गेम थेअरी म्हणजे गणित, तर्कशास्त्र आणि मानवी स्वभाव विशेषतः निर्णय घेण्याची मानवी क्षमता ह्यांची सांगड घालणारे एक क्षेत्र आहे. अर्थशास्त्र, राजकारण, युद्धशास्त्र इत्यादीने अनेक क्षेत्रांत गेम थेअरी वापरली जाते. गेम थेअरी मधील काही संकल्पना जर आपण समजून घेतल्या तर अनेक क्षेत्रांत आपण निर्णय पद्धतीने घेऊ शकतो.
गेम म्हणजे काय ?
बुद्धिबळ हा एक खेळ आहे आणि ह्यांत दोन खेळाडू एक मेका विरुद्ध खेळतात. ह्या खेळाचे ठराविक नियम असतात आणि आलटून पालटून प्रत्येक खेळाडू एक निर्णय घेतो. प्रत्येक निर्णय घेण्याआधी खेळाडूंकडे काही "पर्याय" असतात. निर्णय म्हणजे ह्या पर्यायातून तो एक पर्याय निवडतो.
गेम हि संकल्पना अशीच आहे. गेम मध्ये एक किंवा अनेक "एजन्ट" असतात. प्रत्येक एजन्ट नियमा प्रमाणे निर्णय घेतो. एजंट रॅशनल आहेत असे बहुतेक वेळा मानले जाते म्हणजे एजंट वेडे नसतात आणि प्रत्येक निर्णय आपली विचारक्षमता वापरून घेतात.
आता काही सोपी उदाहरणे पाहूया :
१. श्री पाटील आणि श्री पवार आमदारकीच्या निवडणुकीत एक मेका विरुद्ध उभे आहेत. हि झाली "कॉम्पिटिटिव्ह गेम" म्हणजे दोघेही एक मेका वर कुरघोडी करायचा प्रयत्न करत आहेत.
२. कुमार श्रेयस आणि कुमारी प्रिया दोघेही शिकायला हुशार नाहीत पण परीक्षा हाल मध्ये त्यांचे बेंच एका मेकांच्या शेजारी आहेत म्हणून दोघेही जण कॉपी करायचा बेत आखतात. हि झाली कॉऑपरेटिव्ह गेम.
आपण दररोज अश्या अनेक प्रकारच्या गेम मध्ये भाग घेतो.
गेम चे तीन प्रकार अतिशय सोपे आणि कॉमन आहेत.
१. झिरो सम गेम
"कुठे तरी मातीचा ढिगारा दिसला तर कुठेतरी खड्डा पडला आहे असे समजावे." असा एक वाक्प्रचार आहे. हा झिरो सम गेम संकल्पनेचा गाभा आहे. इथे एकाचा संपूर्ण फायदा आणि दुसऱ्याचे "तितकेच" नुकसान होते. झिरो सम गेम मध्ये लोक शक्यतो कमीच भाग घेतात. मित्राबरोबर जर आपण एखादी शर्त लावली असेल तर ती झिरो सम गेम असते. उदाहरणार्थ "उद्या भारत जिंकला तर मी तुला १०० रुपये देईन नाही तर तू मला १०० रुपये दे".
मानवी मन अनेक वेळा काही घटनांना "झिरो सम गेम " म्हणून मॉडेल करते पण प्रत्यक्षांत ह्या घटना "झिरो सम गेम" नसतात त्या मुले आपलेच फार नुकसान होते. चांगले उदाहरण म्हणजे वाहतुकीतील बेशिस्त पणा. अनेक लोकांना वाटते कि दुसरा माणूस वेळेवर पोचला ह्याचा अर्थ आपण लेट पोचू पण प्रत्यक्षांत सर्वच चालकांनी जर एक मेकाला नियम व्यवस्थित पाळून जाण्याची मदत केली तर सर्व वाहतूक जास्त सुरळीत पने चालेल आणि सर्वच लोक लवकर पोचतील.
२. निगेटिव्ह सम गेम
समजा मी तुमचा लॅपटॉप चोरून नेला तर ती "झिरो सम गेम " ठरेल काय ? वर वर पाहता असे वाटेल कि होय कारण तुमचा लॅपटॉप गेला आणि तो मला मिळाला. पण समजा तुम्ही फ्रीलान्सर आहेत आणि लॅपटॉप वापरून तुम्ही महिना १ लाख रुपये कमावता. मी बेकार असून लॅपटॉप चित्रपट पाहण्यासाठी वापरते. इथे तुमचे फक्त लॅपटॉप चे नुकसान नाही झाले तर लॅपटॉप नसल्यामुळे तुमचा जो धंदा बुडाला त्याचे सुद्धा नुकसान झाले. आणि माझा विशेष फायदा नाही झाला कारण चित्रपट पाहण्याशिवाय त्या लॅपटॉप चा मला नाही.
तुम्हाला झालेला फायदा (नुकसान म्हणजे निगेटिव्ह फायदा) आणि मला झालेला फायदा ह्यांची बेरीज केली तर बाकी निगेटिव्ह येते. म्हणून निगेटिव्ह सॅम गेम.
समाज तुमच्या तिजोरीत भरपूर पैसे आहेत. तुम्ही अश्या लोकवस्तीत राहता जिथे फार चोऱ्या होतात. म्हणून तुम्ही एक सुरक्षा कर्मचारी ठेवलाय आणि त्याला तुम्ही दर महिना पगार देता. म्हणजे दार महिना त्या तिजोरीतील पैसे कमी कमी होत आहेत. थोडक्यांत चोरी नाही जरी झाली तरी हि निगेटिव्ह सम गेम झाली कारण निव्वळ चोरीच्या भीतीने तुमचे पैसे कमी कमी होत आहेत.
आता तुम्ही एका चांगल्या लोकवस्तीत राहायला गेला जिथे चोरीची शक्यता कमी आहे इथे तुम्ही सुरक्षा कर्मचारी नाही ठेवला तर पैसे तिजोरीत ठेवणे हि झिरो सम गेम झाली.
२. पॉसिटीव्ह सम गेम
हि संकल्पना बहुतेक लोकांना समजायला अवघड जाते. तुम्ही सलून मध्ये जाता आणि केस कापून घेता. कपणारीला ५०० रुपये देता. हि कसली गेम झाली ? अनेक वेळा लोक ह्याला झिरो सम गेम समजतात. मी तिच्या दुकानातून बाहेर पडताना माझ्या खिश्यांत ५०० रुपये कमी आणि तिच्या खिश्यांत ५०० रुपये जास्त म्हणजे झिरो सम गेम झाली ना ?
नाही. कारण तुम्ही तिला ५०० रुपये दिले ते तिच्या २० मिनिटा साठी. तिने आपले कौशल्य वापरून तुमचे २० मिनिटांत केस कापले. तेच केस जर तुम्ही स्वतः कापायचे ठरवले असते तर तुम्हाला आधी ते कौशल्य हजारो रुपये खर्च करून मिळवावे लागले असते. नंतर इतर सर्व साधन साहित्य विकार घ्यावे लागले असते. नंतर २० मिनटात तुम्ही स्वतःचे केस कापून ५०० रुपये वाचवले असते. पण तुमच्या वेळाची (केस कापायचा वेळ आणि कौशल्य प्राप्त करायचा वेळ) किंमत ५०० रुपये पेक्षा जास्त असल्याने तुम्ही तिला ५०० रुपये देऊन जास्त पैसे वाचवले.
ह्या उलट ती सलून वालीने आधीच २ लाख रुपये खर्च करून कोर्स केलाय आणि दुकान भाड्यावर घेतली. तिला केस कापायला ३०० रुपये खर्च येतो (दुकानाचे भाडे वगैरे धरून). आणि तुम्ही जेव्हा ५०० रूपये देता तेंव्हा तिला २०० रुपये फायदा होतो. थोडक्यांत काय तर तुम्ही जेंव्हा त्या दुकानातून बाहेर पडत तेंव्हा तुम्हा दोघांना फायदा होतो.
म्हणून ह्याला "पॉसिटीव्ह सम गेम" म्हणतात.
इथे फायदा हा तीन गोष्टींवर अवलंबून असतो :
१. तुमच्या दोघांच्या गरजा मधील तफावत. (तुम्हाला चांगली हेरस्टाईल हि ५०० रुपया पेक्षा जास्त महत्वाची वाटते, तिला ५०० रुपये तिच्या २० मिनिटा पेक्षा जास्त महत्वाचे वाटतात)
२. तुमच्या दोघांच्या कौशल्या मधील तफावत. (समजा तुम्ही डॉक्टर आहेत आणि २० मिनिटांची तुमची फी ८०० रुपये आहे तर तुम्ही पैसे कमावण्यात त्या सलून वाली पेक्षा जास्त चांगले आहेत तर ती तुमच्या पेक्षा केस कापण्यात जास्त सक्षम आहे)
३. तुमच्या मनाचे समाधान.
