अजून एक हत्या , अजून एक संधी !!
पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. आज स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनीही भारतात माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही, बळी तो कान पिळी हाच कायदा आहे, कुणाच्या शेपटावर कधी पाय पडेल व आपण जीव गमावून बसू अशा समाजात व व्यवस्थेत आपण राहतो याची पुन्हा एकदा भयप्रद जाणीव करून देणारी ही अतिशय निषेधार्ह हत्या आहे.
(१) प्रत्यक्षात व सोशलसह सर्व माध्यमातूनही अराजकीय, उजव्या, मध्यममार्गी, डाव्या अशा सर्व लोकांनी या हत्येचा निषेध केला आहे.
(२) गेल्या तीन-चार वर्षात बावीस पत्रकारांची हत्या झाली आहे. कर्नाटकाचा विचार करायचा झाला तर गेल्या दोन वर्षात कलबुर्गी व आता लंकेश या दोन डाव्या तर उजव्या विचारसरणीच्या १२ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत.
(३) इतर अनेक हत्यांप्रमाणेच याहीवेळी मारेकरी पकडले जाणे , कायदा व सुव्यवस्था सुधारणे वगैरे बाबींची निष्फळ उजळणीही होईल.
(४) पण यावेळी हत्या डाव्या व्यक्तीची झाल्याने देशभरात कशी जबरदस्त उजवी असहिष्णुता थैमान घालते आहे , मोदीविरोधात एक शब्दही बोललात की पडलाच मुडदा अशी परिस्थेती आहे वगैरे तुफानी प्रचारकार्य करायची नामी संधी आपल्या साथींसाठी चालून आली आहे.
(५) या संधीचा मेणबत्या मोर्चे, माध्यमे, सोशल माध्यमे, संकेतस्थळे यावर त्वरित लेख व प्रतिसाद पाडून लाभ घ्यावा ही विनंती.
या संदर्भात काही महत्वाच्या सूचना.
(०) साथींनो, आपल्यासमोर संघ व मोदी हेच दोन भीषण प्रश्न आहेत त्यामुळे ते सोडवण्यासाठी सत्य, देशहित, समाजहित, योग्यायोग्य... कुठल्याही मूल्यांचा बळी द्यायला लागला तरी ते आवश्यक आहे.
(१) लंकेश उजव्याविरोधी होत्या एवढेच लिहावे. त्या नक्षलवाद्यांशी संबंधित होत्या, त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या मालकीचे प्रकाशन त्यांना सोडावे लागले. हे लपवावे. तसेच सध्या त्या सरकारला काही नक्षलवाद्यांच्या माफी/पुनर्वसनासाठी मदत करत होत्या त्यामुळे डाव्या चळवळीत त्यांना शत्रू निर्माण झाले असू शकतात हे नजरेआड करावे. असा खोटेपणा करणे मनाला न पटल्यास सूचना क्र. ० तीनदा वाचणे.
(२) संघ, भाजप वगैरे समस्त उजव्यामधील सर्व पातळीच्या हजारो नेत्या कार्यकर्त्यांनी हत्येचा निषेध केला आहे याकडे दुर्लक्ष करावे व माचोमॅनइनझांबिया या फेसबुकवरील सुमारे सव्वातीन फ्रेंडस असणार्या प्रोफाईलची सेलिब्रेशन ची प्रतिक्रिया ही सर्व उजव्यांची प्रतिक्रिया आहे असे मानावे. असे प्रोफाईल न सापडल्यास तयार करावे व स्क्रीनशॉट पाठवावे. असे करणे पटत नाही ? सूचना क्र. ० तीनदा वाचा.
(३) एकदा ही तयारी झाली की ही हत्या हिंदुत्वावाद्यांनीच केली आहे. देशभरात कशी जबरदस्त उजवी असहिष्णुता थैमान घालते आहे , मोदीविरोधात एक शब्दही बोललात की पडलाच मुडदा अशी परिस्थेती आहे वैग्रे तुफानी प्रचार करणारे लेख लिहावेत. सहिष्णुता, अभिव्यक्तीस्वातंत्र्य वैग्रे मूल्यांचा असा स्ट्रॉमॅन तयार करावा की नक्की कोण , किती व का मारले जात आहेत, खरा प्रश्न काय आहे याकडे लोकांचे लक्षच जाणार नाही.
(४) वेळ ही अतिशय महत्वाची आहे. तपास सुरू होउन अधिकृत संशयित कोण आहेत हे कळायच्या आत हा सगळा धुरळा उडवून देणे आवश्यक आहे. म्हणजे नंतर निष्पन्न काहीही झाले तरी हे असहिष्णुता वगैरे लोकांच्या डोक्यात फिट्ट बसते. न पटल्यास.....
(५) साधारणतः श्री. राहुल गांधींएवढा नैसर्गिक आयक्यू असणारे काही साथी राज्य सरकारला जाब विचारत आहेत. पुन्हा पुन्हा आपल्या या साथींच्या चुका होत असल्याने हे सांगणे आवश्यक आहे की या वेळी राज्य सरकारचा राजीनामा मागू नये तर मोदींचा मागावा. खालील कोष्टक पाठ करावे.
_______________________________________________________________________________________
हत्येचे राज्य >>>> राजीनामा कोणाचा मागावा?
