Skip to main content

उद्यानांचे सुशोभीकरण ( संशयास्पद चाल म.न .पा. ची )

उद्यानांचे सुशोभीकरण ( संशयास्पद चाल म.न .पा. ची )

Published on बुधवार, 12/07/2017 प्रकाशित
फार पूर्वी जर आपल्याला माहित असेल तर महानगर पालिकेच्या उद्यानात कुंपण म्हणून एक कडू वनस्पतीचा वापर केला जायचा .. त्या वनस्पतीचे नाव मला माहीत नाही आता .. पण पूर्वी माझ्या कॉलेजमध्ये मी संशोधन करत असताना एका विद्यार्थी मित्राने त्या वनस्पतीवर भरपूर शोधनिबंध सादर केले होते .. माझी त्यावर त्याच्याशी चर्चा देखील झाली ... त्या वनस्पतीचे फायदे ऐकून तर मी चाट पडलो होतो .. त्यातील एक म्हणजे कित्येक मीटरपर्यंत ती डास आणि माश्याना लांब रोखू शकत होती .. मला अजूनही आठवतंय .. आम्ही सारे आमच्या येथील उद्यानात बिनधास्त खेळायचो .. आजची परिस्थिती आज आपण सारे बघतो ते उद्याने निव्वळ बनकामाच्या फुलझाडांनी सुशोभित केलेली असतात .. त्यामुळे काही विषारी कीटकही त्या फुलझाडांमुळे आकर्षित होतात .. मागे लोकसत्तामध्ये वाचताना तर मला चीड आली ... एका मुलीचा विषारी कीटकाने चावा घेतल्याने अकस्मात मृत्यू .. ती फक्त उद्यानात तिच्या वडिलांसोबत बॅडमिंटन खेळात होती ... तिथे तिला काहीतरी चावले .. तिने त्याला मारले देखील .. घरी आल्यावर तिला मळमळु लागले आणि इस्पितळात दाखल केल्यावर उपचारादरम्यान तिचा मृत्यू ... काय तर म्हणे त्याचा ऍंटीडोट उपलब्ध नव्हता ... ह्या अश्या विचित्र केसेस पूर्वी तर वाचनात आल्या नव्हत्या ... एक मात्र नक्की .. ती औषधी झाडं का काढली .. का कुणी सोयीस्कर रित्या काढली .. हे सीशोभीकरण आहे कि म . न. पा .ची एक विशेष चाल आहे .. त्यामागे काही अर्थकारण आहे का कि अजून काही ? त्या औषधी झाडांची आजही तेवढीच गरज आहे जेवढी पूर्वी होती .... आपले मत या विषयावर आवश्यक आहे ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

याद्या 8379
प्रतिक्रिया 29

.... आपले मत या विषयावर आवश्यक आहे ... -- नक्की कोणत्या विषयावर ??

त्या औषधी वनस्पतीवर ... जिचा उपयोग आजही लोक खेड्यापाड्यात गुरंढोरं येऊ नयेत म्हणून करतात .. त्या विषयावर

ती वनस्पती कडू मेंदी असावी. त्याचे पान तोडले तरी हात कडू होत असत आणि साबणाने समूळ धुवावे लागत. आमच्या सोसायटीत कुंपणाला होती. पण त्यामुळे डास होत नाहीत असे मात्र नव्हे.हा एक दुवा पण आहे. http://www.loksatta.com/thane-news/benefits-of-a-living-fence-for-planting-1125289//lite/

धन्यवाद खरे साहेब .. इथे या लिंकमध्ये जो हँगिंग गार्डनचा उल्लेख केलेला आहे तीच वनस्पती .. आजही तिथे आहे .. या वनस्पतीमुळे डास होतं नाहीत हे हि खरे आहे .. माझ्या मित्राचे शोधनिबंध मी वाचले आहेत .. तो संशोधनदरम्यान नेहेमी गटाराशेजारून डास पकडून आणायचा आणि त्या वनस्पतीच्या बनवलेल्या अर्कामध्ये बंद करून ठेवायचा ...

In reply to by सिद्धेश्वर विल…

मेहंदी नाही. तुम्ही म्हणताय तशी वेगळी कुंपण म्हणून लावली जाणारी कडू वनस्पती आहे. आमच्याकडे मेती म्हणतात (खायची मेथी वेगळी) आमच्या लहानपणी एक अफलातून कल्पना होती या वनस्पतीबद्दल. आताही असेल. एरव्ही कडू लागणारा या वनस्पतीचा पाला सापाचे विष अंगात भिनल्यावर गोड लागतो म्हणे.

