स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई!!
'लेप्टोस्पायरोसिस' या प्रसंगी जीवघेणा ठरणाऱ्या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे, काय करू नये, हे सांगणारी एक जाहिरात सध्या मुंबई महापालिकेतर्फे सिनेमागृहांमध्ये दाखविली जात आहे. गलिच्छ ठिकाणी साचलेल्या पाण्यात अनवाणी चालू नये, शेळ्या/गुरेढोरे/भटकी कुत्री/डुकरे यांच्या मलमूत्राचा पायाच्या जखमाशी संसर्ग टाळावा आदी सूचना मनावर ठसविण्यासाठी मुंबईतील कमालीच्या गलिच्छ ठिकाणांचे ठळक चित्रण या जाहीरातीत करण्यात आले आहे.
मुंबईत जागोजागी एवढा भीषण गलिच्छपणा साचला आहे, काही वस्त्यांमध्ये माणसे अक्षरश: नरकातले जीणे जगत आहेत, अनेक उकिरड्यांवर माणसे आणि प्राणी समान हक्कांच्या जाणीवेने वावरत आहेत, याची प्रखर जाणीव करून देणारी अनेक भडक दृश्ये या जाहीरातीत दिसतात.
एकूणच, सर्वसामान्य मुंबईकरांना किंवा मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना फारशी न दिसणारी, नजरेआडची किळसवाणी मुंबई या जाहिरातीमधून जगासमोर आणूनही, जाहिरातीचा शेवट मात्र, 'स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई' अशा अभिमानपूर्ण घोषणेने करण्यात आला आहे.
गलिच्छपणाची ढळढळीत चित्रे जिवंतपणे मांडूनही 'स्वच्छ आणि सुंदर' मुंबईचा खणखणीत नारा देण्याच्या या 'धाडसी' जाहिरातीबद्दल मुंबई महापालिकेचे अभिनंदन करावयास नको का?
याद्या
8000
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
ती 'अपेक्षा' आहे, 'धाडस' नाही.
छे, हा तुमच्या पर्सेप्शन चा
महानगरपालिकेने स्वच्छता करत
स्वच्छता राखणे ही सगळ्याची जबाबदारी आहे.
In reply to महानगरपालिकेने स्वच्छता करत by ज्योति अळवणी
अधिकृत व अनधिकृत वस्त्या
बरोबर आहे
In reply to अधिकृत व अनधिकृत वस्त्या by गामा पैलवान
गामा जी
+1
In reply to गामा जी by विशुमित
विशुमित