तिसरा पॉईंट थोडा साधारण वाटला तरी अर्थशास्त्राचे मूळ ह्या तिसऱ्या मुद्यात आहे. प्रत्येक माणूस आपल्या सध्याच्या स्थितीबद्दल नेहमीच असमाधानी असतो आणि म्हणूनच "असमाधाना" कडून "समाधानाकडे" तो वाटचाल करण्याच्या प्रयत्न करतो. सर्व मानवी हालचाली ह्यातूनच निर्माण होतात. तुम्ही अन्न ग्रहण करतात ते भूक लागली म्हणून, तुम्ही टीव्ही व करतात तो बोर झालात म्हणून इत्यादी इत्यादी.
कदाचित तुम्हाला आपली चांगली हेरस्टाईल करून जास्त समाधान मिळत असेल आणि त्या समाधानाची किंमत तुमच्या दृष्टीने ५०० रुपया पेक्षा जास्त असेल. म्हणून तुम्ही ५०० रुपये खर्च करायला मागे पुढे पाहत नाही. ह्या उलट तुमच्या जागी मी असते तर ५०० रुपये हि किंमत जास्त वाटून मी आणखीन काही पर्याय शोधला असता.
प्रत्येक मानवाचे मन वेगळे असते आणि म्हणून प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्टीची किमंत वेगवेगळी ठरवतो. "पॉसिटीव्ह सम गेम" ह्याची संकल्पना ह्यावरच आधारित आहे.
व्यापार आणि पॉसिटीव्ह सम गेम.
जेंव्हा जेंव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या संमतीने (कुणाचीही कसलीही जबरदस्ती नसताना) काही व्यवहार करतात तेंव्हादोघांनाही दोन्ही लोकांना त्यातून फायदा होतो. कारण जर फायदा नसता झाला तर मुळी त्यांनी त्या व्यवहारांत भागच नसता घेतला.
पण हे सर्वच लोकांना स्पष्ट दिसत नाही. उदाहरणार्थ एक माणूस प्लेन ने दिल्लीला जातो आणि त्या छोट्याश्या सीट साठी ५००० रुपये खूप आहेत आणि ह्या एअर लाईन्स कश्या लुटत आहेत असे सांगून हि जणू काही "झिरो सम गेम" असे भासवतो. पण आम्हाला होणारा फायदा प्रत्यक्षांत आपल्या कडे पर्याय काय आहेत त्याच्यावर अवलंबून असतो आपल्याला काय वाटते ह्यावर नाही.
उदाहरणार्थ प्लेन चा पर्याय म्हणजे १८ तासांचा रेल्वे प्रवास होता. स्वस्त असला तरी १२ तास जास्त लागले असते. अनेक लोकांना ते बारा तास ५००० रुपया पेक्षा जास्त मौल्यवान वाटतात म्हणून तर ते लोक प्लेन ने जातात. नाहीतर रेल्वेने गेले असते.
सर्वच व्यापार वर वर पाहता "पॉसिटीव्ह सम गेम" वाटले तरी ते असत नाहीत. उदाहरणार्थ जेंव्हा सरकार व्यापारांत लुडबुड करू लागते तेंव्हा दोन्ही व्यक्तींचा फायदा कमी होतो तर कधी कधी एकाच व्यक्तीचा फायदा होतो. जेंव्हा फक्त BSNL देशांत सेवा देत होती तेंव्हा तुम्ही स्वतःच्या मर्जीनेच bsnl ची सेवा घेतली होती पण सरकारने इतर खाजगी कंपन्यांना प्रवेश नाकारून तुमचे पर्याय कमी केले होते. जेंव्हा ते पर्याय निर्माण झाले तेंव्हा लोकांनी ते जास्त प्रमाणात निवडले ह्यावरून bsnl ने लोकांचे किती नुकसान केले हे आता लक्षांत येते.
