अँड्रॉपॉज.... एक दुर्लक्षित विषय!
लेखनप्रकार (Writing Type)
अलीकडच्या काळात किमान शहरांमध्ये मेनोपॉज बद्दल हळूहळू चर्चेला सुरवात झाली आहे. स्त्रियांच्यात साधारण चाळीशी नंतर होणारे बदल; त्यांचे ऋतुचक्र बदलणे आणि त्यामुळे त्यांच्यात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल याची अलीकडे काही प्रमाणात दखल घेतली जात आहे; आणि हे चित्र समाधानकारक आहे यात प्रश्नच नाही. पण ज्याप्रमाणे मेनोपॉजबद्दल मोकळेपणी बोलले जाते त्याचप्रमाणे अँड्रॉपॉज देखील थोडी चर्चा झाली पाहिजे. कारण स्त्रियांप्रमाणेच पुरुषदेखील या विशिष्ट शारीरिक आणि मानसिक संक्रमणातून जात असतात.
अँड्रॉपॉजचे कारण पुरुषांमधील hormone testosterone कमी होणे हे असते. अर्थात हे टेस्टोस्टेरोन कमी होणे हा वाढत्या वयात शरीरात होणारा नैसर्गिक बदल असतो. काही मतांप्रमाणे हे टेस्टोस्टेरोन साधारणपणे वयाच्या तिशीनंतर प्रत्येक दशकात दहा टक्यांनी कमी होत असते. काही अभ्यासकांच्या मते साधारणपणे वयाच्या पन्नाशीमध्ये तीस टक्के पुरुष कमी होणाऱ्या टेस्टोस्टेरोनच्या प्रमाणामुळे अँड्रॉपॉज अनुभवतात. यामुळे अनेकजण शारीरिक आणि मानसिक बदल अनुभवतात. अँड्रॉपॉजचा परिणाम अनेक प्रकारे होऊ शकतो. शक्ति कमी होणे, mood swings, चीडचीडेपणा, hot flashes, अस्वस्थपणा, depression, अतिरिक्त वजन वाढणे (पोट सुटणे), स्मरणशक्ती कमी होणे, केस गळणे आणि शरीरसुखाची इच्छा कमी होणे असे काही ठळक बदल पुरुषांना जाणवतात. टेस्टोस्टेरोन कमी होण्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे किंवा हाडांची ठिसूळता वाढणे हे काहीसे सिरीयस त्रास देखील होऊ शकतात.
यावर योग्य प्रमाणात व्यायाम करणे, योग्य आहार घेणे हे उपाय प्रत्येक डॉक्टर सांगतात. त्याशिवाय डॉक्टर्सच्या सल्ल्याने टेस्टोस्टेरोन replacement देखील करता येते. अर्थात हे सगळे उपाय आपण विविध माध्यमातून वाचू किंवा समजून घेऊ शकतो.
मात्र मेनोपॉज काय किंवा अँड्रॉपॉज काय हे स्त्री आणि पुरुषांमध्ये होणारे शारीरिक आणि पर्यायाने मानसिक बदल आहेत. जे वयापरत्वे होणारच आहेत. यावर डॉक्टर्सकडून मदत घेणे, योग्य व्यायाम आणि योग्य आहार घेणे हे उपाय तर आहेतच. पण त्याचप्रमाणे एक चांगली lifestyle सुरु करणे हे आहे. कारण जर सुदृढ मन असेल तर शरीरात होणारे बदल आणि त्यामुळे होणारे त्रास सहन करणे कदाचित् थोडे सोपे जाईल.
सर्वसाधारणपणे वयाच्या चाळीशी किंवा पंचेचाळीशीपर्यंत स्त्री-पुरुष दोघांनी त्यांच्या एकूण करियरमध्ये बऱ्यापैकी जम बसवलेला असतो. मुलं देखील तशी मोठी झालेली असतात. पण तरीही सतत पुढे पळण्याची इच्छा प्रत्येकातच असते. मग अजून चांगले काम... पुढची पोस्ट मिळवण्यासाठीची मेहेनत... यामुळे एक चांगले आयुष्य जगण्याचे राहून जाते आहे हे मात्र कोणाच्या लक्षात येत नाही. लग्नानंतरचे गुलाबी दिवस सगळेच अनुभवतात. मग कधीतरी मुलं होतात आणि प्रपंच वाढतो. करीयरची घोडदौड आणि घरच्या वाढत्या जवाबदाऱ्या यामुळे जगणे मात्र राहून जाते. वर्षातून एकदा कुटुंबाला एक झकास टूर करून आणली की जवाबदारी संपली असा काहीसा दृष्टीकोन होतो.
हळूहळू वाढत्या वयाबरोबर मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रोल वाढणे हे जगजाहीर आजार दोस्ती करायला लागतात. एकूणच वाढणाऱ्या ताणामुळे चिडचिड, अस्वस्थता वाढते. यातून एकमेकांना समजून घेणे कमी होते आणि मग संसार चालू राहातो पण मनं कायमची दुखावली जातात. याचं एक महत्वाच कारण म्हणजे मेनोपॉज आणि/किंवा अँड्रॉपॉज हे आहे; हा विचार मात्र कोणी करत नाही. पण जर खरच चाळीशी नंतर आपल्यात होणारे बदल आपण समजून घेऊन आपल्या साथीदाराबारोबरचा संवाद वाढवला आणि लहान लहान गोष्टींमधून आयुष्यातला आनंद मिळवायला लागलो तर कदाचित् आयुष्य जास्त सुंदर आणि परिपूर्ण असेल.
त्यामुळे एकमेकांबरोबर वेळ घालवणे, थोड्या अवांतर गप्पा मारणे जास्त महत्वाचे आहे. आपण तरुण वयात आठवणीने एकमेकांच्या आवडी लक्षात ठेऊन एकमेकांना गिफ्ट्स देतो. तेच वयाच्या पंचेचाळीशीनंतर करायला काय हरकत आहे. पत्नीला/पतीला I LOVE YOU या वयात म्हणून तर बघा... मुरलेल्या लोणच्या प्रमाणे त्याची चव ओठांवर रात्रभर रेंगाळेल.
प्रतिक्रिया
हा धागाही तसा दुर्लक्षित
ॲंड्रोपॉज एक सुडोसायंटीफीक
टेस्टोस्टीरॉन कमी होत जाते हे
आम्हाला समजायला साधं, सहज आणि सोपं होईल
जल्ला काय बी कल्ला नाय
:)
आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात
https://en.wikipedia.org/wiki
आपल्या सर्वांच्या
मिपा वरच्या डॉक्टर मंडळींनी या विषयावर लिहायला हवे
अगदी खरं चामुंडराय जी,
डॉ सुबोध खरे यांच्या सुबोध
माहितीपूर्ण धागा.
अँड्रोपॉज
त्याच लग्नाच्या बायकोचा
:)
लोकांना कामाचं कंटाळा नसतो हो
त्याच लग्नाच्या बायकोचा
टेस्टोस्टेरोन कमी होणे हा वाढत्या वयात शरीरात होणारा नैसर्गिक