समाजातील लब्ध प्रतिष्ठित आणि त्यांची काल्पनिक दुःखे
आज १६ जुलै चा लोकसत्ता. लोकरंग पुरवणी. सचिन कुंडलकर चा लेख. - जसे जगायला हवे तसे.
http://www.loksatta.com/karant-news/sachin-kundalkar-article-on-chef-siddharth-mahadik-1512403/
पैसे कमावणे म्हणजे काहीतरी एकदम सोप्पी आणि फालतू गोष्ट असून ती कोणीही करू शकतो. पण आपल्या मनाप्रमाणे बेफाट बेधुंद इ इ जगणे हे खरे मर्दा चे काम असते असे एकंदरीत या कुंडलकराचे म्हणणे आहे !!
आधी सिद्धार्थ महाडिक ची स्टोरी. पुण्यातील एका "साध्या" मध्यमवर्गीय घरातील मुलगा. मरिन इंजिनिअर झाला. मग ते क्षेत्र त्याला आवडले नाही. त्याला स्वयंपाका ची आवड होती. मग काय त्याने ते शिकायचे ठरवले. तो ऑस्ट्रेलिया ला गेला. अडीच वर्ष तिथे राहून तिथल्या अतिशय प्रसिद्ध अशा Cordon Bleu cookery school Sydney मध्ये शिकला. रेफ - http://timesofindia.indiatimes.com/life-style/food/food-reviews/Restaurant-review-Le-Plaisir-European/articleshow/22140318.cms
तिथून परत आल्यावर नोकरी करायचे नाही असे त्याने ठरवले आणि सरळ स्वतःचे हॉटेल टाकले.
याच्या या सगळ्या हौशींना याचे "साधे" मध्यम वर्गीय पालक सपोर्ट करत होते !! मान्य आहे कि हा सिद्धार्थ महाडिक मेहनती आहे. पण हा "साधा" मध्यमवर्गीय कसा काय बुवा ? कुंडलकरची मध्यम वर्गाची व्याख्या काय ?
ते जाऊ दे. पुढे या कुंडलकराला म्हणे बरच लोक भेटलेत कि जे IT मध्ये काम करतात. चिक्कार पैसे कमावतात पण खुश नाहीत. वेगळे काही करू इच्छितात. अरे अति हुशार माणसा . ते खुश नाहीत याचे कारण काय असेल याच्यावर विचार केलास का तू ?
हि घे कारणे. डोईजड काम, डेड लाईन , वर्क प्रेशर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नोकरीची नसलेली शाश्वती .
समजा एखादया माणसाला देवाने सरळ वरदहस्त दिला कि - तू आजपासून चिंता करू नको. जमेल तसे काम कर. अगदी ७ तासात पण कामावरून पळ काढ . तुला नोकरी मधून कोणीही काढू शकणार नाही. कंपनी बंद पडणार नाही. बंद पडणार असेल तर आधीच मी तुला दुसऱ्या कंपनीत लावेन . तुला भरपूर पगार देतो. सगळ्या सुट्टया देतो. आणि चिक्कार increment पण मिळेल. आता सांगा कोण म्हणेल कि मी नाखूष आहे. मला नको ते पैसे ?
आत्ता काल परवा एका तेलगू मुलाने नोकरी वर रुजू झाल्यावर २/४ दिवसातच आत्महत्या केली पुण्यात. माहित आहे ? पेपर वाचतात का हे कुंडलकर ?
मला तरी आज पर्यन्त कोण्ही माणूस असा भेटला नाही कि जो म्हणतोय मला चिक्कार पैसे मिळतो. नको तो पैसा .
तरीही कुंडलकर साहेब तुम्हाला खरोखर असे मजबूत पैसे वाले लोक नेहमी भेटत असतील तर एक काम करा. त्यांच्या कडून समाजा करता काही देणगी जमा करा. पैसे बाबा आमटे , स्नेहालय यांच्या नावाने जमा करून घ्या . बघू किती जमतात पैसे .. घेणार का हे challenge ?
जाता जाता - चित्रा पालेकर पण लिहितात . रविवार लोकसत्ता मध्ये. गेल्या महिन्यात लेख वाचले. एकदा आपला मुलगा कसा गे आहे याचे कौतुक वाचले. नंतर एकदा आपली मुलगी पण कशी लेस्बियन आहे हे पण वाचले. पण हे सगळे प्रकार म्हणजे एक प्रकारचं मानसिक आजार आहे. वाचा - एल जी बी टी समूहाचा मानवाधिकार आणि गौरवीकरण - http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/lgbt/articleshow/59609483.cms
याद्या
6826
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
नेमका काय काथ्या कुटणे
मुद्दा काय आहे ?
कुंडलकरांचा असा राग राग करू
ठो
In reply to कुंडलकरांचा असा राग राग करू by आदूबाळ
तुम्ही एकदम जबरा फॅन दिसताय .
In reply to कुंडलकरांचा असा राग राग करू by आदूबाळ
अवघडे,
In reply to तुम्ही एकदम जबरा फॅन दिसताय . by अभिजित - १
डब्बल ठो :D
In reply to अवघडे, by अभ्या..
उपरोध समजून घेत चला हो साहेब.
In reply to तुम्ही एकदम जबरा फॅन दिसताय . by अभिजित - १
ऑ, मी केले तरी काय हो सायकल
In reply to उपरोध समजून घेत चला हो साहेब. by मोदक
तुमी नाय वो.. तुमाला उद्देशून
In reply to ऑ, मी केले तरी काय हो सायकल by जेम्स वांड
ट्रिपल ठो ..!!
In reply to तुमी नाय वो.. तुमाला उद्देशून by मोदक
बाकी तुमचे आणि मिपाचे जुने
In reply to तुमी नाय वो.. तुमाला उद्देशून by मोदक
पावभाजीत सांबार मसाला घातला
In reply to कुंडलकरांचा असा राग राग करू by आदूबाळ
मनोरंजक !!!!
http://www.loksatta.com
तुम्ही उल्लेखलेल्या बातम्या
नक्की मुद्दा काये?
हो अशी लोकं भेटतात अनेक..
In reply to नक्की मुद्दा काये? by अनुप ढेरे
लब्ध प्रतिष्ठित चा अर्थ
श्री आनंद भाटे (आनंद गंधर्व)
In reply to लब्ध प्रतिष्ठित चा अर्थ by सुबोध खरे
आनंद भाटे झेन्सारचे सीईओ नसावेत
In reply to श्री आनंद भाटे (आनंद गंधर्व) by आदूबाळ
त्यांच्या गायनाच्या अगोदर
In reply to आनंद भाटे झेन्सारचे सीईओ नसावेत by तुषार काळभोर
मनाला हवे तसे
रविवारच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमधे