बाप्पाचा नैवेद्यः गवसणीच्या पोळ्या आणि शेवयांची खीर
गौरीचा नैवेद्य: गवसणीच्या पोळ्या आणि शेवयांची खीर
माझ्या आईच्या माहेरी...सांगलीतील वाळवा गाव तिचं ... गौरी जेवणाला गवसणीच्या पोळ्या आणि खीर करतात. तिच्यामुळे आमच्याकडेही या पोळ्या होतात. आमरस आणि ही पोळी पण खूप छान लागते. मला तर वाटतं गणपतीत मोदकाची उकड उरली की काय करायचं यातूनच याचा शोध लागला असावा.
साहित्य:
एक वाटी तांदूळ पिठी,
दीड वाटी पाणी,
एक चमचा लोणी,
मीठ.
पारीसाठी:
नेहमी पोळ्याना भिजवतो तशी कणिक
.
.
कृती:
पाणी उकळत ठेवा. त्यात चवीला मीठ आणि लोणी घाला. उकळी येऊ द्या.
उकळी आली की तांदूळ पिठी मिसळा. मोदकासारखी उकड काढून घ्या.
थोडी गार झाली की छान मळून घ्या.
तेल, मीठ घालून नेहमीप्रमाणे दीड वाटी कणिक मळून ठेवा.
उकड गार झाली की कणकेच्या गोळीएव्हढीच उकडीचीही गोळी घ्या.
पुरणपोळीसारखी कणकेत भरून घ्या.
तयार उंडा कणकेवर लाटा.
आणि नेहमीच्या पोळीसारखीच भाजा.
.
.
मऊ लुसलुशीत पोळी तयार आहे. ही पोळी शेवयांच्या खिरीबरोबर खा.
फार काही वेगळी रेसिपी नाहीय पण एक पारंपरिक प्रकार म्हणून मुद्दाम देतेय.

वाचने
10145
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
गावसणीची पोळी आमरसासोबत खालीय
In reply to गावसणीची पोळी आमरसासोबत खालीय by नूतन सावंत
हो हो
नेहमीप्रमाणेच
अरे वा,
In reply to अरे वा, by स्वाती दिनेश
हो आमच्याकडे पण
मस्त कृती!
वा! मी तर पहिल्यांदाच ऐकतेय
मस्त प्रकार आहे. करून पाहणार.
In reply to मस्त प्रकार आहे. करून पाहणार. by रेवती
हो असेलही
वेगळाच प्रकार आहे अगदी हा तर.
In reply to वेगळाच प्रकार आहे अगदी हा तर. by पिलीयन रायडर
दिलंय बघ प्रमाण
वेगळाच प्रकार
आमच्याकडेही घावन-घाटले असते
हो नक्की कर
भारी!
पहिल्यांदाच ऐकले. उकड ऊरली
मस्त प्रकार आहे.