सामाजिक उपक्रम - २०१७
नमस्कार,
मित्रपरिवाराच्या साथीने गेली ७ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आलेलो आहोत. समाजासाठी कार्य करणार्या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो.
उपक्रमाविषयी थोडेसे:
माझ्यासह सुमारे ७-८ स्वयंसेवक दरवर्षी एक सामाजिक उपक्रम चालवितात. महाराष्ट्रातील ज्या सामाजिक संस्थांना सरकारकडून कमी मदत मिळते(अथवा मिळतच नाही) किंवा ज्या संस्था मुख्यत्वे देणगीदारांवरच चालतात अशा गरजू संस्थांना मदत मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे. यावर्षी या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे. देणग्या मार्च-एप्रिल या महिन्यांमध्ये मागविण्यात येतात. देणग्या त्या त्या संस्थांच्या खात्यात जमा करावयाच्या असतात व संस्थेने त्यातून खरेदी केलेल्या वस्तूंची पावती व फोटो देणे त्यांना बंधनकारक असते. त्याची रीतसर नोंद इथे दिली जाते. थोडक्यात सांगायचं तर हा उपक्रम गरजु संस्था व देणगीदार ह्यांच्यातले एक माध्यम आहे. आम्ही स्वयंसेवक कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करीत नाही. या उपक्रमाचे धागे आम्ही मायबोलीवर यापूर्वी तयार केलेले होते. यावर्षापासून असाच धागा मिपावरही सुरू करायची आमची इच्छा होती.
आतापर्यंत खालील संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे वस्तुरुपी मदत केली गेली आहे - -
१. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग २. शबरी सेवा समिती, ता. कर्जत ३. सुमति बालवन, पुणे ४. अनामप्रेम, अहमदनगर ५. माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला - सोलापूर, ६. दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळी, यवतमाळ ७. परिवर्तन संस्था, डोंबिवली 8. सावली सेवा ट्रस्ट, पुणे इत्यादि...
यावर्षी निवडलेल्या संस्थांना गरज असलेल्या गोष्टींची यादी मागवण्यात आली होती.
देणग्या खालील पद्धतीने स्वीकारल्या जातील,
१) ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी स्वयंसेवकांपैकी कोणालाही संपर्क करुन तुम्ही किती देणगी देणार आहात इतकेच कळवावे. यासाठी ३१ मार्च ही मुदत ठेवत आहोत.
२) एप्रिलपासून, किती देणगी मिळत आहे ते पाहून सर्व संस्थांना साधारण समान निधीवाटप करण्यात येईल. त्याचवेळेस त्या निधीतून त्या संस्थेसाठी दिलेल्या यादीतून काय सामान घेता येईल, ते कोठून घेता येईल वगैरे ठरवले जाईल.
३) देणगीदारांचे गट करुन कोणी कोणत्या संस्थेला देणगी पाठवायची, संस्थेच्या अकाउंटची माहिती इत्यादी कळवण्यात येईल. त्यानंतर तुम्ही संस्थेच्या खात्यावर रक्कम जमा करु शकता. संस्थेच्या अधिकृत टॅक्स खात्याची माहिती इथेही लिहिण्यात येईल.
४) देणगीदारांनी देणगी पाठवल्यावर स्वयंसेवकांपैकी कोणालाही त्याबद्दल कळवणे महत्वाचे आहे. त्याप्रमाणे संस्थेला कळवले जाईल.
५) सर्व देणगीदारांनी देणग्या पाठवल्याचे आम्हाला कळवले की प्रत्येक संस्थेकडून खातरजमा केली जाईल.
६) सर्व जुळले की मग वस्तू विकत घेण्यासाठी पाऊल उचलले जाईल.
७) वस्तू खरेदी झाली व संस्थेला पोचली की इथे सांगितले जाईल.
ही पद्धत गुंतागुंतीची वाटेल पण देणगीदारांनी योग्य त्या संस्थेला फक्त योग्यवेळी देणगी पाठवायची आहे. बाकी काम उपक्रमाचे स्वयंसेवक करतील.
काही संस्था अभारतीय चलन पण स्वीकारतात. ज्यांना वेगळ्या चलनामधे देणगी द्यायची आहे त्यांनी संपर्क किंवा विपुद्वारे स्वयंसेवकांशी संपर्क साधावा. जे मिसळपावचे सभासद नाहीत परंतु मदत करण्यासाठी उत्सुक आहेत ते सुनिधीशी lataismusic@yahoo.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात.
स्वयंसेवकः
अतरंगी, अरुंधती, निशदे
, सुनिधी, कविन, महेंद्र ढवाण, प्राची
या वर्षीच्या संस्था:
या वर्षीच्या उपक्रमाद्वारे मदत केल्या जाणार्या संस्था खालीलप्रमाणे आहेत.
(सर्व संस्थांची माहिती पहिल्या काही प्रतिसादांमध्ये टाकली आहे)
१. सहारा अनाथालय, गेवराई, बीड
२. सुहीत जीवन ट्रस्ट, पेण
३. अनुराधा किल्लेदार प्रशाला, सांगली
४. घरकूल परिवार
५. माउली सेवा प्रतिष्ठान
मागील काही वर्षी केल्या गेलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल खाली वाचता येईल - -
सामाजिक उपक्रम २०१६
सामाजिक उपक्रम २०१५
सामाजिक उपक्रम २०१४
सामाजिक उपक्रम २०१३
सामाजिक उपक्रम २०१२
सामाजिक उपक्रम २०११
सामाजिक उपक्रम २०१०
मागील काही वर्षातल्या कामाचा आढावा खाली वाचता येईल
सामाजिक उपक्रम २०१६- आढावा
सामाजिक उपक्रम २०१५- आढावा
सामाजिक उपक्रम २०१४- आढावा
उपक्रमाबाबत कसलेही प्रश्न असल्यास प्रतिसादात अथवा स्वयंसेवकांना व्य.नि. करावा.
*मिपा व्यवस्थापनाचा सदर उपक्रमाशी कसलाही संबंध नाही.*
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सहारा अनाथालय परिवार
सुहित जीवन ट्रस्ट
वेबसाईट दुरुस्ती
अनुराधा किल्लेदार नवजीवन प्रशाला
संस्थेकडून फक्त गरजांची यादी
घरकुल परिवार
संस्थेकडून फक्त गरजांची यादी
माऊली सेवा प्रतिष्ठान
अतिशय स्तुत्य उपक्रम. नक्कीच
धन्यवाद एस.
निखील आता मी ही आलेय इथे.
उत्तम सुरुवात
छान
सुरवात
सहारा अनाथालयला काळे ट्रस्टकडून भरघोस मदत!
इतर संस्थांनाही देणग्या
ग्रेट! खूपच छान!
वा! अभिनंदन!
धन्यवाद!