पावसाच्या सुरवातीला मिळणारी ही अजून एक रानभाजी. या दिवसात जांभळी नाक्यावर अशा अनेक भाज्या विकायला आलेल्या असतात. लालसर देठ आणि त्याच्या टोकाला कात्र्या कात्र्याची हिरवीगार पाने म्हणजे बाफळी. बाफळीची भाजी वातहारक असते. आमच्याकडे काम करणाया मावशी सांगतात त्याप्रमाणे याच्या बियांपासून तेल बनवतात. ते असो पण याची भाजी मात्र एकदम फर्मास लागते .
1
2
साहित्य:
बाफळीच्या दोन जुड्या ( मी दोन आणल्या पण अजून चार सहा तरी आणायला हव्या होत्या ही रूखरूख लागलीच )
दोन माध्यम आकाराचे कांदे ( बारीक चिरून)
पाऊण वाटी बेसन
४ ५ लसूण पाकळ्या (ठेचून)
एक चमचा ओवा
एक चमचा मोहरी
एक चमचा हळद
एक चमचा किंवा हवं तर अधिक तिखट
दोन चमचे तेल
चवीपुरतं मीठ
3
आधी बाफळीची पानं देठापासून खुडून घ्यावी. स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. एका टोपात पाणी उकळत ठेवावे उकळल्यावर त्यात ही चिरलेली भाजी टाकावी. सुमारे सात आठ मिनिटे उकळल्यावर गॅस बंद करावा. थंड झाल्यावर भाजी चांगली पिळून घ्यावी. ( ही भाजी पिळून घेण्याची पद्धत आमच्या मावशींची.)
4
कढईत तेल तापलं की त्यात मोहरी, ओवा लसूण घालावा.
5
लसूण लालसर झाला कि कांदा परतून घ्यावा. तो लालसर झाला की हळद, तिखट घालावं . त्यात ती पिळलेली भाजी घालावी . भाजी जरा परतली की त्यात बेसन पेरावं, मीठ घालून ढवळावं. झाकण ठेऊन चांगली वाफ काढावी. की झाली झुणक्यासारखी खमंग भाजी तयार . गरमागरम भाकरीबरोबर ही भाजी मस्त लागते.
6

वाचने
12611
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाजी पिळून का घ्यायची?
कडूपेक्षा उग्र असते.
In reply to भाजी पिळून का घ्यायची? by मुक्त विहारि
वाह ! मेथीची करेन किंवा केल
(No subject)
In reply to वाह ! मेथीची करेन किंवा केल by स्रुजा
(No subject)
In reply to वाह ! मेथीची करेन किंवा केल by स्रुजा
मस्त लागतात पावसाळी भाज्या,पण
मस्तच दिसत आहे भाजी.
१) पाणी पिळून न घेतल्यास**
ओक्के, हे माहिती नव्हतं.
In reply to १) पाणी पिळून न घेतल्यास** by कंजूस
मस्त
वा वा. जांभळी नाक्यास जाणे
मस्तं दिसतेय ! लहानपणी अनेक
शहरीकरणाच्या प्रक्रियेत आपण स्थानिक जैववैविध्याकडे ......
In reply to मस्तं दिसतेय ! लहानपणी अनेक by डॉ सुहास म्हात्रे
पहिल्यांदाच बघितली ही भाजी.
पुण्यातल्या लोकांना पावसाळी
In reply to पहिल्यांदाच बघितली ही भाजी. by त्रिवेणी
अरे वा! पुण्यातले उणे ;)
In reply to पहिल्यांदाच बघितली ही भाजी. by त्रिवेणी
मस्त!
छान पाकृ प्राची.
छान
चला जांभळी नाका !
छान आहे. करून बघायला हवी