कुर्कुरीत रवा डोसा
राम राम मिपाकर्स,
खुप दिसानी उगवले मिपावर ;)
नुकतच आमचं शुभ मंगल उरकल्यामुळे घर गृहस्थीतुन वेळ मिळणा झाला :)
मग मिपावर येन दूरच .. तरी अधून मधून मिपावर चक्कर टाकायचे आता कळतय अरे संसार संसार ;)
तर असो. आता आलेच आहे तर एक रेसेपी देऊनच जाते :)
घ्या साहित्य :
रवा १ वाटी
तांदुळाची पिठी अर्धा वाटी
२ चमचे मैदा ( ऑप्शनल ) कुणी बेसन पण वापरतात
जिरे - चमचा भर
आलं पेस्ट - अर्धा चमचा( ऑप्शनल )
दही - ३ चमचे
मीठ - चवीनुसार
हिरवी मिरची बारीक कापून किंवा पेस्टुन तुमच्या ऐपतीनुसार ;)
कृती :
वरील सर्व साहित्य पाणी घालून नीट पातळ मिक्स करून घ्या. रवा पाणी शोषून घेतो म्हणून मिश्रण घट्ट वाटल्यास ऐन वेळी जास्तिच पाणी घालून पातळ करू शकता आता हे मिश्रण कमीत कमी अर्धा तास सेट व्हायला ठेवून द्या.
आता नॉनस्टिक पॅनवर थोडं तेल पसरवून हे मिश्रण डावाने पूर्ण पॅन भर एकसारखे ओता . मिश्रण पातळ असेल तरच डोसा कुरकुरीत होईल
मिश्रण नीट ओतणे हीच खरी गोम आहे एकदा हे जमले कि हुश्श करा ;)
एक बाजू खरपूस झाली तरी छान लागतो हा डोसा :) सांबार , चटणी सोबत किंवा तसाही ट्राय करून पहा.
आता हेच मिश्रण घट्ट सर ठेवून यात कांदा उकडलेला बटाटा कोथिंबीर घातली कि झाला तुमचा रवा उत्तप्पा :)
लोभ असावा.....
आप्लिच पिवशी उर्फ जिल्बुशा :)
लोभ असावा.....
आप्लिच पिवशी उर्फ जिल्बुशा :)
याद्या
20482
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास.. करुन बघेन हा रवा डोसा.
मस्तच!
भारीय ग्ग ! ...
वा वा, पोरगी संसाराला लागली
अभिनंदन
रेसिपी आवडली गं सौ पियुषा.
+ १११ उखाणा आलाच पायजे :)
In reply to रेसिपी आवडली गं सौ पियुषा. by रेवती
बाडिस
In reply to रेसिपी आवडली गं सौ पियुषा. by रेवती
अरे वा!! झालं का लगीन.
'नवीन' पाककृती मस्तच एकदम.
सौ.पियुशा* ह्यांची पाकृ आवडली
माझ्या माहेरी पण माझ्या
In reply to सौ.पियुशा* ह्यांची पाकृ आवडली by पिलीयन रायडर
सुडा ,झालं हो झाल ......
१ जुलैला नवरा 'नवीन' असलेलं
In reply to सुडा ,झालं हो झाल ...... by पियुशा
ने नाय नाय आम्ही 30 मार्च ला
In reply to १ जुलैला नवरा 'नवीन' असलेलं by सूड
हुश्श !! नायतर हा आय्डी
In reply to ने नाय नाय आम्ही 30 मार्च ला by पियुशा
पिवडे हे काय नवीन?
लोलम लोल;) तुला मिस केले बाई
राग राग झालेली बाहुली
In reply to लोलम लोल;) तुला मिस केले बाई by पियुशा
अशाच
नविन पाककृती सुरेख हो पिवडे!
नविन पाककृती सुरेख हो पिवडे!
मस्त पाकृ!
पाककृती छान!
छानच रेशिपी ग पिवशे.
नवीन नवनधुची नवीन रेसेपी भारी
नववधुची **
मस्त पाकृ!
अर्र पिशवी सुद्द लिहायला
In reply to मस्त पाकृ! by रुपी
रेसिपी आवडली..
यावेळी जिल्बी नसून चक्क डोसा
शिकायली पिवशी आता. :)
चान चान फोटू !
आमची आजी म्हणायची
In reply to चान चान फोटू ! by सस्नेह
पहिला पर्याय अवलंबून बघतेय
In reply to आमची आजी म्हणायची by सुबोध खरे
छान नवीन पाककृती,
शुभेच्छा