_______________________________________________________________________________________
कर्नाटक, केरळ, बंगाल, पंजाब, त्रिपुरा, तेलंगण, दिल्ली >>>> केंद्र सरकार _______________________________________________________________________________________
इतर सर्व राज्ये >>>> राज्य सरकार व केंद्र सरकार
________________________________________________________________________________________
(६) जरी आपल्याला कोणालाच त्या माहित नव्हत्या तरी हत्या झाली असल्याने त्या अतिशय प्रसिद्ध थोर विचारवंत व उजव्या सरकारला सर्वात मोठा धोका होत्या हे मनावर बिंबवणे आवश्यक आहे ( आधी आपल्या मग इतरांच्या). त्या एक भुरट्या पत्रकार असून भाजप नेत्याच्या खोट्या बदनामीच्या अरोपाखाली सहा महिन्याची शिक्षा झालेल्या convicted criminal आहेत हे लपवणे आवश्यक आहे. नाही तर उजवे त्यांचा विरोध कायदेशीर मार्गाने यशस्वीरित्या करत होते हे उघड होऊन हत्येच्या मोटिव्ह बद्दलच शंका निर्माण होईल. असे करणे न पटल्यास सूचना क्रमांक शून्य वाचणे.
(७) सर्वात महत्वाचे : "देशभरात जबरदस्त उजवी असहिष्णुता थैमान घालते आहे , मोदीविरोधात एक शब्दही बोललात की पडलाच मुडदा अशी परिस्थेती आहे " हा आपला प्रचार आहे, कृपया तेच खरे मानून आपले लेख प्रसिद्ध करायला घाबरू नये. हजारो साथी रोज लाखो लेखातून मोदी व संघावर अक्षरशः आग ओकत आहेत. त्यातले कोणीही मरत नाहीत, संघ दुर्लक्ष करतो, तर काही जणांना भक्त जास्तीत जास्त काय करतात तर अधून मधून ट्रोल करतात. तेंव्हा न घाबरता "देशभरात जबरदस्त उजवी असहिष्णुता थैमान घालते आहे , मोदीविरोधात एक शब्दही बोललात की पडलाच मुडदा अशी परिस्थेती आहे " हे सगळीकडे पसरवण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
याद्या
10119
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
अगदी चपखल लेखन! बैलाक्षाचा
बैलासारख्या मुक्या
In reply to अगदी चपखल लेखन! बैलाक्षाचा by श्रीगुरुजी
+१
In reply to अगदी चपखल लेखन! बैलाक्षाचा by श्रीगुरुजी
+१२३४५६७८९०
In reply to अगदी चपखल लेखन! बैलाक्षाचा by श्रीगुरुजी
मस्त लेखन!जरी आपल्याला
हा लेख राहूल गांधींना वाचायला
सगळे प्यपर वाले दोन दोन पान
लिखाण जोरात आहे. लोल लोल गोल
+१
फेक्युलर्स
फेक्युलर्स
हा लेख राहूल गांधींना वाचायला
विचारांची लढाई ही विचारांनीच
विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे.
In reply to विचारांची लढाई ही विचारांनीच by एस
मामाजींशी सहमत! :-)
In reply to विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे. by मामाजी
लेख खरंच आवडला. सगळे मुद्दे
हत्या कुठे झाली:-कर्नाटक मधे
पण मुळात ही हत्या ती व्यक्ति
एकाला तर ह्यात फेमिनिझम आहे
हे असले """एका बोलणार्या
संघ स्वयंसेवकांच्या व काश्मिरी हिंदूंच्या हत्या विसाराव्यात
हे ट्वीट आणि मृत व्यक्तीविषयी
In reply to संघ स्वयंसेवकांच्या व काश्मिरी हिंदूंच्या हत्या विसाराव्यात by गामा पैलवान
ठीके. कुत्री काढा ....
In reply to हे ट्वीट आणि मृत व्यक्तीविषयी by मोदक
हे सनातन वाले बाष्कळ बडबड
डोळे उघडा साहेब
In reply to हे सनातन वाले बाष्कळ बडबड by थिटे मास्तर
आता आम्हि कसले मास्तर आहोत ते
In reply to डोळे उघडा साहेब by गामा पैलवान
तुम्ही दोघेही एकच मुद्दा
In reply to आता आम्हि कसले मास्तर आहोत ते by थिटे मास्तर
तेच तर सांगतोय ....
In reply to तुम्ही दोघेही एकच मुद्दा by मोदक
No doubt its a complete
मानसपुत्र
बरोबर
In reply to मानसपुत्र by रमेश आठवले
साधकांचे बौद्धिक
असा
हे थिटे मास्तर
जाणकारांनी आयडीचा माग काढावा.
लन्केश यांच्या लिखाणाचा दर्जा
जबरदस्त...
या बाई एवढ्या मोठ्या पत्रकार
In reply to जबरदस्त... by टर्मीनेटर
आपल्यापैकी किती लोकांना
In reply to या बाई एवढ्या मोठ्या पत्रकार by धनावडे
या काही एवढ्या मोठ्या पत्रकार
In reply to आपल्यापैकी किती लोकांना by जेम्स वांड
जे लोक पैश्यासाठी इमान विकतात
ह्या बाबतीत शंभर टक्के सहमत पटाईतजी
In reply to जे लोक पैश्यासाठी इमान विकतात by विवेकपटाईत
हत्येचं समर्थन
हे हत्येचे समर्थन नसून
In reply to हत्येचं समर्थन by मराठी कथालेखक
तुम्ही म्हणता त्याला १००% सहमत आहे सर
In reply to हे हत्येचे समर्थन नसून by सुबोध खरे
डावे, पुरोगामी आत्ता आत्ता
कोणताही पत्रकार मेला तर मला
सगळे पत्रकार नव्हेत.
In reply to कोणताही पत्रकार मेला तर मला by Ram ram