मनापासून लिहिलेला लेख आवडला.
काय प्रतिक्रिया द्यावी समजत नाहीये.
खूप मुद्दे, खूप विषय डोक्यात घोळत असतात.
स्वतःलाच प्रश्न असंख्यवेळा विचारले जातात......
उत्तरं मिळत नाहीत. कधी मिळालीच तर आपण एकटे सगळ्यांना बदलू शकत नाही याची जाणीव होते.......
मग आपल्यापासून सुरूवात....
हे नेहमीचच आहे.
रेवती
पण एक करण्यासाऱख आहे. आपल्या मुलीला/मुलालासुद्धा स्वाभिमानाच अस बाळकडू पाजव कि कुणी तिला मोडू शकणार नाहि. जो बदल करायचा आहे त्याची सुरवात स्वतापासूनच करायाला हवी.
येणार्या महिलादिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
लेखामागची कळकळ जाणवते. लेखिकेचे विचारप्रवर्तक लेखाबद्दल अभिनंदन.
काही उदाहरणांबद्दल दुमत असू शकले तरी सध्याच्या स्त्रियांच्या स्थितीबद्दलच्या लेखिकेच्या बर्याचशा मतांशी सहमत.
थोडे अधिक विचारानंतर सुचले ते असे:
रूपकंवर, मंजुश्री सारडा, आणि नंतर जाळली गेलेली एक दिल्लीची युवती (नाव आठवत नाही), या मुलींना स्त्रिया असल्याने असंख्य त्रास झाले आहेत. आजही तरूण मुलींना वेश्याव्यवसायात लावले जाते, त्यांच्या मुलांचे लहानपण संपवून ते व्यवस्थेचे बळी ठरतात. हे जे गुन्हे घडतात ते कायद्याच्या ठोस आणि सरसकट कोणालाही पाठीला न घालता केलेल्या वापराशिवाय कमी होणार नाहीत, कारण ते करणारे अट्टल गुन्हेगारच आहेत.
पण जेव्हा गुन्ह्यांचे स्वरूप हे असे थेट नसते, तेव्हा काय होते? उदा. जेव्हा स्त्रियांच्या शिक्षणाला किंवा सामाजिक/आर्थिक/शारिरीक उन्नतीला अपसमजाने किंवा रूढींमुळे खीळ घातली जाते - तेव्हा त्या मुलीला पुरेशी वाढीची संधी न मिळण्यामुळे तिच्या जीवनमानावर होणारा परिणाम हा दूरगामी असू शकतो. असा परिणाम लगेच लक्षात येणार नाही, जेव्हा येईल तेव्हा उशीर झालेला असतो. तेव्हा मुलींना वाढीची पुरेशी संधी न मिळणे हा गुन्हा ठरून हे पूर्णत्वे कायद्याच्या कक्षेत येऊन त्यावर अंमलबजावणी होऊ लागेल तेव्हा समाजाला काही प्रमाणात झपाट्याने बदलावे लागेल. (असे काही कायदे सध्या अस्तित्वात आहेत का?)
यापेक्षा थोडे कमी गंभीर स्वरूपाचे दबाव जे भारतीय स्त्रियांवर विशेषतः येतात त्याचे एक उदाहरण म्हणजे समाजाच्या त्यांच्याकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा. तसे पाहिले तर कुठच्याही नातेसंबंधांत अपेक्षा असतातच, आईवडिलांच्या मुलीकडून, मुलीच्या नवर्याकडून, नवर्याच्या बायकोकडून आणि सासरच्या मंडळींच्या सुनेकडून, सुनेच्या सासरच्यांकडून. कितीही म्हटले तरी पूर्ण अपेक्षारहित असा संसार करता येत नाही असे वाटते. मग नक्की त्रास कसला होतो? तर अवाजवी अपेक्षांचा. मग त्या स्वतःच्या स्वतःबद्दलच्या अवाजवी अपेक्षा असतील, वा सासरचे, आईवडिल किंवा इतर नातेवाईक यांच्या आपल्याकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा असतील. त्यात कुठच्या अपेक्षा कधी वाजवी/अवाजवी आहेत हा निर्णय करणे कठीण आहे. हेच सर्वांचे असल्याने साचे तयार केले गेले असावे - कदाचित चांगल्या हेतूनेही असतील. म्हणजे जास्त विचार करायला नको. मूल जन्माला आले की लगेच त्याच्यासाठी अपेक्षांचा साचा तयार आहे. त्यात बसले की झाले. पण तिथेच क्लेशही असतात, कारण साच्यात बसण्याची इच्छा, मनोवृत्ती सर्वांची नसते.
