Skip to main content

शुक्रवारची कढी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी मंगळवार, 13/06/2017 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार . . . . . या विभागात पहिल्यांदा काही तरी लिहितो आहे . . . . एक अप्रतिम पाककृती सापडली आहे ती आज तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटतेय . . . . साहित्य - दही, बेसन,तूप किंवा तेल हळद,हिंग,मीठ,कढीपत्ता, आलं, मिरच्या,पाणी ,साखर कृती - पहिल्यांदा दह्याला थोडं बेसन लावून ठेवावं. काही भागाचं ताक करुन घ्यावं. एका भांड्यात फोडणी करुन घेऊन त्यात बेसन लावलेलं ताक टाकावं. मग साधं ताकही टाकावं. चवीप्रमाणे मीठ साखर टाकून त्याला झकास उकळी आणणे आणि घरच्यांना पेश करणे. टिपणी- आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की ही साध्या ताकाच्या कढीची कृती आहे पण मग शुक्रवारची कढी असं नाव का बरं ? ह्याचं कारण म्हणजे ती शुक्रवारी भरमसाठ आणि पळीवाढ प्रमाणात केली होती आणि ती खातो आहे अजूनही ! कढी भात, कढी पोळी असं सगळं खाऊनही ती उरते. अशाच प्रकारे मंगळवारची डाळ, बुधवारचा भात वगैरे चविष्ट पदार्थ करता येतात . . सो आज शुक्रवारची कढी आणि बुधवारचा भात आहे . . . मग काय . . येताय ना जेवायला ??

वाचने 8856
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मंगळवारी शुक्रवारची कढी टाकणे म्हणजे 'शिळ्या कढीला उत आणणे' असे म्हणता येईल का ? ;) :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

मापंकडे चांगले मासलेवाइक अनुभव गाठीशी असताना अशा पावसाच्या तोंडावर मिळमिळीत कढी पाजत आहेत याचा अर्थ झणझणीत कट्ट्याच्या आवतणाची वाट पाहात आहेत.

In reply to by कंजूस

आपल्याला, 'मापंची कढी पातळ झालीय ' असे म्हणायचे आहे का ?