कलोनियल गोवा
नुकतेच एका कौटुंबिक समारंभाकरीता कारवार येथे जायचे होते . समारंभ सकाळचा. म्हणजे, अगदी पहिले विमान पकडून गोव्यात गेलो असतो तरीही कारवारला पोहोचेपर्यंत प्रचंड दगदग आणि धावपळ होणारच होती. म्हणून मडगावला मुक्काम करून दुसर्या दिवशी कारवार गाठावे असा बेत केला. हाताशी तसा वेळ फार नव्हता आणि यंदा समुद्रकिनार्यावर जायचे नाही असे ठरवेलेलेच होते. तेव्हा मडगावच्या जवळपासच थोडे फिरावे असा विचार केला.
मडगावजवळच चांदोर नावाचे एक टुमदार गाव आहे. तेथे ३-४ शतके जुनी अशी बरीच पोर्तुगिझकालीन घरे आहेत. तेव्हा भटकंती तिथेच करावी असे ठरवले.
पहिले घर पाहिले, ते होते मेनेझिस ब्रागान्झा हाऊस. सत्तरीकडे झुकलेल्या एका आजीबाईने दरवाजा उघडला आणि स्वागत केले. घर सतराव्या शतकातील. उत्तम फ्लोअरींग, इटालियन झुंबरे, बेल्जियन आरसे, चीन-मकावहून आणलेली पॉटरी, साधारणपणे ८० माणसे बसू शकतील असा मोठा डायनिंग हॉल, चांदीची कटलरी आणि ते ठेवण्यासाठी असलेले सुबक लाकडी कपाट, पाच हजार पुस्तके असलेली खासगी लायब्ररी. जागोजागी लावलेली फॅमिली पोर्ट्रेट्स, खोल्यांमागून खोल्या जातच होत्या. आणि घराच्या अगदी मागच्या बाजूला, छोट्याश्या जागेत, आजीबाई आणि तिचे कुटुंब राहत होते!
(ब्रागान्झा हाऊस)
दुसरे घारदेखिल चांदोरमधीलच सारा फर्नांडीस यांचे . पहिल्याचा मानाने जरा लहान पण तरीही भव्यच! ही म्हातारीही सत्तरीकडे झुकलेली पण सोबतीला तरुण सून! येथेही तोच प्रकार. भल्या थोरल्या खोल्या, मार्बल फ्लोअरींग, जुने लाकडी फर्निचर, युरोपातून वगैरे आणलेल्या इतर वस्तू इत्यादी इत्यादी. मात्र घरची मंडळीही इथेच राहात होती. आणि स्वतःच्या राहत्या घरातूनच ते पर्यटकांना फिरवीत होते!
खरे तर ही फर्नान्डीस मंडळी पारंपरीक ख्रिस्ती गोमंतकीय खानादेखिल खिलवतात. पण त्यासाठी किमान एक दिवस आधी सुचना द्यावी लागते. ती दिली नव्हती म्हणून तो योग (इथे तरी) हुकला.
चांदोराहून निघालो तो जवळच असलेल्या लोटली (Loutolim) गावाकडे. इथे पाहिले अरौजो अल्वारिस यांचे घर. बराचसा मामला पहिल्या दोन घरांसारखाच. एक खास बाब म्हणजे "दिपाजी राणेंच्या गुंडांपासून" (sic), रोख आणि दागिन्यांचे संरक्षण करण्यासाठी बनवलेला मजबूत लोखंडी दरवाजा!
(अल्वारीस हाऊस)
लोटली गावातच एक छोटेखानी म्युझियम आहे. मुख्य आकर्षण आहे ते संत मीराबाई यांचे १४ मीटर लांब शिल्प. आणि शिल्पकार आहे अल्वारीस नावाचा एक स्थानिक लोटलीकर!
(मीराबाईचे शिल्प)
आता ह्या तीनही घरांचा लसावि काढला असता काय दिसते?
एखाद्या घराण्यात एक -दोन कर्तुत्ववान व्यक्ती निपजतात. त्या एक मोठे साम्राज्य उभे करतात. पुढील पिढ्या मात्र सामान्य वकुबाच्या निघतात. आहे त्या ऐश्वर्यात भर टाकणे त्यांच्या कुवती बाहेरचे असते. पण ही मंडळी ते फूकून टाकत नाहीत. काही उरले आहे ते जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मग त्यासाठी आपली राहते घर आणि मालमत्ता प्रदर्शानात का मांडावी लागेना!
हे सगळे पाहता पाहता अडीच वाजून गेले होते. कळवळून भूक लागली होती. आता पोट पूजा करणे क्रमप्राप्त होते.
असे म्हणतात, जर स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला नाहीत तर तुमची भटकंती अपूर्ण राहते!
