नमस्ते मिपाकर,
समोसा हा माझा आवडता पदार्थ, कोणाला नाही आवडत? पण कधी घरी करून बघावा हा विचार मनात नाही आला, आत्तापर्यंत! कॅनडाला स्थलांतरित झाल्यानंतर इथे बऱ्याच पंजाबी मैत्रिणी झाल्या आणि भेटीगाठी सुरु झाल्या. बोलता बोलता कळले की नान, सामोसे, छोले भटोरे, पिझ्झा घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे करावेत. त्याबद्दल टिप्सही मिळाल्या. मग वाट कशाला बघायची? लगेच सुरुवात केली सामोसे बनवायला. फोटोही काढले आणि लिहायलाही घेतले. संपूर्ण प्रक्रिया इथे देत आहे.
वाचकहो, तुम्हीही करून बघा आणि कसे झाले ते नक्की सांगा!
ही पाककृती मिसळपाववर असेलही पण तरीही मी, मी बनवलेल्या सामोसाची कृती देत आहे. सामोसे गरमागरम, तिखट असे छान लागतात. आमच्याकडे एवढे तिखट आणि तळलेले कोणी खात नाही म्हणून कृतीमधले माझे प्रमाण कमी आहे. तुम्ही गरजेनुसार प्रमाण वाढवू शकता.
चला तर सुरुवात करूया!
साहित्य:
१. ३ मध्यम आकाराचे बटाटे
२. १ कप मैदा (अथवा अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचे पीठ घ्यावे)
३. पाव छोटा चमचा – ओवा
४. चवीनुसार मीठ
५. ३ छोटे चमचे तेल
६. लसूण ३-४ पाकळ्या (इथे पाकळ्या मोठ्या असतात, भारतातील कदाचित १०-१२ पाकळ्या घेणे)
७. १ इंच आलं
८. २-४ तिखट झणझणीत मिरच्या
९. १ कप मटार
१०. मूठभर काजू
११. हळद, तिखट, गरम मसाला, जिरे परतून केलेली पूड, आमचूर पावडर, चाट मसाला – आवडीनुसार
कृती:
१. सर्वप्रथम ३ मध्यम आकाराचे बटाटे कुकरमध्ये उकडून घेणे.
२. १ कप मैदा, त्यात ओवा, मीठ आणि तेल घालून हलक्या हाताने एकत्र करून घेतले. हळूहळू पाणी घालत हलक्या हाताने कणिक मळून घेणे व झाकून ठेवणे. कमीतकमी पंधरा मिनिटे झाकून ठेवावी.
३. लसूण, आलं, मिरच्या बारीक चिरून खलबत्यामध्ये कुटून घेणे. (खलबत्यामध्ये कुटून घेतल्यावर मला समाधान मिळते, तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता, आवडीनुसार)
४. एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात लसूण + आलं + मिरच्या हे वाटण परतून घ्यावे. त्यात हिरवी हिरवी मटार आणि नंतर काजू घालून अजून थोडे परतून घ्यावे. त्यात हळद, तिखट, मीठ घालावे. ते मिश्रित करून त्यात उकडून बारीक फोडलेले बटाटे घालावे. सगळे एकजीव करून १-२ मिनिटे परतून घ्यावे. मग थोडा गरम मसाला आणि जिरेपूड घालावी. अजून थोडे परतून घेणे. मिश्रणाला थंड होवू द्यावे. त्यात आमचूर पावडर आणि चाट मसाला घालून एकत्र करावे.
(टीप: थंड मिश्रणात हे एकत्र केले की चव छान लागते.)
(काहींना मनुके, बडीशेप, गाजर घालून केलेले सामोसे पण आवडतात. हीच ती वेळ हे सगळे एकत्र करण्याची.)
५. मैद्याच्या पीठाचे काही गोळे करून पोळीसारखे लाटावे, लहान किंवा मध्यम आकाराचे. त्यानुसार सामोस्याचा आकार ठरणार आहे आणि मला बारीक आवरण हवे आहे म्हणून मी पातळ लाटले आहेत. तुम्ही आवडीनुसार जाडही लाटू शकतात.
६. चपातीला मधोमध काप देवून दोन भाग करणे. एका भागाचा एक सामोसा होणार आहे. काप दिलेल्या बाजूने दोन्ही कडा अर्धे मुडपून त्याला पाणी लावून बंद करावे. म्हणजे तळताना मिश्रण बाहेर येणार नाही. त्रिकोणी वाटीसारखा आकार तयार होईल. त्यात आधी बनवलेले सारण भरणे. आणि खुल्या बाजूला पाणी लावून ती बाजूसुद्धा बंद करणे.
.
७. कढईत तेल गरम करून घेणे. चांगले तापून झाले कि आच कमी मध्यम ठेवावी. या तेलात सगळे सामोसे तळून घेणे, सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत!
(टीप: सामोसे कुरकुरीत होण्यासाठी २ वेळा तळून घेतात. पहिल्यांदा थोडे पांढरे असतानाच काढतात आणि गार झाल्यानंतर परत तळून घेतात. मी एकदाच तळलेले आहेत.)
८. गरमागरम झणझणीत तिखट सामोसे तयार! पुदिना चटणी, चिंचेची चटणी अथवा केचप बरोबर खा!
घराबाहेर सुंदर देखावा बघत आम्ही सामोसे फस्त केले.
सामोसे खाल्यावर माझी मुलगी म्हणते तसे:
यम यम यमी,
इन माय टम टम टमी!
धन्यवाद!

वाचने
13438
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच की! सामोसे दोन वेळेस
धन्यवाद!
In reply to मस्तच की! सामोसे दोन वेळेस by एस
छान आहे पाककृती....
मस्तं पाककृती आणि लेखनही
मस्त
धन्यवाद!
In reply to मस्त by वरुण मोहिते
मस्त बनले आहेत समोसे.
छान पाकृ. घरातून दिसणारे
धन्यवाद!
In reply to छान पाकृ. घरातून दिसणारे by अजया
वा. मस्तच.
लेखकाचे नाव
धन्यवाद!
In reply to लेखकाचे नाव by अमित खोजे
तळण वगैरे करत नसल्याने
धन्यवाद!
In reply to तळण वगैरे करत नसल्याने by पिशी अबोली
टीप आवडली.
मस्त झालेत समोसे
घराच्या फोटोवरुन तरी तुझ्या
In reply to मस्त झालेत समोसे by इडली डोसा
धन्यवाद!
In reply to घराच्या फोटोवरुन तरी तुझ्या by स्रुजा
धन्यवाद!
In reply to मस्त झालेत समोसे by इडली डोसा
इडली समोसा
In reply to मस्त झालेत समोसे by इडली डोसा
_/\_
काय मस्त देखावा आहे घराबाहेर.
त्या घरात बसून ते समोसे खायची
मस्त पाकृ!
खरच मी पण दिवसभर बसून राहीन
In reply to मस्त पाकृ! by रुपी
सामोसे मस्त