Skip to main content

मेथी कॉर्न पुलाव

लेखक केडी यांनी रविवार, 09/07/2017 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
MethiCornPulao-2 साहित्य १/२ कप मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न) ३/४ कप चिरलेली मेथी २ मध्यम आकाराचे कांदे, उभे चिरून २ ते ३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून २०० ग्रॅम बासमती तांदूळ, धुवून, अर्धा तास भिजत घालून १ मोठा चमचा तूप (किंवा तेल) ५ ते ८ काळेमिरे १ तुकडा दालचिनी ३ ते ४ लवंग ३ ते ४ वेलदोडे १/२ चमचा हळद (ऐच्छिक) मीठ चवीनुसार २ कप गरम पाणी कृती यंदा पावसाच्या कृपेने बाल्कनीत लावलेली मेथी भरपूर आली, त्यामुळे हि एक झटपट पण छान पाककृती करता आली. MethiGarden Ingredients पातेल्यात तूप गरम करून, त्यात खडे मसाले (काळेमिरे ते वेलदोडे) एक ते दोन मिनिटे परतून घ्या. उभा चिरलेला कांदा घालून, कांदा २ ते ३ मिनिटे परतून घ्या. Step1 Step2 ह्यात चिरलेली मेथी, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मक्याचे दाणे घालून मध्यम आचेवर चांगले ३ ते ४ मिनिटे परतून घ्या. Step3 Step4 ह्यात भिजवलेला तांदूळ (पाणी निथळून), मीठ आणि हळद (वापरत असल्यास) घालून मिश्रण अजून थोडं परतून घ्या, ह्यात आता २ कप गरम पाणी घालून, एक उकळी येऊ द्या. गॅस कमी करून, पातेल्यावर झाकण ठेवून पुलाव शिजवून घ्या. हाच पुलाव कुकर मध्ये करत असाल तर २ शिट्ट्या काढून घ्या. Step5 Step6 गरम गरम पुलाव दह्या सोबत खायला घ्या! MethiCornPulao-1

वाचने 8325
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

फोटो छान! कॅान आणि मेथीची पाने फुलं सजावट झकास! मेथी पाने अगोदर घातल्याने कडू होतो का?

स्पेशली ती फुलांची आयडिया फारच आवडली. लौकरच करून बघेन

तोंडाला पाणी सुटले. फोटो तर झकास! नक्की करून पाहीन.

फोटो तर काय आहेत एक एक! ती मक्याच्या दाण्यांची फुलेही फारच देखणी आहेत.

काय फोटो!! तो मेथी, कॉर्न आणि कांदे एकत्र परततानाचा फोटो सुद्धा काय सुंदर आहे! शेवटचा तर झकासच!!

वाहवा! गणपा, सानिकातै ह्यांच्या एलिट क्लब चा वारसा तुम्ही पुढे नेताय.. :) येऊ द्या मस्त मस्त पाककृती.....

छान दिसतो आहे पुलाव.. स्वाती