Skip to main content

मोदी बरे ,अमित शहा वाईट ?

लेखक खाबुडकांदा यांनी सोमवार, 21/08/2017 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी वाजपेयीं जेव्हा कॉंग्रेसविरोधी राजकारणाच्या केंद्रस्थानी असत तेव्हा त्याना टिकेचे लक्ष्य केले जाई. तरी जनतेत त्यांची प्रतिमा मलिन होत नाहीसे पाहुन मग टीका करताना धोरण किंचीत बदलण्यात आले. त्यानुसार वाजपेयी सज्जन वा उदारमतवादी होते पण अडवाणी वाईट व असहिष्णू आहेत असा ओरडा केला जाऊ लागला. अडवाणींची उंची वाढतच राहिली. नंतर मोदींचा उदय झाला आणि अडवाणी हे सभ्य व समजूतदार असून मोदी हे समाजात फूट पाडणारे आणि हुकुमशहा असल्याचा शोध लावण्यात आला. त्यानेही मोदींचे काही बिघडले तर नाहीच पण त्यांची उंची वाढत राहिली असे लक्षात आल्यावर कालपरवापर्यंत मोदीना तीव्र विरोध करणाऱ्या ममता दीदी म्हणू लागल्या आहेत कि मोदी बरे आहेत पण अमित शहा वाईट आहेत म्हणुन ! जनता आता पूर्वीप्रमाणे भोळी राहिलेली नाही आणि असे बदलते पवित्रे फारसे यशस्वी होत नाहीत हे यांच्या कधी लक्षात येणार ?

वाचने 15978
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

मोदीकाका आपल्याला आवडतात. शहांबद्दल विशेष काई माहीत नाही बा. तुमच्या लिखाणातील साखळी बघता मोदीकाका पंतप्रधानपद सोडतील त्यानंतर शहा पंतप्रधान होतील असा काहीसा अर्थ काढता येईल का?

In reply to by पैसा

तुम्ही पूर्वी एकदा म्हणाला होतात की मनोहर जोशी पंप्र होतील म्हणून..

In reply to by पैसा

गटणे स्टाईल झालं, "मागे तु, ते आणी साने गुरुजी तुझे आदर्श आहेत असं म्हणाला होतास??"

In reply to by पैसा

तुमच्या लिखाणातील साखळी बघता मोदीकाका पंतप्रधानपद सोडतील त्यानंतर शहा पंतप्रधान होतील असा काहीसा अर्थ काढता येईल का?
अमित शहा की आदित्यनाथ हा प्रश्न आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

त्यावेळेस नरेंद्र नंतर देवेंद्र अशीही आरोळी ऐकू येण्याची शक्यता आहे म्हणतात. :)

कॉंग्रेस व तत्सम पक्षाना त्या त्या काळी जो अधिक उपद्रव देतो वा त्यांच्या स्थानाला उपजिवीकेच्या साधनेला जो धक्का देइल असे त्याना वाटते तो अधिक वाईट असतो व त्याला वाईट ठरवणे सोपे जावे म्हणुन जनतेला जो प्रिय आहे त्याला बरा म्हणुन जनतेला पटवण्याचा प्रयत्न केला जातो एवढाच याचा अर्थ. तुमचा अंदाजही काही चुकीचा वाटत नाही.

कॉंग्रेस व तत्सम पक्षाना त्या त्या काळी जो अधिक उपद्रव देतो वा त्यांच्या स्थानाला उपजिवीकेच्या साधनेला जो धक्का देइल असे त्याना वाटते तो अधिक वाईट असतो व त्याला वाईट ठरवणे सोपे जावे म्हणुन जनतेला जो प्रिय आहे त्याला बरा म्हणुन जनतेला पटवण्याचा प्रयत्न केला जातो एवढाच याचा अर्थ. तुमचा अंदाजही काही चुकीचा वाटत नाही.

मोदी काका जिंदाबाद! मोदी जगभरात भारताचं नेतृत्व करतात, आज देशाची प्रतिमा जगात फारच उंच झाली आहे आणि आमची मानही! आणि अमित शहा देशाच्या आतमधील राजनीती बघतात!

खरे आहे रे कांद्या. जनता आता पूर्वीप्रमाणे भोळी राहिलेली नाही म्हणूनच जी.एस.टी.ला कडाडून विरोध करणार्या भाजपावाल्यानी सत्तेवर आल्यावर पलटी मारली, पाकिस्तानला 'धडा शिकवायची'भाषा करणारे हास्तांदोलन करू लागले हेही मतदारांच्या ल़क्षात आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धागा व विषय खुप जुना झाला होता. पण तुम्ही कांद्याला नविन फोडणी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. GST पूर्वीचा व आताचा यात खुप फरक आहे खुप सुधारीत आवृत्ती आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज पडु नये. तो वाद जुना झालाय. GST प्रथम ममो सरकारने आणला होता पण त्याला विरोध झाल्यावर ते सरकार थंड बसले. मोदी सरकारने मात्र अनेक विरोधी पक्षांशी चर्चा करून मुळ विधेयकात सुधारणा करुन वेळेस सोनिया यांच्या घरी मंत्री जावून सर्वाना आवश्यक त्या विश्वासात घेवून अंतिम मसुदा सम्मत करुन घेतला. तीव्र इचछाशक्ती दाखवली धडपड केली हे कृपया नाकारु नका. दुसरा मुद्दा पाक बाबतच्या धोरणाचा. होय हस्तांदोलन केले हे खरे आहे पण तो सांकेतिक व शिष्टाचाराचा प्रकार आहे. मोदीनी काय बंदूक घेवून पाकिस्तानात जावून लढावे कि अणूबॉंब टाकावा अशी अपेक्षा आहे ? आज मोदी स्वराज डोवाल आणि कंपनीच्या मुत्सद्दीपणामुळे पाक आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडलाय. कालच त्यांचा मित्र चीन ने सुद्धा काश्मीर प्रश्नातून अंग काढुन घेतले आहे. मला फरक पडलेला स्पष्ट दिसतोय. आणि ममो सरकारच्या काळात असे होणे शक्य नव्हते हे ही समजत आहे. बाकि पसंद अपनी अपनी.