युट्युबवर शोधतांना उत्तम दर्जाचे मराठी चित्रपट जास्त सापडत नाहित. जे उत्तम आशय असलेले आहेत ते उत्तम दर्जाचे चित्रिकरण असलेले असतीलच असे नाही. बहुसंख्य मराठी, हिंदी चित्रपट एकतर नवीन आले असताना चित्रपटगृहात बघीतलेले असतात किंवा थोड्याच दिवसात युट्युब, टोरंटस वर मिळतात. हॉलीवुड चित्रपट देखील बरेच पाहायला मिळतात. पण ते कधी कोणत्या प्रकारचे धक्के देतील ते सांगता येत नाही म्हणून घरात बघण्याला मर्यादा येतात. या सगळ्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत दक्षिणेचे चित्रपट पहायला सुरुवात केली आणि मग ते आवडू लागले.
विशाखापटटणमला कंपनीच्या कामानिमित्त महिनाभर रहावे लागले होते. साईट होती भारतिय नौदलाचे 'जहाज बांधणी कार्यालय'. दिवसभर काम करुन दमल्यावर विरंगुळा काय ? तर एकतर समुद्रकिनार्यावर जाऊन बसणे किंवा मग टिव्ही पाहणे. पण टिव्ही पाहायला मजा येत नसायची. कारण त्या वेळी केबलचा इतका प्रसार झालेला नव्हता. एके दिवशी ठरवले की चला सिनेमागृहात जाऊन एखादा सिनेमा पाहु. सिनेमागृहाच्या बाहेर हे भले मोठे मोठे होर्डींग्स लागलेले असायचे. हिरोंना हार घातलेले असायचे. चित्रपटाचे नाव आणि चित्रपटातील भाषा काहिच कळत नसे. मात्र आजुबाजुच्या प्रेक्षकांच्या उत्साहाची लागण होत असे. पहिलाच चित्रपट बघीतला तो 'महेश बाबू' या नटाचा. अगदीच आवडून गेला. अर्थात नाव मात्र नंतर कोणालातरी विचारले तेव्हा कळाले.
एकंदरीत दक्षिणेतील चित्रपटसृष्टी प्रचंड मोठी आहे. प्रादेशिक चित्रपट तिकडे अमाप पैसा खेचतात. तिकडच्या नायक नायिकांची राजकीय उदाहरणे तर आपण नेहमीच बघत / ऐकत आलेलो असतो. कानडी, तेलुगु, तमिळ, मल्याळी अभिनेते वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांत काम करताना दिसतात. नायिका मात्र बर्याचशा उत्तरेकडच्या आहेत. (गोर्या रंगाची कृपा ??)
टाटा सुमो, स्कॉर्पियो, बोलेरो, फॉर्चुनर आणि तत्सम एसयुव्ही गाड्यांना या चित्रपटांत भरमसाठ मागणी असते. कारण खलनायक आले की गाड्याच्या गाड्या भरुन येतात. छोट्या कार्समधे असे कितीजण मावणार ? एकंदरीतच सगळ्या एसयुव्ही निर्मात्यांनी यांचे आजन्म ऋणी होऊन रहावे. जाहिरातीत होणार नाही एवढी पब्लिसिटी एक चित्रपट करतो.
युट्युबकृपेने आता बरेचसे (म्हणजे जवळपास सर्वच चित्रपट) हिंदी भाषेत अनुवादित होऊन आपल्यासमोर येतात. बर्याचशा चित्रपटांत नायक खलनायक अगदी ब्लॅक अँड व्हाईट शेडसह स्पष्ट ओळखता येतात. बर्याचशा चित्रपटांत हिरोला दोन हिरॉईन्स सोबत काम करायला मिळते. (एक चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत बहुधा काही कारणाने मरते). रजनिकांत, कमल हसन, मोहनलाल ज्यु. एन.टी.आर, विजय, नितिन, आलु अर्जुन, रवि तेजा (हा मला फार आवडतो. कारण चित्रपट हिंदीत असला तरी याचे २५% डायलॉग मराठीत असतात), अजित, नागार्जुन, वेंकटेश, चिरंजीवी, राम चरण तेजा, पवन कल्याण, प्रभास, राणा दगुबत्ती, सुर्या, गोपीचंद असे कितीतरी कलाकार आहेत. त्यांचा स्वतःचा प्रेक्षकवर्ग आहे. एका नायकाचे चित्रपट बघून त्याच्या प्रेमात पडायला सुरुवात करावी तोच दुसरा एखाद्याचा चित्रपट बघण्यात येतो. कधीकधी यांच्यात डावे उजवे करणे, क्रमांक देऊन त्यांची प्रसिद्धी मोजणे अशक्य होऊन बसते.
