www.misalpav.com/node/30970
मिसळपाव ही काय भानगड आहे हे माहित नव्हतं त्यावेळी श्री मोदक ह्यांचा हा लेख वाचला. बाजीराव पेशव्यांची समाधी मध्य प्रदेशात कुठेतरी आहे हे कळाल. लेख खुप छान होता. वडीलही इतिहास प्रेमी असल्याने त्यांनी सुध्दा पुन्हा पुन्हा वाचला. काही दिवसांनी मध्य प्रदेशात इंदौर च्या शंभर की.मी. अंतरावर मुंबई आग्रा महामार्गावरील शाजापुर ह्या ठीकाणी पवनउर्जा कंपणीत नोकरी लागली. (आताही आहे.) कंपणीत सर्व भारतातील मुलं आहेत. पण जीतके मुलं आहेत त्यातल्या मराठी मुलांशी चांगली गट्टी जमली. श्री मोदक ह्यांचा लेख डोक्यात होताच एके दिवशी मी सर्वांना समाधी ला जाण्याचा बेत सांगीतला. पण म.प्र.शात अस काही असेल कोणाच्या गावीही नव्हते. तरी सर्व जण तयार झाले. रस्ता माहित नव्हता पण शोधून घेऊ ( ओवर काँन्फी. ) अशी तयारी करून आेमकारेश्वर व बाजीराव पेशवे समाधी अशी प्लानींग केली. कंपनीचे एक साहेब व्यक्ती मराठीच असल्याने त्यांना बेत सांगीतला.( गाडी चा जूगाड होईल म्हणून) त्यांनी देखील ऊत्साहात तयारी केली. (गाडी मिळाली.) आम्ही एकूण पाच लोक, चालक व बोलेरो सकाळी तयार झाली. सकाळी कुणालाही काही कळू न देता आपापल्या मार्गे रवाणा होऊन शहराबाहेर मिळावे असे ठरले.( पाच मध्ये सहावा वाढून बसायला अडचण होऊ नये म्हणून.).
सकाळी ठरल्याप्रमाणे सर्व जमलो. व गाडी इंदोरच्या दिशेने रवाणा झाली.( रस्ता खराब) मुंबई आग्रा हाईवे हा मुंबई दे देवास पर्यंत चौपदरी आहे. आणि पुढे देवास ते ग्वाल्हेर दूपदरी व पुन्हा ग्वाल्हेर ते आग्रा चौपदरी.( सध्या देवास _ ग्वाल्हेर चौपदरी करण युध्द पातळी वर सुरू आहे) शाजापुर हुन इंदौर 100 km असल तरी रस्ता दूपदरी असल्याने ट्राफीक मुळे 3 तास लागतात.(च)
सकाळी 8 ला आमजी गाडी निघाली. ड्रायवरची स्कील चांगली असल्याने त्याने अडीच तासात इंदौर टच केल.
रस्त्यात देवास लागले. तीथे बस स्ट्यांड समोर टेकडीवर देववासीनी आणी तुळजा भवानी देवीची प्रसिद्ध मंदिरे आहेत. मी गाडीतल्या सर्वांना मंदीरांचा व देवासचे राजे पवार घराण्याचा ईतिहास सांगीतला.(देवास व धार धाकटी पाती मोठी पाती) आम्ही चार मित्रात एक कोल्हापुरातला., एक कराड चा, एक अकोल्याचा व मी धुळ्याचा. असे आम्ही चार व साहेब (बडोद्याचे) आम्ही सर्व नाश्त्या साठी इंदौर बाय पास ला थांबलो......
टीप= कृपया संभाळून घ्यावे. पहिल्यांदा (परिक्षा सोडून) कुठेतरी काही लीहीत आहे.
क्रमश:
वाचने
14827
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुड. अजून लिहा. फोटो टाकायची
धन्यवाद. पुढे लीहीणार आहे.
In reply to गुड. अजून लिहा. फोटो टाकायची by एस
धन्यवाद. पुढे लीहीणार आहे.
लिहित रहा,,,,,
धन्यवाद मुक्त विहाली सर लेख
मला "सर" म्हणू नये, ही विनंती....
In reply to धन्यवाद मुक्त विहाली सर लेख by अमरेंद्र बाहुबली
हो मुवि काका. मार्गदर्शन करत
In reply to मला "सर" म्हणू नये, ही विनंती.... by मुक्त विहारि
मार्गदर्शन करत रहावे.
In reply to हो मुवि काका. मार्गदर्शन करत by अमरेंद्र बाहुबली
मिपाचा
In reply to मार्गदर्शन करत रहावे. by मुक्त विहारि
कोण हा गणपा ??????
In reply to मिपाचा by इरसाल
विहाली
In reply to मला "सर" म्हणू नये, ही विनंती.... by मुक्त विहारि
मी पण मुवी काकाच म्हणते ...
In reply to मला "सर" म्हणू नये, ही विनंती.... by मुक्त विहारि
धन्यवाद मुक्त विहारी सर लेख
धन्यवाद मुक्त विहारी सर लेख
बोलरोचा टाकला असता तरी आवडला
अरे व्वा.. रावेरखेडी..!!!!!
हे पवार नसून पंवार म्हणजे
In reply to अरे व्वा.. रावेरखेडी..!!!!! by मोदक
(No subject)
(No subject)
(No subject)
फोटो काही अपलोड होईना.
विड्थ 680 ठेवा, हाईट रिकामे
विड्थ 680 ठेवा, हाईट रिकामे
जमल एकदाच.
प्रतिक, लेख चांगला होतोय.
फोटो १ मधून embed कोड कॅापी
छान!
मिपावर स्वागत
मिपावर स्वागत