Skip to main content

तुम्ही काय कराल?

लेखक वजीर यांनी गुरुवार, 19/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1173
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

का वो, तुमचं आडनांव कौल हाय का ? जसजसे उत्तरेकडे जावे तसतशी प्रज्ञा कमी व्हते ,असं आयकून हाये म्हनून म्हनलं.

तुम्हाला नोकरी निमित्त परदेशी जाण्याची संधी चालुन आली तर तुम्ही काय कराल?
  • बॅचलर असल्याने - पर्याय १
  • लग्न होउन बायका पोरांसमवेत रमल्यानंतर- पर्याय २
  • भारतातच बक्कळ पैसा कमवत असेल तर - पर्याय ३
  • सध्या - पर्याय ४
- टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

+१ सध्या पर्याय ४. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>लग्न होउन बायका पोरांसमवेत रमल्यानंतर- पर्याय २ हे कितपत बरोबर आणि कायदेशीर आहे??? ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

In reply to by सखाराम_गटणे™

लग्न करुन बायका पोरं असणं हे कायदेशीर आहे...... हां मात्र ते बरोबर की चुक हे येणारा काळच सांगेल ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

एक शंका: लग्नाशिवाय बायको कशी असेल? आणि लग्नाशिवाय पोरं बेकायदा असतात का? खरोखरच कायद्यात असं लिहिलं आहे का? प्रश्न अवांतर वाटल्यास आपण खरडाखरडी करु शकतो, टींग्या! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लग्न करुन बायका पोरं असणं हे कायदेशीर आहे या वाक्यात कोठेही छेद जाउ शकत नाही! >>लग्नाशिवाय बायको कशी असेल? आणि लग्नाशिवाय पोरं बेकायदा असतात का? खरोखरच कायद्यात असं लिहिलं आहे का? हे प्रश्न मुळ धाग्याला अनुसरुन नाहीत! >>प्रश्न अवांतर वाटल्यास आपण खरडाखरडी करु शकतो, टींग्या! चालेल. मी तुम्हाला खरड करतो, तुम्ही मला व्यनी करा, अदितीताई!

वरील ब्रिटीश टिंग्याची उत्तरे आवडली आणि सहमत... सध्या अमेरिकास्थित असल्याने या कौलापुरता भारताला "परदेश" समजतो आणि १ ला उत्तर देतो: तुम्हाला नोकरी निमित्त परदेशी जाण्याची संधी चालुन आली तर तुम्ही काय कराल? खूप आनंद होइल. नव्या आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जाईन. :-) बाकी नोकरी धंद्याच्या बाबतीत कुठलीही संधी चालून आली तर एकच पर्याय डोळ्यासमोर ठेवून वागावे असे वाटते: हजीर तो वजीर! ;)

In reply to by विकास

वाईट वाटले उत्तर वाचुन. फक्त विकास या नावाखाली पोस्ट असल्याने मत प्रदर्शित करत नाही याची नोंद घ्यावी.

In reply to by आनंदयात्री

विकास यांच्याशी इतर माध्यमातुन या विषयावर चर्चा झाली आहे. त्यांचे विचार कळाले अन माझा समज हा गैरसमज होता हे पटले. जाहिररीत्या त्यांच्या विचारांवर शंका घेणारा उपप्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांची इथे माफी मागतो. - (समाधानी) आंद्या

In reply to by आनंदयात्री

अहो साहेब, माफी कशाबद्दल मागता! जाहीर बोललात म्हणून काहीच बिघडले नाही. उलटे मनात ठेवले नाही त्याबद्दल अभारी आह :-) संकेतस्थळावर आपण जो संवाद करतो तो समोरासमोर बसून बोलत करत नाही तर विचार टंकून करतो. परीणामी आपल्याला नक्की काय म्हणायचे ते समोरच्याला त्याच अर्थाने कळेल याची खात्री नसते. तसेच येथे झाले. मी भारताला परदेश मानत नव्हतो आणि नाही ही एक वस्तुस्थिती आहे. दुसरा भाग भारतात परतणे याला मी आव्हानात्मक म्हणत नव्हतो तर भारतात आव्हानात्मक काम मिळणे या संदर्भात बोललो होतो. बाकी भारतीयांच्याबाबतीत भारताबाहेर असणे आणि नसणे याला अनेक छटा आहेत. त्यात चांगल्या आहेत, वाईट आहेत, स्वप्नाळू आहेत आणि पूर्वग्रहदुषीतपण आहेत. त्यात नवल ते काहीच नाही. याबाबत भावनाप्रधान असणे समजते मात्र भावनाविवष होऊन एकीकडे देशाला नावे ठेवणे आणि दुसरीकडे केवळ परदेशात राहतात म्हणून देशद्रोही म्हणणे ह्या दोन्ही एकाच पूर्वग्रह/अहंकार वगैरे नाण्याच्या दोन बाजू वाटतात. तसे कोणी करू नये असे वाटते. याविषयावर परत कधी वेळ मिळाला तर अधिक लिहीन. (वेळ फक्त लिहीण्यासाठी लागत नाही तर नंतर प्रतिसादांना प्रतिसाद देण्यासाठीपण लागतो!) धन्यवाद

