रामराम मि.पा.कर मंडळी,
दररोज आंतरजाळावर वावरतांना आताशा त्याच त्याच संकेतस्थळांना भेटी देण्याचे माझे प्रमाण वाढलेले आहे.
(अभिमानाने सांगतो की "त्याच त्याच" संकेतस्थळांत मि.पा. व माझ्या इतर व्यावसाईक संकेतस्थळांचा (अभ्यासासाठी लागणार्या) समावेश नाही).
तरी पण साधारण सतत "त्याच त्याच" संकेतस्थळांना भेटी देवून माहीती/ ज्ञानात साधारण एकसूरीपणा येतो आहे असे जाणवते आहे. काहीतरी नवीन, बुद्धीला चालना देणारे पाहीजे असे वाटू लागले आहे.
ह्यावर उपाय म्हणजे आपल्यासारखे ज्ञानी लोक.
आपल्याला माहीत असणार्या काही महत्वाच्या संकेतस्थळांची माहीती आणि त्यांचे धागे या ठिकाणी द्यावेत हि नम्र विनंती.
यात आपणाला आवडणार्या व सर्व लेखनविषय व लेखनप्रकारच्या श्रेणीतील संकेतस्थळांचा समावेश असु द्या. आपल्या मि.पा. वर सर्व तर्हेचे, लहान मोठे, सान-थोर, ज्ञानी-(माझ्यासारखे अज्ञानी), स्त्री-पुरूष आहेत. म्हणून सर्व समावेशक संकेतस्थळे आलीत तर बरे. (अश्लील, राजकीय, व्यावसाइक, धार्मीक वाद, निव्वळ वाद होतील असे संकेतस्थळे नकोत. यात सर्व तर्हेच्या लोकांच्या आवडीनिवडी ध्यानात घेवुन लिहीले आहे.)
मला माहीत असलेले काही चांगली संकेतस्थळे:- (अद्ययावत करत राहील)
--------------------------------------------------------------------------------------------------
http://www.copernic.com/ : माहिती शोधकाचे शोधक
http://boingboing.net/ : चांगली अनुदिनी
http://www.yolinux.com/TUTORIALS/ : लिनक्स बद्दल माहिती
http://www.medindia.net/ : आरोग्यविषयक माहिती (आजार, रोग, औषधे आदी.)
http://ceo.maharashtra.gov.in/ : महाराष्ट्राची अद्ययावत मतदार यादी (यात "Online Search Electoral Roll " या दुव्यावर टिचकी मारा व आपले नाव शोधा.)
http://www.webhealthcentre.com/ : आरोग्यविषयक माहिती (आजार, रोग, औषधे आदी.)
http://www.tnhealth.org/chat.htm : तामीळनाडू शासनाची आरोग्यविषयक चर्चा सं.स्थळ. (माहिती साठी आपले-परके करणे सोडून द्यावे.) यात आपण आपल्या आरोग्यविषयक शंका थेट डॉक्टरांना विचारू शकतात.
http://www.tpub.com/content/construction/index.htm : सिव्हील ईंजिनीयरींग / प्र्याक्टिकल माहीती.
वाचने
10717
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम कल्पना.
ह्म्म
In reply to उत्तम कल्पना. by कलंत्री
सर्व समावेशक संकेतस्थळे ...
In reply to उत्तम कल्पना. by कलंत्री
महाराष्ट्राची अद्ययावत मतदार यादी :-)
परत परत..
In reply to महाराष्ट्राची अद्ययावत मतदार यादी :-) by विकास
मराठी मासिके
शास्त्रीय संगीत
सध्या तरी
स्पोटिफाय वर बिग फॅट इंडियन घोटाला