Skip to main content

फुडोग्राफी २०१७

लेखक केडी यांनी गुरुवार, 27/07/2017 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गेली दिड वर्ष मी मिपा वर आहे, आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे बऱ्याच पाककृती टाकत आहे/टाकतो आहे. तुम्हा सर्वांकडून वेळोवेळी मिळालेली दाद, प्रोत्साहन ह्याने हुरूप वाढत आहे. यंदा, पुण्यात एक वेगळे प्रदर्शन भरत आहे, (ह्याबद्दल मला देखील फेसबुक वरून कळले. गम्मत म्हणून मी माझी काही छायाचित्र पाठवली, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझी काही छायाचित्रे देखील ह्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत). आपण पुण्यात असाल, तर प्रदर्शनास नक्की भेट देऊन, सगळ्या छायाचित्रकारांचे प्रोत्साहन वाढवाल ह्यात शंका नाही, म्हणून हे आग्रहाचे आमंत्रण! फूड फोटोग्राफी बद्दल इतर छायाचित्रकारांकडून अनेक गोष्टी शिकायची संधी ह्या प्रदर्शनामुळे मला मिळणार आहे, ह्याचा आनंद नक्कीच आहे! Invitation

वाचने 15414
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

अभिनंदन केदार. शनिवा,, रविवार पुण्याबाहेर असल्याने हे प्रदर्शन चुकणार.

सगळ्यांचे मनापासून आभार! प्रदर्शनात दिलेले बहुतेक फोटो इथे पाककृतीनं मध्ये टाकलेले आहेत, आता जे प्रदर्शनात दाखवण्यात येतील ते टाकेन इथे. मला देखील अजून मी दिलेल्यापैकी नक्की कुठले आणि किती फोटो प्रदर्शनात दाखवतील हे एक सरप्राईज असणार आहे.

व्वा व्वा छानच हार्दिक अभिनंदन

सगळ्यांचे मनापासून आभार! प्रदर्शनात दिलेले बहुतेक फोटो इथे पाककृतीनं मध्ये टाकलेले आहेत, आता जे प्रदर्शनात दाखवण्यात येतील ते टाकेन इथे. मला देखील अजून मी दिलेल्यापैकी नक्की कुठले आणि किती फोटो प्रदर्शनात दाखवतील हे एक सरप्राईज असणार आहे.
कधी टाकणार आहात फोटो ?