साहित्यः
चांगली पिकलेली ३ केळी,
अर्धी वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता),
यात मावेल एवढी कणीक,
तळण्यासाठी तेल.
कृती:
केळी छान कुस्करून घेउन त्यात साखर घालावी.
गॅसवर ठेवून सतत हलवत रहावे.
२-३ मिनिटांत साखर विरघळली की गॅस बंद करून मिश्रण थंड होउ द्यावे.
नंतर या मिश्रणात बसेल एवढीच कणीक घालून (मला दीड वाटी कणीक लागली) घट्ट पीठ भिजवून ठेवावे.
साधारण अर्ध्या तासाने कणीक खूपच घट्ट वाटली तर दुधाचा शिपका मारून कणीक सारखी करून नेहमेसारख्या पुर्या लाटून तळून घ्याव्यात.
या पुर्या अजिबात पाणी नसल्याने बर्याच टिकतात. त्यामुळे प्रवासात वगैरे सहज नेता येतात. अगदी खुसखुशीत होतात. छान लागतात.
शेवटी बाप्पा खूष तर आपणही खूष. नाही का?


वाचने
6651
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडीच्या
असेच म्हणते.
In reply to आवडीच्या by अनन्न्या
छान!
मस्त
मस्त
मस्त आलाय फोटू. बरं झालं
छान लागतात.
आमच्यकडे यात तांदळाचे पीठ
मंगलोर बन्स