे / कुणाला संपर्क करावा लागतो आणि आजींना पुणे - अरुणाचल - पुणे प्रवास झेपेल का असे प्रश्न आहेत. कोणाला माहिती असल्यास त्याबद्दल जरूर सुचवावे. नाहीतर इतर ठिकाणे सुचवावी.
दिवस :- ५-६
जाणार कसे:- सर्व पर्याय खुले आहेत (विमान- रेल्वे - चार चाकी)
निघायचे ठिकाण - पुणे
वाचने
5123
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
पोंडीचेरी
सिक्क्कीम
अरूणाचल मध्ये लोअर दिबांग
मनोभवे देशदर्शन- अरुणाचल
अरुणाचल प्रदेश नव्हे, त्यांना
In reply to मनोभवे देशदर्शन- अरुणाचल by प्रकाश घाटपांडे
अगदी बरोबर
In reply to अरुणाचल प्रदेश नव्हे, त्यांना by संजय पाटिल
अरुणाचल प्रदेश नव्हे, त्यांना
In reply to मनोभवे देशदर्शन- अरुणाचल by प्रकाश घाटपांडे
होय, असेच दिसते
In reply to मनोभवे देशदर्शन- अरुणाचल by प्रकाश घाटपांडे
माहिती साठी धन्यवाद
In reply to होय, असेच दिसते by समर्पक
.
रमणाश्रम
In reply to . by मूकवाचक