✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(एक भुताचा अनुभव)

अ
अभ्या.. यांनी
Fri, 06/09/2017 - 17:11  ·  लेख
लेख
पेर्णा : बृहन्माहाराष्ट्राची संत्रा आणि नुकताच वाचलेला अनुभव नोंद : लेखा चा उद्देश अंधश्रद्धा आणि नशेबाजीला खतपाणी घालणे नाहि. तेव्हा मी ट्रान्सपोर्ट मध्ये काम करत होतो तेव्हाची हि माझी गोष्ट आहे. नाईटड्युटीचे लवकर काम आटपून घरी जाण्यासाठी मी माझे मोबाईलातले गजराचे घड्याळ एक तासाने पुढं करून ठेवत असे, जेणे करून ५ वाजता गजर वाजला तर मी ४ वाजताच गजाभावला सांगून पाण्याची बाटली घेऊन फ्रेश होऊन मग ५ वाजत घराकडं जाईल असा होता. सकाळी लवकर ४ पर्यंत ट्रीप आटपणे खूप जिकरीचे आणि अवघड वाटे म्हणून हि खटाटोप केली होती. असो, त्या दिवशी पण मी नेहमी प्रमाणे ५ वाजताचा गजर वाजताच अ‍ॅलर्ट झालो, पण आदल्या रात्री गजाभावने राह्यलेली संत्रा मला दिल्याने चकणा खात खात खूप खमंग भुतांच्या गप्पा मारल्या होत्या. तसेच त्या दिवशी अमावस्या आहे हे पण गप्पातून कळले होते. या विचारात असतानाच मी हे विसरून गेलो कि माझे मोबाईलातले घड्याळ मी एक तासाने पुढे करून ठेवले आहे आणि ५ वाजले म्हणून तसाच माझी बाटली घेऊन रिकामा व्हायला झाडीकडे निघालो. 4 वाजताचा अंधार रोजच्या पेक्षा जास्त वाटत होता, कारण माझा समज मी ५ वाजता बाहेर आलो होतो असा होता. मनात आज अमावस्या आहे आणि रात्रीच्या भुतांची गप्पाची आठवण होती आणि त्या मुळे मनात आधीच भीती होती. आणि ढाब्या मागचा रस्ता संपून शेत येताच माझे पाय एका नारळावर पडले, नीट बघितले तर कोणी तरी झाडीत कुंकवाचे गोल करून त्यात नारळ लिंबू ठेवले होते. तिथेच मनात एकदम भीती वाटली . पण टेम्पोच्या किन्नरने कशाला भ्यायचे असा विचार केला आणि तसाच पुढे निघालो , आज रस्त्यावर ट्राफिक पण खूपच कमी दिसत होती. एक मन म्हणत होते ढाब्यावर वापस जाऊन मस्त ताणून झोपावे , पण तसेच चालत राहिलो आणि सगळं आटपून रस्त्याच्या कडेला आलो . ढाब्यावर गजाभाव टेम्पोचं थोबाड उचकाटून कायतरी काड्या करत होता. रात्री बॅटरी उतरली की आमचा टेम्पो स्टार्टींगला उचलत नाही. मग रिकामी बाटली केबिनात टाकली अन दोघं मिळून मागून ढकलायला सुरुवात केली. उतारी लागली की गजाभाव पळत केबिनात ढांग टाकतंय अन स्टार्टर उचलतंय हे सवयीचं होतं. तेव्हड्यात रस्त्यावर समोर एक विरुध्द दिशेने एक नुसतीच सायकल येताना दिसली, आणि जसे जसे पुढे जाईल तसे सायकल विरुद्ध दिशेने हळू हळू पुढे येत आहे असे वाटले. सायकलच्या पायट्याचा सुध्दा आवाज तर येत नव्हता, म्हणून वाटले मला भास होत असेल . पण नीट निरखून बघितले तर लक्षात आले, कि सायकल खरंच हळू हळू पुढे येत होती. मला वाटले सायकलवाला पण आप्ल्यासारखंच रात्री संत्रा मारुन सायकल मागून ढकलत असेल. पण जवळ जाऊन समोरून सायकलला टेम्पोमागूनच बघितले तर सायकलवर कुणीच दिसले नाही आणि सायकल तर पुढे येत होती मग मात्र माझे टेम्पोला धक्का मारणारे हात एकदम थंड पडले, आणि मनात एकदम भीती वाटून आली, कि आज अमावास्याचे भुताटकी होईल आपल्याला . रात्री भुतांच्या गप्पा मधले हर एक किस्सा आठवून मन अजूनच घाबरले, सगळीकडे अंधार होता. सायकलवरले भूत आता आपल्याला दिसून आपले काही खरे नाही असे वाटू लागले. नुसती सायकल विना चालक कसा काय पुढे जात आहे हे कळेना, मन एकदम सुन्न झाले, आमवासची पहाट त्यात रस्त्या वर कुणी चिट पाखरू नाही, धड-धड एकदम वाढली . सायकल विना चालक पुढे येत होती, तरी पण मी टेम्पोला धक्का मारतच राह्यलो , आणि जशी सायकल क्रॉस केली तेव्हा सायकलवरचा एक काळाभोर इसम विना कपड्याचा थरथरत सायकल दामटत असलेला दिसला, तेव्हा लक्षात आले कि सायकल विना चालक कसा पुढे चालली होती आणि एकदम सुटकेचा श्वास टाकला आणि पुढे गेलो. आलेला अनुभव आठवूं स्वतःचेच हसू आले. . . - नाठाळ पाटील
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6963 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

