मला आलेला अनुभव -१
साधारण ३ वर्षांपूर्वी घडलेली ऐक घटना.
मला त्या दिवशी कंपनीत काही कामानिमित्य लवकर सकाळी जायचे होते. त्यामुळे मी कंपनीच्या नेहमीच्या बससाठी न थांबता बाइकवरून जाण्याचे ठरविले. चिंचवड ते मरकळ असा रूट होता. आदल्या दिवशीच नवीन हेल्मेट आणले होते. ते परिधान करून मी निघालो. ऑटो क्लस्टर च्या चौकात आलो. आता तिथे बरेच बदल झाले आहेत. त्यावेळेस तिथे ट्रॅफिक सिग्नल पण नव्हते. परंतु त्यावेळी समोरून येणारा काटकोनातील रस्ता पूर्ण दिसतं नसे. बाईक चा वेग ७० ते ८० च्या घरात होता. चौकात आलो. समोरून काटकोनी रस्तातून त्याच वेळी एक वेगात मारुती कार चाललेली होती. ... एक क्षणात मनात विचार आला कि थांबावे .. पुढे जाणे धोक्याचे आहे.. पण त्याचवेळेस दुसरा (कु)विचार केला कि अजून आपला वेग वाढवावा नक्कीच त्या कारसमोरून आरामात निघून जाऊ. मी तसाच वेग वाढवून पुढे निघालो. तिकडे , कारचालकाला अचानक मी समोर आलेला पाहून नक्की काय करावे ते समजले नाही. .. तो वेग कमी करायचा विचार करेपर्यंत मी बरोबर समोर मध्यभागी आलो होतो. माझा, कारच्या वेगाचा अंदाज सपशेल चुकला होता. कार व माझ्या बाईकची धडक झाली होती. मी हवेत उडालो व जमिनीवर तीन ,चार गिरक्या घेऊन डोक्यावर खाली पडलो. जोराचा आवाज व अपघात बघून आसपासचे लोक धावत आले. मला पायाला लागले होते. हेल्मेटमुळेच डोक्याला काही पण लागले नव्हते. २ मिनीटं मला भोवळ आली. नंतर उलटी पण आली. पण नंतर पूर्णपणे मी भानावर आलो. बाकी लोक निघून गेले होते पण मारुती कारचा ड्राईव्हर थांबला होता. मला त्याने माझा इतरत्र पडलेला मोबाइलला दाखवला व त्याच्याकडे सुरक्षित आहे हे दर्शविले. मला कंपनीचा नंबर विचारला व त्यावर त्याने कंपनीतील माणसास बोलाविले. तोपर्यंत मला काहीहि हालचाल करू नये म्हणून सांगितले. १० मिनिटात कंपनीतील ऐका माणसाकडे माझी बाइक दिली. व त्या दोघातिघांनी मिळून मला हळूहळू उठवले व त्याच्याच कारमध्ये बसवून भोसरीतील एका हॉस्पिटल मध्ये सॊडवले. नंतर केवळ पायाला काहीशी दुखापत झाल्याचे निदान झाले. बाकी कुठे मुका मार लागला नव्हता.. ... हॉस्पिटल ने माझ्याकडून उपचारांचे काहीच पैसे (जरी फारसे झाले नसले तरी) घेतले नाहीत. ( नंतर मला कळाले कि ड्राइव्हर ने तसे सांगून ठेवले होते.).
१० दिवसानंतर मी पुन्हा नेहमीसारखा पूर्ववत झालो. पण त्या ड्राइव्हर ने दाखवलेली मदत, तत्परता कायम स्वरूपी लक्षात राहिली. अगोदर पासून मी हेल्मेट घालायचो , पण त्या दिवसापासून हेल्मेट चे महत्व समजले. तसेच वेगावर नियंत्रण नसणे म्हणजे काय हे पण मला समजले.
आलेला अनुभव खरच वेगळा होता.
याद्या
7347
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
नशीबवान आहात. नेहमी हेल्मेट
लोकं हेल्मेटचा आळस का करतात ते कळत नाही.
In reply to नशीबवान आहात. नेहमी हेल्मेट by मोदक
पण इतका वेग ठेवायचाच कशाला
बाईक चा वेग ६० च्या वर नसावाच
10 वर्षा पूर्वी पुण्यातील
जिवावरच्या प्रसंगातून वाचला
म्हात्रे सर ..
In reply to जिवावरच्या प्रसंगातून वाचला by डॉ सुहास म्हात्रे
एक विचित्र थेअरी सांगू का..?
हेल्मेट नेहेमीच वापरा
अतिशय उपयुक्त सल्ला!
In reply to हेल्मेट नेहेमीच वापरा by सौन्दर्य
एक सल्ला - आपण दुचाकी जर
In reply to हेल्मेट नेहेमीच वापरा by सौन्दर्य
हेल्मेट नेहमीच वापरा
या आधी १-२ वेळेस चित्र/ इमेज / पिक्चर टाकायचा प्रयत्न
In reply to हेल्मेट नेहमीच वापरा by अनन्त अवधुत
त्या दिवसानंतर मी
मुंबईत दुचाकी चालवताना
In reply to त्या दिवसानंतर मी by ओरायन
वाहन(कुठलेही) चालवत असतांना
पण त्याचवेळेस दुसरा (कु)विचार
मला परवा आलेला अनुभव , मी
ज्याय्ला
भौ
In reply to ज्याय्ला by इरसाल
तिकडे ✋ पंजा दाखवायला शिल्लक
In reply to भौ by नाखु
ओ
In reply to भौ by नाखु
रिक्शा बाबतीत ऐक गोष्ट मला
माझाही काहीसा असाच अनुभव...
काही लोक हेल्मेटला विरोध का