मनोगत

अमरेंद्र बाहुबली जनातलं, मनातलं
नमस्कार मिसळपाव. मिसळपाव चा आभारी आहे. मला सदस्य बनवल्या बद्दल. मी आंतरजालावर नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयाची माहीती वाचत असतो. एखादा शब्द शोधला आणि त्याची माहीती मिपावर मिळाली नाही.अस कधीच झाल नाही. सर्व सदस्य अतिशय माहीतगार त्यांच्या प्रतिक्रियांमुळे खूप माहीती मिळाली. सर्वांचा खूप आभारी आहे. प्रतिक जडे. धुळे.
वर्गीकरण
लेखनप्रकार

34 टिप्पण्या 7,236 दृश्ये

Comments

श्रीरंग_जोशी नवीन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते यांची प्रतिक्रिया दीर्घ कालावधीनंतर पाहून मी पण दचकलो :-) . म्हणजे सुखद धक्का बसला.

मुक्त विहारि नवीन

पण, नुसतेच वाचनमात्र आहात की, एखाद्या आवडलेल्या धाग्यावर प्रतिसाद पण देता?

मुक्त विहारि नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मग ठीक आहे. नुसतेच वाचनमात्र मिपाकर हे खरे मिपाकर नसतात, असे माझे मत. (आम्ही आमची मते कुठल्याही धाग्यावर टाकतो. मग तो विषय चंद्रावरच्या पाण्यातील साखरेचे प्रमाण का घटत आहे? किंवा मंगळावरच्या जांभळ्या मुंग्यांचे ७वे युद्ध १२व्या युद्धाला का कारणीभूत झाले? ह्यावर पण मत देवू शकतो.)

दशानन नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुरवातीला नका करु, कात्रजचा घाट होईल तुमचा ;) बाकी, जिलेबी ना देता नवे काही देता आले तर आवडेल, व आवर्जून दाद पण देऊ. पण जुन्या बाटलीत नवी दारू किंवा त्याच कपात नवा 'चा' आम्हाला पचत नाही.. सो, बॉल इन युअर कोर्ट!

चौथा कोनाडा नवीन

मिपावर स-हर्ष स्वागत ! मी आंतरजालावर नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयाची माहीती वाचत असतो. एखादा शब्द शोधला आणि त्याची माहीती मिपावर मिळाली नाही.अस कधीच झाल नाही. सर्व सदस्य अतिशय माहीतगार त्यांच्या प्रतिक्रियांमुळे खूप माहीती मिळाली. सर्वांचा खूप आभारी आहे>> लै भारी वाटल, राव ! आपण स्वतः देखील अतिशय माहितगार क्याट्यागिरीतले वाटून छाती पावणे छप्पन्न इंचाची होवुन भरून आली ! (चुकचुकली, शंकेची पाल चुकचुकलीच : ड्युआडी तर न्हाय हा नस?बंदी घालाया लागल मंग :-)

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नवीन सदस्य साहेब, कृपया मला सर वगैरे म्हणू नका. मिपा हे अनौपचारिक संस्थळ आहे व येथे केवळ आयडी वापरून संबोधले तरी पुरेसे असते. मिपावर चित्रे टाकण्याची कृती येथे मिळेल.

अभ्या.. नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

उद्या रात्री रिझर्व्ह बंकेवर दरोडा हाय बरका आपला. हत्यार, पोते, बुरखा, दंबुक घेऊन रात्री 2 ला पुलाखाली जमायचेय. आले का ध्यानात? . टोळी म्हणतंय तिच्यामारी. =))