साडी नेसणे ही आदिम ,कालबाह्य प्रथा स्त्रीयांनी बंद करावी का????
साडी!!! कुणी साडी म्हणतात,कुणी लुगडं ,कुणी आंग्लाळलेले सारी म्हणतात.पण प्रकार एकच.नेसण्याच्या पद्धती अनेक असल्या तरी कुठलीच पद्धत स्त्रीयांना कंमर्टेबल असेल असे वाटत नाही.नौवारी,पाचवारी,गुजराती एक ना एक अनेक नेसण्याच्या पद्धती.
तर!!! विषय डोक्यात यायला कारण म्हणजे मागच्या आठवड्यात पुण्याला गेलो होतो.गाडी नेली न्हवती त्यामुळे बसने प्रवास करत होतो.एका बस स्टॉपवर उभा होतो.बाजुच्या टपरीवरुन सिगारेट घेऊन ती ओढत शहरी लोकांची धावपळ बघत उभा होतो.शेजारी हालचाल जाणवली ,बघितले तर एक ललना बसची वाट बघत चलबिचल करत उभी होती.हातात मोठी पर्स होती, वैतागलेली वाटत होती याअर्थी नक्कीच कुठेतरी कामाला असणार ,तिथुन सुटल्यावर तिची घराकडे जायची घाई चालली होती.
एक बस लांबुन येताना दिसली ,तशी ती थोडी पुढे होऊन लगबग करायला लागली.पुणेरी वायझेड पीएमटी वेगात येऊन फक्त थांबल्यासारखि करत निघायला लागली तशी ती ललना धावतच चढायचा प्रयत्न करण्यासाठी बसकडे झेपावली.पुढच्या क्षणाला तिचा पाय साडीत अडकून तिचा कपाळमोक्ष झाला.तिला ' उठवायचे ' निमित्त करत दोन तीन पन्नाशीचे काका लोक सरसावले.कशासाठी सरसावले हे लिहीत नाही .अश्यावेळी हात साफ करुन घेणारे आंबटशौकीन फार असतात,त्यातलेच हे होते.मी सिगरेट हातात असल्याने लांबच थांबुन हे बघत होतो.बस केव्हाचीच निघुन गेली होती.उठुन उभे राहील्यावर तिने पाणि पिले.एव्हाना माझी सिगरेट संपत आल्याने मी ती विझवली व तिच्याशी संवाद साधायला तिच्याजवळ गेलो.
मी.-- लागलं का मॅडम?
ती- नाही,थोडंसं हाताला लागलं
मी--साडीत पाय अडकून पडलात ना?
ती-- हो.
मी--ड्रेस असता तर पड्ला नसतात!(ड्रेस-पंजाबी या अर्थी)
ती-- हो ना,
मी-- ड्रेस का वापरत नाही ?
ती-- घरी चालत नाही ड्रेस घातलेलं.
संवाद आता खाजगीत चालला होता ,अशावेळी मी काहीतरी निराळेच पचकतो म्हणून आवरते घेतले.माझी बस आली तसा मी बसमध्ये चढलो.मागे वळून बघितल्यावर तिने फक्त स्मित केले.
मग विचार करु लागलो,कुठल्या वायझेडने पुरुषांना धोतर व बायकांना साडी हा प्रकार सुरु केला असेल.? काय आहे या पेहरावात मिरवण्यसारखे? .एक कापड ज्याला ना कसली शिलाई आहे ना आकार उकार.ते अंगावर गुंडाळुण फिरायचे.पुरुषांनी कामाचे निमित्त करुन धोतरातून सुटका करुन घेतली.पण बायका मात्र त्याच आदिम वेशभुषेला चिकटून राहील्या आहेत.न्हवे त्यांना तसे रहावे म्हणून फोर्स केले जाते.
काम करणार्या स्त्रीयांनीच फक्त कंम्फर्टेबल वेशभुषा करावी असा काही दंडक नाही.घरात असणार्या स्त्रीयानीही पंजाबी अथवा तत्सम कपडे वापरले तर काय वाईट आहे.? घरात साडी नेसुन स्वयंपाक करताना पदर पेटून आजवर कीती स्त्रीया मेल्या आहेत याची तर गणतीच नाही.
तर संस्थळावरील स्त्री पुरुष दोघांनीही या विषयी चर्चा केलेलि आवडेल.
१.साडी नेसने हे तुम्हाला आदिम वाटते का ?
२.साडीमध्ये कंम्फर्ट नसावा/ नाही असे माझे मत आहे.आपले काय मत आहे.?
३.साडीला संस्कृतीशी का जोडले जाते? म्हणजे साडि नेसणारी सुसंस्कृत व इतर वेशभुषा करणारी स्त्री ही बदफैली वा चालू असते!!
