सर्वांना गेणेशोत्सावाचा हार्दिका शुभेच्छा!!
घरोघरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले आहे आणि त्यांच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ बनवले जात आहेत. मीसुद्धा अशीच एक पारंपारीक पाककृती बाप्पांसाठी येथे देत आहे.
साहित्यः
१ वाटी जाड रवा
१ वाटी पाणी
१ वाटी आमरस
३/४ वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे किंवा आमरसाच्या गोडीप्रमाणे प्रमाण घ्यावे)
३ टेस्पून साजुक तूप
दीड टीस्पून वेलचीपूड
सांजोर्यांसाठी जे पीठ तयार केले आहे त्यात दीड वाट्या मैदा + १/३ वाटी कणिक + मीठ + तेल मिक्स करुन नेहमीप्रमाणे पीठ मळून घेतले आहे.
पाकृ:
प्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करून रवा हलक्या गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.
नेहमी भाजतो शिर्यासाठी तितका भाजायचा नाही. आपल्याला हे रव्याचे सारण थोडे चिकटचं हवे आहे.
हलका गुलाबी होता आला की त्यात एक वाटी पाणी व एक वाटी आमरस घालावा आणि परतून, झाकून एक वाफ काढावी.
आता त्यात साखर व वेलचीपूड मिसळून चांगले एकत्र करावे.
सांजा शिजला की ताटात गार होण्यासाठी काढून घ्यावा.
मळलेल्या पिठाचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची पारी लाटावी.
तवा गरम करायला ठेवावा.
पारीत लिंबाएवढाच सांजेचा गोळा भरून हलक्या हातानी पारीचे तोंड बंद करून घ्यावे.
थोडासा मैदा भुरभुरून हलक्या हाताने सांजोर्या लाटाव्यात.
तव्यावर दोन्ही बाजूंनी गुलाबी रंगावर शेकून घ्यावे.
वरून तूप सोडून शेकावे.
गरमा-गरम आमरसाच्या सांजोर्या आमरस किंवा साजुक तुपासोबत किंवा दोन्हीसोबत खायला द्यावे.
नोटः
आमरस नसेल वापरायचा तर २ वाट्या पाणी किंवा १ वाटी पाणी + १ वाटी दुध घालून सांजा बनवू शकता.

वाचने
17947
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा..
अहाहाहा!
_/\_
कातिल....
बाडिस
In reply to कातिल.... by तुषार काळभोर
सुरेख
वाह!! आमरस म्हणजे वीक पॉइंट
जब्रा!!!
मस्त दिसतायत सांजोर्या. आता
जबरी दिसतोय. चवीला पण भारीच
सांजोर्यांचा रंग अप्रतिम
आहाहा!!!
अहाहा अप्रतिम!!
मस्त रंग आला आहे
कसल्या भारी दिसतायत. एकदम
सानू,
अप्रतिम रेसिपी आणी फोटो
भारी दिसतायत.........
आहा किती मस्त! नेहमीप्रमाणेच
आल्या
+११११
In reply to आल्या by इरसाल
मस्त , करून पाठवल्या तर
वॉव, काय सुंदर केशरी दिसताहेत
अहाहा! सुरेखच!
अप्रतिम,सानी!
वाह, नैवेद्य पाहुन तोंडाला
खुप छान पाकृ सानि. अप्रतिम
आहाहा!!
बोलती बंद पाकृ आहे एकदम जबरी
बघतच रहावे
आवडल्या
वर्षांत कितीवेळा करता हा