** रिक्षाचे दर
फार चांगले उदाहरण म्हणजे रिक्षा चे दर. इथे सरकार हस्तक्षेप करून प्रवाश्यांचा फायदा करण्यासाठी दर निर्धारित करते. थोडक्यांत काय तर रिक्षावाला तुम्हाला स्वतःच्या मर्जीने नेत नाही तर सरकारी जबरदस्तीने त्या रेट वर नेतो. इथे सर्व प्रवास पॉसिटीव्ह सम गेम नसतात.
उदाहरण १ : तुम्हाला दहावीची परीक्षा द्यायची आहे आणि त्यासाठी तुम्ही रिक्षाला हात दाखवता. रिक्षाने तुम्हाला नाही नेले तर अक्खे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. तुमच्या दृष्टीने त्या प्रवासाची किंमत १००० रुपये आहे पण रिक्षावाला फक्त १५ रुपये चार्ज करू शकतो.
उदाहरण २: काही मुले चित्रपट पाहण्यासाठी मॉल ला जात आहेत. उशीर झाला तर १०० रुपयांचे तिकीत बुडेल म्हणून त्या प्रवासाची किंमत त्या मुलां साठी ३०० रुपये आहे. पण रिक्षावाला फक्त १५ रुपये चार्ज करू शकतो.
उदाहरण ३: एक तरुण मुलगी रात्री स्टेशनवर आली आणि तिला घरी जायचे आहे. तिला स्वतःच्या सुरक्षेची भीती वाटते आणि तिचं दृष्टीने ती ५०० रुपये सुद्धा मोजायला तयार आहे जर सुरक्षेची हमी असेल तर. पण रिक्षावाला फक्त १५ रुपये चार्ज करू शकतो.
वरील तिन्ही उदाहरणात प्रत्येक प्रवाश्याला आपल्या प्रवासाची किंमत वेग वेगळी आहे पण रिक्षावाल्याला मात्र फायदा सेम आहे. ह्यामुळे तुमच्या गरजेची त्याला अजिबात पर्वा नाही. त्याच्यासाठी तिन्ही प्रवासी सेम आहेत. त्यामुळे तो कदाचित दहावीच्या मुलाला न नेता चित्रपट पाहायला जाण्याऱ्या मुलांना मुलांना घेऊन जाईल.
रिक्षाच्या उदाहरणात सरकारने दर निर्धारीत केल्याने काही तरी नाविन्यपूर्ण करून जास्त फायदा तो करू शकत नाही उलट फक्त प्रवाश्याना लुबाडून जास्त फायदा करू शकतो. ह्यामुळे लुबाडणाऱ्या लोकांचे जास्त फावते आणि अश्या व्यवसायांत त्यांचा एकदा वाढत जातो. उदाहरणार्थ एखादी महिला चला ५x दर आकारून रात्री अपरात्री महिला प्रवाश्याना नेण्याचे काम करू शकत होती पण असे काम बेकायदेशीर ठरते. जो रिक्षावाला प्रामाणिक आहे जो लुबाडत नाही त्याला रात्री अपरात्री काम करण्यासाठी काहीच इन्सेन्टिव्ह राहत नाही उलट जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना रात्री अपरात्री काम करायला जास्त स्फुरण चढते.
रिक्षा किंवा बस चे दर निर्धारित करून आपला फायदा होतो असे अनेक जणांना वाटले तरी त्यामुळे अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण सेवा आम्हाला मिळत नाहीत.
** समाज आणि व्यक्ती
एका व्यक्तीसाठी आपण गेम थेअरी कशी काम करते हे पहिले पण संपूर्ण समाजासाठी ती कशी काम करते हे सुद्धा पाहणे मजेशीर आहे. आपल्या समाजांत करोडो देवाणघेवाण दरक्षणी होतात. कुणी रिक्षाने प्रवास करतो तर कुणी मार्केट मध्ये भाजी विकत घेतो तर कोणी फोन वरून SMS पाठवतो.
समजा भारतातील सर्व १००% देवाणघेवाण झिरो सम गेम आहेत. ह्याचा सामाजिक स्तरावर अर्थ काय ? ह्याचा अर्थ हाच कि त्या देवाण घेवाण नसत्या झाल्या तरी काही फायदा नव्हता कारण एकूण संपत्ती तितकीच राहिली आहे.