पहील्या पर्याय मधले 'नविन आव्हान' समजले नाही. ऑफिस चे एखादे न केलेले अवघड काम हे आव्हान समजु शकतो पण परदेशी जाण्यात कसले आव्हान

In reply to by मराठी_माणूस

ते तिथे गेल्या शिवाय कळायचे नाही. आपला देश आपला गाव सोडून सर्वार्थाने परक्या जागेत जाउन राहणे सोपे नाहि. तिथले आचार विचार , राहणीमान, वातावरण ,कामाच्या पध्दती , जेवणाखाण्याचा पद्धती सगळेच वेगळे आहे तिथे जाउन राहणे आव्हानात्मक असते. सगळ्यात महत्वाच म्हणजे कि तिथल्या work culture बरोबर adjust करणे फार कठिण असते.. ईथे मी ते चांगले किंवा वाईत हा मुद्दा मांडत नाहि फक्त ते वेगळे आहे ईतकच म्हणतेय. ज्याप्रमाणे एखाद्या खेडेगावाच्या माणसाला मुंबई सारख्या शहरात येउन राहणे काम करणे आव्हानत्मक वाटते तसेच हे देखिल..

In reply to by सायली पानसे

ते तिथे गेल्या शिवाय कळायचे नाही. खुप वेळा अनुभव घेउन झाला आहे , म्हणूनच असे म्हणतो

In reply to by सायली पानसे

आपला देश आपला गाव सोडून सर्वार्थाने परक्या जागेत जाउन राहणे सोपे नाहि. तिथले आचार विचार , राहणीमान, वातावरण ,कामाच्या पध्दती , जेवणाखाण्याचा पद्धती सगळेच वेगळे आहे तिथे जाउन राहणे आव्हानात्मक असते. सगळ्यात महत्वाच म्हणजे कि तिथल्या work culture बरोबर adjust करणे फार कठिण असते.. याच बरोबर आणखीनही बरीचश्या बाबी आहेत: १. ड्रायव्हींग आणि त्याचे नियम. २. टॅक्स ३. बँका व चलन ४. व्हिसा आणि इतर कायदेशीर (इमिग्रेशन) बाबी. ५. वैद्यकीय सेवा आणि विमा ६. आपत्कालीन सेवा आणि व्यवस्था या सगळ्या गोष्टी भारतापेक्षा वेगळ्या असतात. त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. परक्या देशात वेळी-अवेळी मदत मिळतेच असे नाही. ही आव्हानं पेलावी अथवा स्विकारावी लागतातच पण त्याच बरोबर तुमच्या कामावर त्याचा परिणाम होवू देता येत नाही. या विषयावर बरीचशी पुस्तके देखील आहेत: १. http://www.amazon.com/Multicultural-Manners-Essential-Etiquette-Century… २. http://www.amazon.com/When-Rome-Rio-Riyadh-Successful/dp/1931930066/ref… 3. http://www.amazon.com/Shake-Hands-Bestselling-Business-Countries/dp/159… - नाटक्या

In reply to by नाटक्या

या सर्व गोष्टी भारतापेक्षा वेगळ्या असतात. त्यांच्याशी जुळवून घेणे (सुरुवातीला) थोडे कठीण जाते, हे सर्व मान्य. पण त्यात "आव्हानात्मक" काय आहे, ते कळले नाही. (बारा देशांचे पाणी प्यालेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ज्या मातीत जन्मलो... ज्या मातीत खेळलो... वाढलो... ! ज्या जमीनीवर मी चालायला... शिकलो ! ज्या जमीनी ने मला आजवर अन्न दिले... ! त्या जमीनाला... त्या देशाला सोडून... फक्त स्वतःच्या फायदासाठी जाणं मला तरि नाही पटतं ! फिरायला जाणे.. ८-१० दिवस ट्रीप मारणे गोष्ट वेगळी.. पण आपली बुध्दी.. शक्ती कुठल्यातरी दुस-या देशाला वापरायला देणे हा मी तरी देशद्रोहच मानतो.. ! ह्या देशाने.. मातीने आपल्या वर अनेक उपकार केले आहेत ते का आपण विसरायचे :? बाकी जे बाहेर आहेत त्यांच्या बद्दल मनात कितू पण नाही.. हे फक्त माझे विचार आहेत... ! Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

तुम्हाला नोकरी निमित्त परदेशी जाण्याची संधी चालुन आली तर तुम्ही काय कराल? ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म प्रश्न तसा महत्वाचा आहे. मला वाटत कि बाहेरच्या देशात जाऊन भरपूर पैसे कमवावेत आणि आपल्या देशात परत याव. आणलेला पैसा इथे खर्च करावा म्हणजे भारताला परकीय चलन उपलब्ध होइल आणी भारतात रोजगाराच्या सन्धी. इन्ग्रजी मधे याला "विन विन सिट्युएशन" म्हणतात. कस काय????