वर्णभेद अजून शिल्लक आहेत ?
धोंडो केशव कर्वेंनी आश्रमात आश्रयास दिलेल्या सवर्ण स्त्रीयांच्या विरोधामुळे धोंडो केशव कर्व्यांना अस्पृश्य स्त्रीस आश्रय देणे शक्य झाले नव्हते, या बद्दल कर्व्यांवर टिका झाली. कर्व्यांच्या पुढच्या पिढीने कर्व्यांच्या चुकीची कबुली लगोलग दिली, पुढच्या पिढीने कर्व्यांच्या चुकीची कबुली आणि दिलगिरी व्यक्त केल्यामुळे कर्व्यांवरची टिका तेवढी ताणली जात नाही. अर्थात हा प्रश्न जातीयवादाचा होता. भारतीय जातीयवादी असलेतरीही वर्णवादी नाहीत असे गृहीत धरुन चालले जाते. गोर्या रंगाचे कौतुक असले आणि सावळा रंगाची थट्टामस्करी बर्याचदा भरकटत असली तरी त्यात युरोमेरीकेन वर्णभेदा प्रमाणे दुराव्या एवजी जिव्हाळ्याची भावना असण्याची शक्यता अधिक असे समजले गेल्याने आपण वर्णभेदाचे अस्तीत्व नाकारत असतो का ?
युरोमेरीकेन हँडशेकने दुरावा कमी होतो असे मानतात पण हँडशेक करुनही मनातला वर्णभेद संपून जिव्हाळा आणि संधींची समानता कितपत निर्माण होते ही साशंकीत बाब आहे. युरोमेरीकनांनी वर्णभेदाबाबत आत्मपरीक्षण करुन बदलण्याचे बरेच प्रयत्न केले आहेत नाही असे नाही. कॅनडासारखा शीखांना विद्वेषाने वागवणार्या देषाने भुतकालीन चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त केलीच पण त्यांना समान संधी देण्याचा बराच प्रयत्न केला आहे. अशी उदाहरणे असली तरीही रोममध्ये काळा पोप निवडला जाणे अद्याप बाकी आहे. किंवा अगदी ताजी बातमी पहावयाची झाल्यास इंग्लडातील एका पंजाबी कपलला अनाथालयाने गोरीमुले दत्तक देण्यास नकार दिल्याची आहे.
अर्थात भारतीय वर्णवादी नाहीत यात पूर्ण तथ्य आहे का ? त्या पंजाबी कपलने गोर्या एवजी आफ्रीकन बाळ दत्तक म्हणून कितपत मोकळेपणाने स्विकारले असते हे ऑफर करुन पाहिल्या शिवाय सांगणे कठीण आहे. अगदी आफ्रीकन लोकही भारतीयांना वर्णवादी वागणून देतात नाही असे नाही. भारतीय वंशाच्या सावळ्या (काळ्या) व्यक्तीलाही गोरा किंवा पिवळा म्हणून लूटणे ह्यातही छुपा वर्णवाद असू शकतो आफ्रीकेपेक्षा अधिक भारतीय लोकसंख्या काळ्या वर्णाची असू शकते हे आफ्रीकनांच्या गावीही नसते. पण आपले भारतीयही कमी नाहीत स्वतःचा रंग कसाही असो सावळा किंवा काळा असला तरीही आफ्रीकेत त्यांच्या देशात राहून त्यांना त्यांच्या रंगावरुन हिणवणारे भारतीय पाहीले की नवल वाटते. म्हणजे आपण आफ्रीकन देशांच्या राजकीय स्वातंत्र्याची अधिक बूज राखली तरी वागण्यातला फरक आफ्रीकनांच्या नजरेतून सुटत नाही. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रीकेत केलेले पहीले आंदोलन भारतीयांना स्थानिक पोस्ट ऑफीसात स्थानिकांसोबत प्रवेश करावा लागू नये म्हणून युरोपीयनांप्रमाणे स्वतंत्र दरवाजाच्या मागणीसाठी होते, ह्या बाबत गांधींच्या पुढच्या पिढ्यांनी अथवा अनुयायांनी प्रांजळ दिलगिरी अद्यापतरी व्यक्त केली असावी असे वाटत नाही.