खलनायकांत प्रकाश राज, सोनु सुद, आशिष विद्यार्थी, राहुल देव, नासिर, प्रदिप रावत, अजय, विद्युत जामवाल असे नेहमीचे चेहरे असतात. नायिकांप्रमाणे खलनायकीमधे देखील उत्तरेने दक्षिणेवर स्वारी केलेली दिसते. आपला सयाजी शिंदे तर सहनायक, खलनायक, विनोदी, भ्रष्ट आणि इमानदार पोलीस ऑफीसर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे रोल तितक्याच ताकदीने साकारत असतो.
नायिकांमधे राधिका आपटे, तमन्ना भाटीया, काजल अगरवाल, हंसिका मोटवानी, जेनेलिया डिसुजा, दिक्षा सेठ, भुमिका चावला अशी इतर भारतीय नावे दिसतात. मात्र खास साउथ इंडियन नायिकांचा ताफा देखील तितकाच अफाट आहे ! अनुष्का शेट्टी (बाहुबलीवाली), समांथा, आसिन, श्रूती हसन, श्रेया, तापसी पन्नु, रम्या, अमला पॉल...... यादी लांबच लांब आहे.
साउथ मधे कोणीही हिरो होऊ शकतो हा माझा आवडता वाक्यप्रचार आहे. काही चित्रपटांचे नायक बघीतले तर या वाक्याची प्रचिती नक्की येते. या सगळ्यात मल्याळम सिनेमे थोडे संथ आणि काळाच्या मागे वाटतात. (कदाचित मी जास्त चित्रपट पाहिलेले नसतील.) बहुधा सगळेच (नायक, खलनायक) जास्त प्रमाणात ढोसत असतात की काय कळेना. डोळे बघावे तर लाल लाल !
सर्व सिनेमांमधील महत्त्वाचे पात्र म्हणजे 'ब्रह्मानंद' १०० पैकी ९० सिनेमांमधे हा असतोच असतो. याची खासीयत वर्णन करण्यापेक्षा तुम्ही स्वत:च बघावी.
यातील बरेच कलाकार बॉलीवुडमधे ही चमकले आहेत. काही टिकून राहिलेत तर काही गायब झाले. काळाचा महिमा !
इति दक्षिणायन समाप्त !
आजचा चित्रपट : जनता (था) गराज ! : नायक : ज्यु. एन.टी.आर.
वाचने
5106
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरच! उच्च प्रतिच चित्रिकरणं,
सयाजी गायकवाड नाही, शिंदे.
स्वारी !
In reply to सयाजी गायकवाड नाही, शिंदे. by अभ्या..
चांगल्या दाक्षिणात्य
साऊथ
दक्षिण भारतीय चित्रपटस्रुष्टी....
धन्य आहे
भौतिकशास्त्राच्या नियमांना
In reply to धन्य आहे by अभिदेश
बिनडोक स्टीरीओटाईप , भौतिकशास्त्राच्या नियमांना फाट्यावर मारणार
In reply to धन्य आहे by अभिदेश
मला सांगा
काय फालतू प्रश्न आहे म्हणतो
In reply to मला सांगा by अभिदेश
छान लेख आहे. साऊथ चे चित्रपट खूपच भारी असतात
संगीत आणि गाणी .... अप्रतिम..
चांगला लेख
बऱ्याचदा
मस्त लेख आहे ! आवल्डला !
पुली मुरुगन
महेश बाबू चा मी