पण कितीही त्रास झाला तरी अशा अपेक्षांचे ओझे झटकून टाकणे अशक्य नसले तरी कठीण असते. कधी अपेक्षा अवाजवी आहेत याचेच वेळेवर ज्ञान होत नाही. कधी त्या वाजवी असल्या तरी मनाविरूद्ध असतात. कधी अवाजवी/वाजवी काय हा निर्णय करण्याचे स्वातंत्र्य नसते. काही का असेना, मुलींची कुतरओढ होताना दिसते. (तसे पाहिले तर पुरूषांकडूनही आपल्या समाजाच्या काही ठोस अपेक्षा असतात. त्यात त्यांनाही त्रास होत नसेल असे नाही. पण स्त्रियांवरची बंधने अधिक जाचक किंवा दुराग्रही आहेत हे मात्र खरे. ) ही कुतरओढ सहजासहजी थांबेल असे वाटत नाही. जर स्त्री-पुरूष दोघांच्याही मनांवर अनेक वर्षांच्या संस्कारांनी किंवा साच्यांनी परिणाम केले असले तर त्यातून बाहेर पडण्यास वेळ द्यावा लागेल, प्रयत्न करावे लागतील.
महिलादिनाच्या निमित्त एक अतिशय विचार प्रवर्तक लेख वाचायला मिळाला. उत्तम लेखाबद्दल मनिषा तुझं अभिनंदन!
लेखातल्या प्रत्येक वाक्याशी सहमत आहे. प्रत्येक वाक्य, "अरे! हे तर माझ्या मनातलेच विचार आहेत" असंच सांगत आहे.
राजकुमार संतोषीचा "लज्जा" हा चित्रपट स्त्री आणि तिच्या एकूण अस्तित्वावर आहे. उत्तम चित्रपट आहे.
अग्निपरिक्षा देऊनसुद्धा सीतेला आश्रमात जावं लागलं.. आणि नंतर सुद्धा पुरूषी अहंकारा पुढे तिला धरणीच्या पोटीच परत जावं लागलं..
जिथे पुरूषोत्तम राम असा वागू शकतो.. तिथे सर्वसाधारण पुरूषाकडून काय अपेक्षा करणार!!
धरती की तरह हर दु:ख सहले, सूरज की तरह तू ढलती जा..
सिंदूर की ;आज निभाने को चूपचाप तू आग मे जलती जा..
पुरूषाच्या मनासारखं जेव्हा स्त्री वागते तेव्हा ती, कौतुकाची धनी असते मग ते तिच्या मनाविरूद्ध का असेना! पण जेव्हा ती तिच्या मनासारखी वागते तेव्हा ती शिव्यांची धनी असते. स्त्री मुक्ती.. ही नक्की कोणकोणत्या गोष्टीपासून मुक्ती हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. कारण समाजाने स्त्रीला इतकं गृहीत धरलं आहे की, स्त्रीला जर मुक्त केलं तर संपूर्ण समाजव्यवस्था बिघडेल हे नक्की..
लेख उत्तम जमला आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
खुपच सुंदर लेख.
आवडला लेख.
मनापासून
खर आहे रेवती
सुरेख
सहमत
महिलादिनाच्या शुभेच्छा
अधिक
सुरेख लेख.