वरचा परिच्छेद युरोमेरीकेत वर्णभेद नाहीच म्हणणार्यांसाठी लिहीला. अर्थात एका चुकीने दुसर्या चुकीचे समर्थन होत नाही. दुसर्या बाजूला दिल्ली रेसकोर्साची परवाची बातमी आहे. पाम थिमय्या नावाच्या क्लब मेंबर ने आसामच्या ? बिझनेस वूमनला जेवणाचे आमंत्रण दिले होते. बिझनेसवूमन सोबत तिच्या मुलाच्या गव्हर्नेस (घरगुती शिक्षीका) जेवणास सोबत (आमंत्रीतच) होती. तिच्या दिसण्या आणि पेहरावरुन क्लबच्या मॅनेजरने ऐन जेवण चालू असताना जेवणाचा टेबल सोडून जाण्यास सांगितले आणि तिचा अपमानही केला-अपमान करताना त्या मॅनेजरला ती नेपाळी वाटली म्हणे आणि प्रत्यक्षात मेघालयची होती - जे झाले त्याने नेपाळी लोकही दुखावणार ईशान्य भारतीयही दुखावणार आणि भारतातला घरकामगार वर्ग आणि भारतीय घरकामगारांना चांगली वागणून दिली जात नाही हा जागतीक गवगवाही होणार. क्लबने मॅनेजरच्या एटीकेट्स बाबतच्या चुकीबाबत माफ मागितली पण क्लबमेंबरच्या स्टाफला क्लब मध्ये जॉईन होता येत नाही असा नियम असल्याचे सांगून त्याबाबत मेंबर चुक असल्याचे अप्रत्यक्ष सुचीत केले. एखाद्या क्लबमेंबरने आपल्या स्टाफला अथवा गेस्टच्या स्टाफला जेवणास सोबत घेऊन बसावे की नाही हा त्या क्लबमेंबरचा व्यक्तिगत प्रश्न असावयास नको का ? पण एकदा सरंजामशाहीची सवय झालेली असेल तर आपले नियम मुदलातच चुक आहेते हे समजवावे हा मोठा प्रश्न असतो. आणि हे सारे सरंजामशाही नियम असलेला उमरावांनाच उपलब्ध असलेला हा दिल्ली गोल्फ क्लब मायबाप भारत सरकारच्या आर्थीक मेहरबानीवर चालतो. उजव्या म्हणवल्या जाणार्या मोदी सरकारने लाल दिवेवाली सरंजामशाही बंद केली. लाल दिव्यांना सुरक्षेसारखा काहीतरी तर्क होता. पण स्वतःस समतावादी म्हणवणार्या नेहरुते आतापर्यंत समतावादाची दुहाई देत पोसली गेलेल्या दिल्ली गोल्फातील उमरावांच्या अधिकच्या समतावादाला मोदी सरकार लगाम लावणार का हे येणारा काळ सांगेल.
एनी वे चर्चेस प्रश्न हवा तो तसा शीर्षकात आहे त्या सोबत वर्णभेद दाखवणार्यां भारतीयांना आणि संस्थांना जबर आर्थीक दंडाची तरतूद असण्याची गरज आहे का ? यावर मिपाकरांचे मत काय ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मुद्दा खूपच रास्त आहे, आपण
भारतीयांची वर्णभेदाबाबतची
"अगदी ताजी बातमी पहावयाची
मी बातमी जशी वाचली, पंजाबी
जगभराची रीत
पंजाबी जोडपे भारतातूनही मूल
हा हा Lol काय विनोद आहे
तार्कीक उणीवेचेच
रंगभेद न करणारी संस्कृती
ॲंडजेलिना जोली बाई
वर्णभेद, धर्मभेद, जातीभेद आणि
खरे आहे. स्वतःचा अहंभाव
भारतीय वर्णभेद
गापै, भेदभाव करण्यास मनाई
समवर्णी
समवर्णी हिंसाचार, खाजगी प्रवेश, इत्यादि
गापै
अमेरिकी काळे, दिगोक्ल, इत्यादि
भारतीय घटनेचे कलम 51A ई :
आडगुलं-मडगुलं या मराठी
इंग्लंडमधे गोर्या कुटुंबाला
इंग्लडाची सध्याची स्थिती इतर
http://www.goodreads.com/book
घटनाकलम १७
जात नाही ती "जात."
काळया रन्गाचा न्युनगन्ड
'सैराट'चा संदेश
मी सावळी आणि भाउ गोरा .
मायबोलीवर सापडलेली एक कविता
वर्णच काय कुठल्याही