साष्टी (Salcete) भाग हा बव्हंशी ख्रिस्तीबहुल. गोमंतकीय हिंदू खाद्य-संस्कृतीशी चांगलीच "तोंड"ओळख असली तरी, किरिस्तावी पद्धतीची माझी मजल विंदालू आणि सोर्पोतेलच्या पलीकडे गेली नव्हती. सारा फर्नांडीस यांच्याकडील संधी हुकली होती परंतु चौकशीअंती, चिंचोणे (Chinchinim) गावानजीक असलेल्या असोळणे गावात Seman's Nest नामक एक खानावळ ऑथेन्टिक ख्रिस्ती गोमंतकीय खाद्यपदार्थ देते, असे कळले आणि तिकडेच मोर्चा वळवला.
ठाण्याच्या मामलेदारची आठवण यावी असे कळकट्ट बाह्यरूप! दुपारचे सव्वा-तीन वाजून गेले असल्यामुळे, आता जेवण मिळणार नाही, असे सांगितले गेले. तेव्हा खास तुमचे नाव ऐकून मडगाहून आलो असे सांगून, पहिली ऑर्डर हीच शेवटची ऑर्डर, अशी मांडवली करून आत गेलो.
मत्स्याहारी खाणावळीत मेन्यू कार्ड बाजूला ठेऊन वेटरचा सल्ला घेणे इष्ट, कारण आजचा "फ्रेश कॅच" कोणता हे त्यालाच ठाऊक असते! तसे त्यालाच विचारले. त्याने मोडशो (Lemon fish) आणि चोणक (Giant sea perch) ची शिफारीश केली. ही नावे तशी कधीतरी कानावरून गेली होती तरी ते मासे प्रत्यक्ष कसे लागतात, हे काही ठाऊक नव्हते. अखेर, मोडशो आणि चोणक फ्राय, कलामारी (Squid) चे कालवण आणि भात, अशी पहिली आणि शेवटची ऑर्डर दिली.
तोवर किंचित पावसला सुरुवात झाली होती. आभाळ भरून आले होते. शेजारूनच साळ नदी संथपणे वाहात होती आणि समोर थाळी आली!
मोडशो आणि चोणकचा एक-एक तुकडा चाखला आणि मला मत्स्याहारातले फार कळते, हा अहंकार साळ नदीत बुडून गेला! निव्वळ अप्रतिम चव. कलामारीचे कालवण आणि भात हे काही मी पहिल्यांदा खात नव्हतो, पण ही चवदेखिल वेगळी आणि छानच होती.
खरा धक्का बसला तो बिल आल्यावर! ठाण्या-मुंबईतील कुठल्याही ठिकाणी किमान तिप्पटतरी बिल आले असते!
भरघोस टिप आणि दिलखुलास दाद देऊन बाहेर आलो.
संपादन - २४ ऑगस्ट २०२३
फोटोंची लिन्क -
https://drive.google.com/drive/folders/1eLRvaVfNrBgaN5hU8xIVprBWeOJRYoYk?usp=sharing

व्वा!
In reply to व्वा! by प्रदीप
किरिस्तावांची घरे
In reply to व्वा! by प्रदीप
नाही. चुकीचे नाही.
मासे आणि ताटाचा फोटो द्या..!
In reply to मासे आणि ताटाचा फोटो द्या..! by मोदक
+ १, माशांची खानावळ नोंदवली
In reply to + १, माशांची खानावळ नोंदवली by स्रुजा
गोवा कधी ही निराश करत नाही.
In reply to + १, माशांची खानावळ नोंदवली by स्रुजा
सहमत
In reply to मासे आणि ताटाचा फोटो द्या..! by मोदक
फोटो
वा! काय नशीबवान आहात आमच्या
मस्त...
मस्त...
मस्तं धागा !
In reply to मस्तं धागा ! by डॉ सुहास म्हात्रे
+ १

+१
मस्त वर्णन
मस्त!
वा!!
सुनील दा, हांव सध्या
In reply to सुनील दा, हांव सध्या by प्रीत-मोहर
च् च् च्
जायला हवे एकदा
लोटुलीत जाऊनही जिला बेकरीत न
In reply to लोटुलीत जाऊनही जिला बेकरीत न by गवि
जिला बेकरी
मस्तच!
आवंयस! भयंकर सुंदर बरयंला!
मस्तच वर्णन....
मस्त लिहिलंय
मस्तच !!
फार फार आवडला लेख..
मेनेझिस ब्रागान्झा हाऊस
वाह मस्त आवडला हा वेगळा गोवा
:-)
आवडले
आज हा लेख वाचला. फोटो दिसत नाहीत पुन्हा देता येतील का ?
In reply to आज हा लेख वाचला. फोटो दिसत नाहीत पुन्हा देता येतील का ? by चित्रगुप्त
फोटो