Skip to main content

मावा केक

लेखक चित्रादेव यांनी शुक्रवार, 27/02/2009 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
cake-step2cake-step-3cake-step-last ओले सामानः २०० ग्रम मावा(४०० ग्रम रिकोटा चीज पासून मावा बनवायची कृती आपल्या चकली ताईनी दिली आहे), ४०० ग्रम मिल्कमेड डब्बा, १ कप कुठलेही वेज ऑइल, १ कप दूध, वरच सगळे एकत्र कमी आचेवर गरम करत ठेवावे एक उकळी येइपर्यन्त. हे सर्व गाळून घ्यायचे मगच कोरड्या सामानात मिक्स करा. कोरडे सामानः १ १/२ (दीड कप) मैदा, १ चमचा बेकींग पॉवडर, १ चमचा बेकींग सोडा, १ चमचा वेलची पूड, ४-५ काड्या केसर, १० काजू, वरील कोरडे सामान चाळून घ्या दोन तीनदा. मग वेलची,काजू आणि केसर पूड टाका. आता ओले आणि कोरडे सामान एकत्र करून फेटा एकाच दिशेने सरसरीत करा. १७५ डिग्री फॅरेनहाइट वर ३५ मिनीटे भाजा. १ अंड्याचा फक्त पांढरे हे ऑपशनल आहे. आधी लिहायला विसरले पण फोटो टाकताना आठवले. पण हवे असल्यास एक अंडे पांढरे भरपूर फेटून सगळ्यात शेवटी मिक्स करावे. चॉकलेट फ्रोस्टींगः १ पॅकीट unsweetned dark चॉकलेट चिप्स, १ कप दूध, १ चमचा बटर, १ चमचा मध. वरील एकत्र करून वितळवून घ्यायचे डबल बॉइलर मध्ये. हे मिश्रण केक वर ओतून सजवायचे. उरलेल्या मिश्रणात स्ट्रोबेरी घोळवा. मी आधी केक फ्रोस्टींग करून उरलेले वरून असेच टाकले. आणि बाकीच्यात स्ट्रॉबेरी घोळवून काढली.

वाचने 7704
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

छान लागेल शंकाच नाही .. लवकर फोटो ड्कवा ..

छानच आहे केक फोटो टाकलात तर अजुन छान वाटल असत.

मावा केक म्हटले की मला ग्रँट रोडच्या मेरवानची आठवण येते. ही पाकृदेखिल चांगली वाटतेय. फक्त फोटो तेवढा टाका बौ! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आम्ही बिनफोटूच्या पाकृंना प्रतिसाद देत नाही..क्षमस्व! फोटू कसा डकवायचा हे शिकवायची गरज आहे. अगदी सोपे आहे. १) आधी तो फोटो फ्लिकरवर चढवा. २) फ्लिकरवर फोटो चढवताना त्याला पब्लिक ऍक्सेस ठेवा ३) मग तो फोटो फ्लिकरवरच उघडा ४) फोटोवर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जा ५) आणि त्यातील यू आर एल मिपाच्या छायाचित्र संपादकत डकवा.. खलास.. तात्या.

किती दिवसांपासून ह्या पाकृच्या शोधात होते! फोटू, फोटू, फोटू!;) तयार चॉकलेट फ्रॉस्टींग घरात आहे ते वापरीन म्हणते! बाकी मावा केक बिन फ्रॉस्टींगचाही छानच लागणार! रेवती

In reply to by चकली

चकलीताई तू ग्रेट आहेस! काहीच्या काही सुंदर मिठाया बनवतेस की! एकदम चाबूक!:) रेवती

In reply to by चकली

चकली ताई मला मांसाहारी रेसिप्स आणि गुलाबजामचे पिठ घरी बनवुन करन्याची पध्दत हवी आहे कुपया कळ्वा

बर्‍याच भानगडी आहेत फोटो टाकायच्या. फ्लीकर वर काय नवीन खाते उघडायचे काय तात्यांनू? म्हणजे तोथून सुरुवात?

In reply to by चित्रादेव

फ्लीकर वर काय नवीन खाते उघडायचे काय तात्यांनू? म्हणजे तोथून सुरुवात? नाही. याहूचाच आयडी आणि पासवर्ड फ्लिकरकरता चालतो.. परंतु आपाला याहूचाही अकाउंट नसेल तर मात्र मज्जाच मज्जा! :) आपला, शम्मीतात्या कपूर. :)

मी फोटो फ्लीकर वर टाकले आणि लिन्क इथे अपलोड करायचा प्रयत्ने केला पण काही दिसत नाही चित्र. ते साइझ किती टाकायची? आणि URL नक्की कुठली कॉपी करायची फ्लीकरवरची? बेसीक मध्येच लोचा है इधर... कोइ है माय का लाल मदद के लिये तैयार?

In reply to by चित्रादेव

चित्राताई, तुम्ही फ्लिकरवर छायाचित्र अपलोड केले की वरच तुम्हाला ऑल साईझेस ही टॅब दिसेल. त्यावर क्लिक केले, की जो साईझ हवाय तो सिलेक्ट करून खाली आलेलेली लिंक कॉपी पेस्ट करा! http://bhagyashreee.blogspot.com/

चित्राताई, मस्त वाटतोय मावा केक. अता नक्की करुन बघेन. पण मला सांगा की कोरडे सामान चाळले नाही तर चालत नाही का? मी भारतातुन येताना चाळण आणली नाही . :( जर न चाळता जमत असेल तर सांगा ना? :)

भाग्यश्री, ताई नको हो. अभी भी मै जवान हू. :) धन्यवाद लिंक कशी अप्लोड कशी करायची ते सांगितले ते. समीधा, सामान चाळले की हवा मिसळली जाते आणि केक हलका होतो. :)

पुन्यात आल कि केक खायला भेटायचा. चहामदी पाव बुचकळुन खायला भेटायचा म्हनुन आमाल पुन लईच आवडायच. केकमदी अंड असल्याच कळ्ळ्यावर जरा चलबिचल झाली हुति. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मला शाहाकारी केकची रेसिपी हव्या आहेत ओवन नसल्यास कसे करावे हे हि द्या

फोटू आवडला! रेवती