समाजा भारतातील सर्व १००% देवाण घेवाण निगेटिव्ह सम गेम आहेत ह्याचा सामाजिक स्तरावरील अर्थ काय ? तर प्रचंड वेगाने आपली संपत्ती कमी होत आहे. असल्या देवाण घेवाण कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे.
जर भारतातील सर्व १००% देवाण घेवाण पॉसिटीव्ह सम गेम आहेत तर त्याचा अर्थ काय होतो ? तर भारत नवीन संपत्ती निर्माण करत आहे. लोक जास्त सुखी होत आहेत इत्यादी. जर आम्हाला जास्त सुखी व्हायचे असेल तर लोकांचा फायदा जास्तीत जास्त कसा वाढवता येईल हे पाहणे गरजेचे आहे. जितका फायदा जास्त तितक्या लवकर आम्ही गरिबी हटवू शकतो.
वाचने
11797
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख आवडला.
छान लेख
धन्यवाद.
लेख आवडला, विचार करण्यालायक
मस्त लेख
ये बात! आवडलं! लिहीत राहा.
आवडला!
बंबूशेठच्या घरासमोर अन
In reply to आवडला! by खेडूत
९% पैश्यांची बचत होते तर एक
In reply to आवडला! by खेडूत
मस्त लेख. आवडला. आजून सविस्तर
मस्तं लेख! आवडला.
फारच छान लेख॰ खूप दिवसापासून
चांगलं लिहिलंय
स्त्री-पुरुष काम विभागणी.
या प्रश्नावर लेखिकेचे उत्तर
In reply to स्त्री-पुरुष काम विभागणी. by अत्रे
चांगला प्रश्न आहे आणि उत्तर
In reply to स्त्री-पुरुष काम विभागणी. by अत्रे
ह्यात पुरुषाची कार्यक्षमाता
In reply to चांगला प्रश्न आहे आणि उत्तर by साहना
आवडला
छान माहिती
रंजक लेख.
तस बघायला गेलं तर अन्न, तेही
In reply to रंजक लेख. by मराठी कथालेखक
फक्त एक पोळी खाली तर जगाल..
In reply to तस बघायला गेलं तर अन्न, तेही by अनुप ढेरे
> चित्रपट निर्माते भरपूर पैसा
In reply to रंजक लेख. by मराठी कथालेखक
चित्रपट पाहिल्याने "अमुक तमुक
In reply to > चित्रपट निर्माते भरपूर पैसा by साहना
कदाचित मी चुकीचा शब्दप्रयोग
In reply to चित्रपट पाहिल्याने "अमुक तमुक by मराठी कथालेखक
ठीक आहे..
In reply to कदाचित मी चुकीचा शब्दप्रयोग by साहना
लेखं आवडला. १+
+11
घरात लपवून/साठवून ठेवलेला
In reply to +11 by अमितदादा
+11
In reply to घरात लपवून/साठवून ठेवलेला by पगला गजोधर
+11
In reply to घरात लपवून/साठवून ठेवलेला by पगला गजोधर
सोने हिरे यांचा औद्यौगिक वापर
In reply to +11 by अमितदादा
> मग घरात लपवून/साठवून
In reply to +11 by अमितदादा
गेम थिअरी मधली जी गणिती
लेख व अभ्यासू प्रतिसाद आवडले
चांगला लेख. अजून उदाहरणे
> १. इकडे आम्हाला प्यायला
In reply to चांगला लेख. अजून उदाहरणे by तेजस आठवले
शाहरुख चा चित्रपट पाहायला आणि
In reply to > १. इकडे आम्हाला प्यायला by साहना
पहा : https://www.google.co
In reply to शाहरुख चा चित्रपट पाहायला आणि by पगला गजोधर
सॉल्लिड लेख
छान माहीती
धन्यवाद
सुंदर आणि वेगळ्याच विषयावर लिहिलेला लेख
धन्यवाद. मस्तच लेख
खूपच छान विवेचन
माझ्या लेखावर विचार करून आपण
In reply to खूपच छान विवेचन by अमित खोजे
सुंदर प्रतिसाद.
In reply to खूपच छान विवेचन by अमित खोजे
पर्यायी मराठी शब्द..
In reply to खूपच छान विवेचन by अमित खोजे
छान लेख. आवडला.
शेअर बाजार
आधी शेअर बाजारवील काही स्वैर
In reply to शेअर बाजार by स्वधर्म
लेख आवडला