........ हे काही माहीत नाही.तांदूळातील खडे माहीत आहे, पण तांदूळ., गहू, ज्वारी, बाजरी इ. धान्यात भेसळ आम्ही तरी बघीतली नाही.कदाचित आमचे मारवाडी दुकानदार (हो, आमच्या डोंबोलीत तरी बरेचसे दुकानदार मारवाडीच आहेत.) ह्या धान्यात भेसळ करत नाहीत.
"चायनिस प्लास्टिक तांदूळ" ही काय नविन भानगड?
बरंय बाबा आमच्या डोंबोलीत तरी हे प्रकरण नाही आहे ते.
फेसबूक आणि व्हॉट्स अप वरून धोरण ठरवायची वेळ आली आहे आजकाल.
मध्यंतरी, (म्हणजे परवाच पुण्याला पी.एम.टी. मध्ये) एकाने दुसर्याशी चायनीझ प्लॅस्टिकची अंडी" ह्यावर वाद घातला होता. पुरावा म्हणून व्हॉट्स अपचे नाव घेतले.
आमच्या कडे जुना नोकिया असल्याने त्यांचा हा वाद-विवाद काही रेकॉर्ड नाही करता आला...
वाद जरी पुण्याला झाला तरी ते बहूदा पुणेकर नसावेत.कारण पुण्यातील जनता पी.एम.टी,ने प्रवास करत नसावी.असा अंदाज..... कारण आजकाल असली पुणेकर पी.एम.टी.ने प्र्वास केला की तिकिटे जप्पुन ठेवतात, असा अंदाज आहे.
पण पुणे म्हटले की....असो....
मी देखील 'प्लास्टीकचा मेड इन चायना तांदूळ' हा whatsapp वर आलेला व्हिडियो पाहिला. त्यात एक महिला, शिजवलेल्या भाताचे गोळे करून जमिनीवर आपटते व ते बॉलसारखे उडतात असे दिसते. मला वाटते हे खोटे आहे. तांदूळ काही इतका महाग नाही की प्लास्टिकचा तांदूळ भेसळीसाठी वापरावा लागावा. त्या व्हिडियोमध्ये दाखवलेला तांदूळ हा 'रॉयल बासमती राईस' दाखवला आहे जो आमच्या इथे (ह्युस्टन, टेक्सास स्टेट) मिळतो. वरील प्रकार खरा आहे की खोटा हे ठरविण्यासाठी माझ्या मते खालील प्रयोग करून बघण्यास हरकत नसावी.
मुठभर तांदूळ तव्यावर भाजावेत, जर त्यात खरोखरीच प्लास्टिकचे दाणे असतील तर ते उष्णतेने वितळतील व तव्याला चिकटतील.
जाणकारांनी आपले मत कळवावे.
तांदूळ खाऊन पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी काटकी घेऊन जायचं लोट्या/टमरेला सोबत नदीकाठी तुळस लावायला जाताना..... संबंध तांदळाचे दाणे घावले तर त्यो भुसारमाल व्यापारी अन तो तांदूळ परत न घेणे........
मी देखील हेच म्हंटलं होतं. पण ही भेळसेळ बासमती राईसमध्ये केल्याचे दाखवले आहे त्यामुळे शंकेला थोडीफार जागा आहे.
मागे कोबी देखील प्लास्टिकचा बनवतात असं दाखवणारा व्हिडियो फिरत होता. आता कोबी सारखी स्वस्त भाजी कोण कशाला प्लास्टिकची करतील ?
इथं म्हटलंय कि अश्या गोष्टी ढकलताना पाहून जगातली विकृत माणसं पोट धरून हसत असतील,
पण मी ही अश्या गोष्टींना जेव्हा लोक खूपच मनावर घेतात तेव्हा पोट धरून हसतो.
प्रतिक्रिया
तांदुळातील भेसळ......
https://www.youtube.com/watch
In reply to तांदुळातील भेसळ...... by मुक्त विहारि
तुम्हाला व्हाट्सअप मेसेज आला
अरे बाबा....
In reply to तुम्हाला व्हाट्सअप मेसेज आला by सतिश गावडे
https://www.youtube.com/watch
In reply to अरे बाबा.... by मुक्त विहारि
https://www.youtube.com/watch
In reply to तुम्हाला व्हाट्सअप मेसेज आला by सतिश गावडे
ओरिजिनल तांदळाचा भात होतो
मला वाटतं
अलोकस, याचं उत्तर मिळालं की
तांदूळ खाऊन पहा, दुसऱ्या
आणखी एक
पण मुळात अशी भेसळ करतीलच
खरं आहे.
In reply to पण मुळात अशी भेसळ करतीलच by उगा काहितरीच
हा हा हा . . . मी ही विकृतच म्हणायचा