In reply to by सतिश गावडे

आता डॉ. खरेंनी दिलेल्या दुव्यावर फोटो पाहिला. हीच ती वनस्पती. आमच्याकडे कडू मेहंदी न म्हणता मेती म्हणतात.

In reply to by आदूबाळ

'त्या' औषधी वनस्पतीचं नाव काय आहे?
त्याच्याशी काय घेणं देणं आहे? आपल्याला रतीब घालता आला म्हणजे झालं.

In reply to by आदूबाळ

माझ्या आठवणीत ही वनस्पती कुंपणाला असायची आणि तिला हात लागला असेल तर आमची आई आम्हाला हात धुतल्या शिवायकाही खाऊ देत नसे.

एक निंबळक म्हणून गाव आहे .. सोलापूर रोडला ... त्या गावात मी वर्षाकाठी एकदा तरी जातो .. तिथे प्रचलित असलेल्या आख्यायिकेप्रमाणे त्या गावात कडुलिंबाची काडीपण जाळली जात नाही .. का तर म्हणे त्या घरातून साप निघेल आणि तो सर्व नष्ट करेल .. त्या गावात आजही कडुलिंबाची प्रचंड प्रमाणावर झाडे आहेत .. तिथे गेल्यावर एक वेगळाच आल्हादायक आनंद मिळतो .. शुद्ध हवा .. कुठलाही कीटक नाही ..

गाव नगर रोडला आहे , सोलापूर नाही ..

निगडीची झाडे असावीत. गुरे अजीबात खात नाहीत. कायम गीरहीरवीगार असतात, ५ ते १० फुटापर्यंतच वाढतात. बर्र्‍याच ठीकाणी कुंपणाला वापरतात.

तो कडू मेंदा! याच्या पांढय्रा फुलांची तिपेडी वेणी करता येते. पण कुण्णाला नको असायची.

घाणेरीच्या झाडाजवळ डास फिरकत नाही असे वाचले आहे. काही वनस्पती या किटक भक्षकही असतात. तुळशीच्या रोपावरही संध्याकाळी डास बसतात आणि तेथेच चिटकून राहतात.

माणसांना चावण्याचं काम डासीन बाई करतात, ते ही अंड्यांच्या पोषनासाठी, मग डासोबा कशावर जगतात? ते झाडांच्या कोवळ्या फांद्यांमधुन जिवन रस शोषुन जगतात असं ऐकुन आहे, हे जर खरे असेल तर, त्या औषधी झुडपाच्या प्रकारात तथ्य आहे असे म्हनावे लागेल.

सादर लेखातील उदाहरण म्हणजे specific केमिकल्सची ऍलर्जी असू शकते. जर तिथे खरंच विषारी कीटक असतील तर अशा केसेस सारख्या घडल्या असत्या ज्या सुदैवाने घडत नाहीयेत. मागे एका व्यक्तीचा मृत्यू धनुर्वात प्रतिबंधक इंजेक्शनच्या ऍलर्जीमुळे झाल्याचे ऐकिवात आहे (त्या व्यक्तीने आयुष्यात ते इंजेक्शन पहिल्यांदाच घेतले होते). असो! बाकी औषधी वनस्पतींच्या लागवडीच्या गरजेबद्दल सहमत!

लेखात उल्लेखलेली वनस्पती म्हणजे कोयनेल किंवा कडू मेंदी हीच आहे. हिचे शास्त्रीय नाव clerodendrum inerme असे आहे. हिला छोटी छोटी पांढरट गुलाबी फुले येतात. पराग केसर गुलबट असतात. देठ थोडे लांब असल्याने एकात एक गुंफून वेणी करता येते. फुलांना मंद वास असतो. सार्वजनिक बागांमध्ये कुंपणाला किंवा पायवाटांच्या बाजूबाजूने कोयनेल लावतात. हिची योग्य छाटणी करून वेगवेगळे आकार देतात. त्यामुळे कुंपणाची शोभा वाढते.

In reply to by राही

आपल्याकडे लोकमानसात कोयनेल हे औषध म्हणून हिवतापाशी जोडले गेले आहे. पण हिवतापावरचे क्विनाइन हे औषध ज्या वनस्पतीत असते ती सिंकोना (cinchona) ही वनस्पती अगदीच वेगळी आहे. तिचा क्लेरोडेन्ड्रम इनेर्मे शी काहीच संबंध नाही.