Skip to main content

बाप्पाचा नैवेद्यः बटाट्याचे कानवले

लेखक इशा१२३ यांनी मंगळवार, 29/08/2017 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा! गणपतीचे घरोघर आगमन झालेच असेल. दरवर्षी दहा दिवस येणारा बाप्पा यावर्षी दोन दिवस जास्तच मुक्कामाला आहे तर रोज नविन काय नैवेद्य करायचा हा गहन प्रश्न असतोच. आज केलेत बटाटा्याचे कानवले/करंजी. साहित्य: बटाटे उकडुन कुस्करलेले दोन वाट्या खसखस : एक चमचा सुकामेवा: हवा तेवढा गूळ : एक ते दीड वाटी वेलदोडा पूड: एक चमचा तूप: एक चमचा तेल : तळणीपुरते करंजीच्या पारीसाठी : कणिक+दोन चमचे बारीक रवा+एक चमचा तेलाचे मोहन . 1 . . 1 . . कृती: प्रथम कुस्करलेला बटाटा तुपावर खमंग परतून घ्यावा, छान चोकलेटी रंग आल्यावर त्यात गूळ मिसळून परतून घ्यावे. छान गोळा तयार झाला की त्यात खसखस, सुकामेवा, वेलदोडा पूड घालून एकत्र करुन घ्यावे. खमंग सारण तयार होइल. पारीसाठी कणकेत बारीक रवा आणि गरम तेलाचे मोहन घालून एकत्र करुन घ्यावे त्यात पाणी घालून कणिक भिजवून घ्यावी. साधारण अर्धा तासानंतर बटाट्याचे सारण भरून करंज्या तयार करुन घ्यव्यात व तळाव्यात. . . 1

वाचने 13594
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

In reply to by सूड

बटाट्याच्या गोड पाककृती खूप आहेत,सूड भौ.वड्या,गुलाबजाम,शिरा ,जिलबी,कीस, चिवडा,

In reply to by नूतन सावंत

बटाट्याच्या गोड वड्या, गुलाबजाम, शिरा, जिलबी हे पदार्थ कधीही खाल्लेले नाहीत. बटाट्याचा कीस खाल्लाय पण तिखट. नाही म्हणायला गोडसर चवीचा बटाट्याचा चिवडा मात्र खाल्लाय. सुरन्गी ताई या निमित्ताने या सर्व पाकृ येउ द्या.

बटाट्याचे गोडाचे प्रकार बर्‍याचदा खाद्यपूस्तकात वाचले होते पणकधी बनवले नाही. हे कानवले भारी दिसतायेत. पाककृती आवडली.

गोडात बटाटा हे थोड वेगळे प्रकरण आहे. पण खमंग लागत असणार एकदम

खुपच छान , आहेचस तु सुगरण , ऐन गणपतीच्या वेळी पुण्यात असल्याने तु खाउ घातलेल्या पापातल्या चिरोट्यांची चव अजुन जीभेवर रेंगाळत आहे.