(पंजाबि ड्रेस,जिन्स टीशर्ट कंफर्टेबल आहे स्त्रीयांसाठी असे माझे मत आहे.लेगिंग्ज मला प्रोव्होकेटीव्ह वाटतात ,त्यावर एक धागाही काढला होता.कृपया त्यावरुन विषयांतर नको)
याद्या
15138
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
तुम्ही साड़ी हा विषय घेऊन धागा
दोन आठवड्यापुर्वी काढला होता
In reply to तुम्ही साड़ी हा विषय घेऊन धागा by पगला गजोधर
बुरखा हा विषय घेऊन धागा
In reply to तुम्ही साड़ी हा विषय घेऊन धागा by पगला गजोधर
ताम्हनकर
In reply to बुरखा हा विषय घेऊन धागा by थिटे मास्तर
पहिल्यांदा तुमच्या या
साडी नेसणे आदिम वाटत नाही
सध्या पोच.
+१
In reply to सध्या पोच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह प्रा.डॉ. रशिक सुद्धा हैत
In reply to सध्या पोच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे देवा...
In reply to वाह प्रा.डॉ. रशिक सुद्धा हैत by थिटे मास्तर
हैकीनै सर, उगी परेशान व्हु
In reply to अरे देवा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आदिम नाय ओ
टापटीप नेसलेल्या असतील तर
आणि हो, साडीचा आणि संस्कृतीचा
In reply to टापटीप नेसलेल्या असतील तर by सूड
संस्कृतीचा संबंध
मला साडी व धोतरात काही आदिम वगैरे वाटत नाही...
मला माझ्या आजोबांशी नाळ
आजोबा - आजी वर गेल्यावर, बर्याच वर्षांनी??
In reply to मला माझ्या आजोबांशी नाळ by जेम्स वांड
शिंपल
In reply to आजोबा - आजी वर गेल्यावर, बर्याच वर्षांनी?? by योगेश लक्ष्मण बोरोले
साडीत कम्फर्ट किती हे
दुरुस्ती
In reply to साडीत कम्फर्ट किती हे by मराठी कथालेखक
स्टिच्ड गार्मेन्ट्स
नो नाय नेव्हर....!
In reply to स्टिच्ड गार्मेन्ट्स by राही
वस्त्रप्रावरणे आणि व्यक्तीस्वातंत्र्य
In reply to स्टिच्ड गार्मेन्ट्स by राही
साडी हजारो वर्षात कालबाह्य
हेच म्हणायचे आहे. दोन चार
In reply to साडी हजारो वर्षात कालबाह्य by अजया
साडी कालबाह्य झाली आहे हे खरेच
पुढे जावून मी म्हणतो की आता
In reply to साडी कालबाह्य झाली आहे हे खरेच by मराठी कथालेखक
रोज न नेसणे म्हणजे कालबाह्य
बरोबर
In reply to रोज न नेसणे म्हणजे कालबाह्य by अजया
गेले दीड वर्षं कामावर जाताना
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
धकाधकीच्या जीवनात साडी वापरणे
सिगरेट पिताना....
सिगरेटच्या धुराचा त्रास
In reply to सिगरेट पिताना.... by स्थितप्रज्ञ
पंधरा का सतरा रुपयांची सिगरेट
In reply to सिगरेट पिताना.... by स्थितप्रज्ञ
सिगरेट महाग झाली की ती न
In reply to पंधरा का सतरा रुपयांची सिगरेट by मराठी कथालेखक
सिगरेट महाग झाल्याचं बातमीत
In reply to सिगरेट महाग झाली की ती न by सुबोध खरे
आपण ४ दिवस घालून फिरवे नंतर
जिची तिची निवड
बाकी ठीक आहे
कुतुहल म्हणून विचारतोय
In reply to बाकी ठीक आहे by समीर वैद्य
साडी नेसणे प्रथा स्त्रीयांनी बंद करावी का????
महत्वपुर्ण धागा
१०) ललनेला प्रभावित करणारे
+१ ये मारा ११ ...
In reply to १०) ललनेला प्रभावित करणारे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Marathon on Saree
मागे एकदा टफी तूच लेगिंग वर
लेगिंग प्रोव्होकेटीव्ह आहे
In reply to मागे एकदा टफी तूच लेगिंग वर by समाधान राऊत
लेगिंग प्रोव्होकेटीव्ह आहे (
In reply to लेगिंग प्रोव्होकेटीव्ह आहे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
साडी अयोग्य, लेगिंग अयोग्य.
In reply to लेगिंग प्रोव्होकेटीव्ह आहे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
हो ना राव..मला तर टफीभाऊंच्या
In reply to मागे एकदा टफी तूच लेगिंग वर by समाधान राऊत
तु पण ना
In reply to हो ना राव..मला तर टफीभाऊंच्या by चिनार