आमच्या लिहलेल्या लेखावर (एक भुताचा अनुभव) लगेच प्रति लेख आवडला

खट्याळ पाटिल
Fri, 06/09/2017 - 17:22 नवीन
आमच्या लिहलेल्या लेखावर (एक भुताचा अनुभव) लगेच प्रति लेख आवडला . हा लेख म्हणजे माझ्या http://misalpav.com/node/39974 या लेखाची हि दुसरी बाजू आहे , खूप छान
  • Log in or register to post comments

हे पण मस्त...

मुक्त विहारि
Fri, 06/09/2017 - 17:31 नवीन
हे पण मस्त
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/09/2017 - 17:44 नवीन
टेंपो मालकाच्या नजरेतून दिसलेले भूत आवडले. चालू ठेवा कथा.... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मालक नै हो, किन्नर.

सतिश गावडे
Fri, 06/09/2017 - 22:17 नवीन
मालक नै हो, किन्नर. नक्की वाचले ना? की अभ्याचे विडंबन म्हणून थोडासा अंदाज घेऊन दिला प्रतिसाद? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झ्याक!

खेडूत
Fri, 06/09/2017 - 17:51 नवीन
झ्याक! भुताला पार टेंपोत बशिवलं राव पाटील तुमी!
  • Log in or register to post comments

छान!!

सचिन काळे
Fri, 06/09/2017 - 21:12 नवीन
झक्कास!!!
  • Log in or register to post comments

भेश्ट!!!

जव्हेरगंज
Fri, 06/09/2017 - 22:02 नवीन
भेश्ट!!!
  • Log in or register to post comments

(No subject)

सतिश गावडे
Fri, 06/09/2017 - 22:17 नवीन
=))
  • Log in or register to post comments

एका भुताचा जन्म

रातराणी
Fri, 06/09/2017 - 22:21 नवीन
एका भुताचा जन्म =))
  • Log in or register to post comments

छान लिखाण

सौन्दर्य
Sat, 06/10/2017 - 00:10 नवीन
मूळ कथेच्या बाजाला धक्का न लावता त्याची दुसरी बाजू छान मांडलीत.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sat, 06/10/2017 - 05:39 नवीन
:D
  • Log in or register to post comments

मस्त

ज्योति अळवणी
Wed, 06/14/2017 - 16:08 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

तस्वीर का दूसरा रुख़!

पद्मावति
Wed, 06/14/2017 - 17:31 नवीन
तस्वीर का दूसरा रुख़! कथेची ही बाजू पण छानच :)
  • Log in or register to post comments

अगागागा, हासून हासून फुटलो!

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 06/14/2017 - 17:51 नवीन
अगागागा, हासून हासून फुटलो! :) :) लैच भारी अनुभव! इकडल्या बाजूचा जास्त आवडला! काळाभोर इसम म्हणे...ह्याह्याह्या!
  • Log in or register to post comments

अगागागा, हासून हासून फुटलो!

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 06/14/2017 - 17:51 नवीन
अगागागा, हासून हासून फुटलो! :) :) लैच भारी अनुभव! इकडल्या बाजूचा जास्त आवडला! काळाभोर इसम म्हणे...ह्याह्याह्या!
  • Log in or register to post comments

गाठ पडली भुता भुता

सिरुसेरि
Wed, 06/14/2017 - 18:27 नवीन
गाठ पडली भुता भुता
  • Log in or register to post comments

आमवासची पहाट

सूड
Wed, 06/14/2017 - 18:30 नवीन
आमवासची पहाट
काही विशिष्ट वास येत होता का त्या पहाटे?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा