लेखककेडीयांनी शुक्रवार, 30/06/2017 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य
३/४ कप मैदा
१/४ कप व्हॅनिला कस्टर्ड पावडर
१/३ कप अमूल बटर (साधारण १२५ ग्राम)
१/३ कप पिठी साखर
१/२ टीस्पून अननसाचे इसेन्स [पाईनअँपल इमल्शन]
१ टीस्पून बेकिंग पावडर
१/३ कप टुटी-फ्रुटी
२ ते ३ चमचे काजू तुकडे (मी अक्रोड वापरलं)
२ टेबलस्पून दूध
हैदराबाद मधील कराची बेकरी हि त्यांच्या फ्रुट बिस्कीटस साठी प्रसिद्धच. तीच फ्रुट बिस्कीटस आपण आता घरी बनवू शकतो. मी हि बिस्किटे एअर फ्रयर मध्ये केली. ह्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे हि बिस्किटे खालून लागू नयेत म्हणून कमी तापमानाला भाजून घ्यायची आहेत.
कृती
एका भांड्यात अमूल बटर आणि पिठी साखर चांगली फेटून घ्या. त्यात पाईनअँपल इमल्शन घालून ते एकजीव करून घ्या. ह्यात मैदा, कस्टर्ड पावडर आणि बेकिंग पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
ह्यात ट्युटी फ्रुटी, काजू/अक्रोड तुकडे आणि २ चमचे दूध घालून हे मिश्रण मळून घ्या.
मळलेल्या गोळ्याचा लांब चौकोनी ठोकळा करून, क्लिंग रॅप मध्ये घट्ट गुंडाळून, साधारण २ ते ३ तास फ्रिज मध्ये गार करायला ठेऊन द्या.
ओव्हन वापरत असाल तर तो १४० ला प्री-हिट करून घ्या. एयर फ्रायर १३० ते १४० ला ५ मिनिटे प्री-हिट करून घ्या. फ्रिज मधून ठोकळा बाहेर काढून, क्लिंग रॅप मधून सोडवून, धारधार सुरीने साधारण एक इंच जाडीची बिस्किटे कापून घ्या.
एयर फ्रायर च्या बास्केट ला फॉइल लावून त्यावर हि बिस्किटे ठेवून साधारण ३५ ते ४० मिनिटे बेक करून घ्या. बेक करताना बिस्किटे अधून मधून उलटी करून ती खालून लागत नाहीयेत ह्या कडे लक्ष द्या. ओव्हन मध्ये बिस्किटे साधारण ४५ ते ५० मिनिटे बेक करून घ्या. [सगळी बिस्किटे लावण्या आधी, एखादं भाजून बघा, तापमान खूप असेल तर बिस्कीट खालून लागेल, तसे होते असेल तर तापमान कमी करा]
बिस्किटे भाजून झाली कि बाहेर काढून गार करायला ठेवा. गरमागरम चहा/कॉफी सोबत हि छानच लागतात!
मस्तच!
मला खरं तर केव्हापासून हे करुन पाहायचेत. काजू घालता येणार नाहीत म्हणून केले नाहीत, अक्रोड घालून बघेन. यात अननसाऐवजी काहीजण संत्रेही वापरतात फ्लेवरसाठी.
केडी, यानिमित्ताने आणखी एक विनंती.. तुम्ही बर्याचदा सामीष पाकृंबरोबरच त्यातला निरामिष पर्याय एकत्र टाकता. त्यामुळे माझ्यासारखे शाकाहारी लोक धागा उघडत नाहीत. त्या वेगवेगळ्या टाकल्या तर बरे होईल. :)
केडी, यानिमित्ताने आणखी एक विनंती.. तुम्ही बर्याचदा सामीष पाकृंबरोबरच त्यातला निरामिष पर्याय एकत्र टाकता. त्यामुळे शाकाहारी लोक धागा उघडत नाहीत. त्या वेगवेगळ्या टाकल्या तर बरे होईल.
खुप खुप मस्तं पाककृती.
केडी, यानिमित्ताने आणखी एक विनंती.. तुम्ही बर्याचदा सामीष पाकृंबरोबरच त्यातला निरामिष पर्याय एकत्र टाकता. त्यामुळे माझ्यासारखे शाकाहारी लोक धागा उघडत नाहीत. त्या वेगवेगळ्या टाकल्या तर बरे होईल +१ माझं असंच होतं त्यामुळे तुमच्या इतक्या सुरेख पाककृती मिस होतात बरेच वेळा :(
माझं उलटंय. मी केडीचे नाव वाचुन १००% धागा उघडते. फोटोंसाठी. तेव्हा उद्या ह्यांनी कोणत्याही जनावराचे नाव घेऊन धागा काढला तरी मी धागा वाचणारच! ;)
फक्त सध्या हा धागा उघडल्याचा पश्चाताप होतोय, तो जरा निवळु देत...
मावे मध्ये ओव्हन मोड मध्ये १२० ते १३० ला साधारण ४५ ते ५० मिनिटे. (प्रत्येक मावे ची पॉवर वेगळी असते, त्यामुळे तापमान अंदाजानुसार ठेवा, आणि पाकृ मध्ये लिहिल्या प्रमाणे एक ट्रायल बॅच करून बघा).
दरवेळेस या आयडीचा धागा आला की पुढील मेंटल टॉर्चरच्या तयारीनेच उघडला जातो, तरीही छळाचे प्रमाण दरवेळी वाढत असते,
तरी कृपया यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा,
( खूप आवडीची बिस्कीटे आहेत ही, धन्यवाद :)
प्रतिक्रिया
तुमचा प्रॉब्लेम काय आहे नक्की
नुसता अत्याचार
In reply to तुमचा प्रॉब्लेम काय आहे नक्की by वरुण मोहिते
तोंपासू
कहर आहात तुम्ही.
मी फक्त फोटो आणि शेवटची ओळ वाचली....
बाकीचा प्रतिसाद नेहमी प्रमाणे...
In reply to मी फक्त फोटो आणि शेवटची ओळ वाचली.... by मुक्त विहारि
वा मस्त झालीयत
खरंच सुरेख !!!
चव डाउनलोड करता यायला हवी.
आईशप्पत......
आत्ताच जेवण झाल्यानंतरही भूक
धन्यवाद डॉक्टर साहेब!
In reply to आत्ताच जेवण झाल्यानंतरही भूक by डॉ सुहास म्हात्रे
मस्तच!
धन्यवाद!
खुप खुप मस्तं पाककृती.
केडी, यानिमित्ताने आणखी एक विनंती.. तुम्ही बर्याचदा सामीष पाकृंबरोबरच त्यातला निरामिष पर्याय एकत्र टाकता. त्यामुळे माझ्यासारखे शाकाहारी लोक धागा उघडत नाहीत. त्या वेगवेगळ्या टाकल्या तर बरे होईल+१ माझं असंच होतं त्यामुळे तुमच्या इतक्या सुरेख पाककृती मिस होतात बरेच वेळा :(माझं उलटंय. मी केडीचे नाव
In reply to खुप खुप मस्तं पाककृती. by पद्मावति
धन्यवाद!
In reply to माझं उलटंय. मी केडीचे नाव by पिलीयन रायडर
अहाहा!
बिस्किटे वगैरे बेकरी आयटेम
मस्त फोटो !करुन बघण्यात येईल.
मस्त फोटो !करुन बघण्यात येईल.
मस्त फोटो !करुन बघण्यात येईल.
लाळ
मावे मध्ये ओव्हन मोड मध्ये
In reply to लाळ by मनिमौ
संमं, कुणी इकडे लक्ष घालेल काय,
हाहाहा.....
In reply to संमं, कुणी इकडे लक्ष घालेल काय, by नीलमोहर
पुण्याला येताना तुला फोन
आहाहा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasaछळ आहे नुसता... का हो असे
काय त्रास आहे. आजच सकाळी मऊ
मस्त पाकृ
कहर!!
बिस्कीट तर छान आहेतच पण
फोटू
मस्त बनलीत. मैद्याऐवजी
क्या बात है, मस्त! आणि हो,
In reply to मस्त बनलीत. मैद्याऐवजी by प्राची अश्विनी
मस्त,मस्त.करून पाहते नक्की.
व्वा मी कधी खाल्ली नाहीयेत पण