को ह ण ह क ह र
डिस्केमर : खालील लेखातील मते, ही माझी वैक्तिक आहेत.मिपाच्या संपादकांचा किंवा इतर सद्स्यांचा ह्यात सहभाग नाही.
-----------------------------------------------------------
विसाव्या शतकातल्या नव्व्दाव्या दशकात, ईंटरनेटचा उदय झाला आणि मराठी पाऊल पडते पुढे, ह्या उक्तीनुसार, मराठी मंडळींनी पण ह्या क्षेत्रात बर्यापैकी यश मिळवले.याहू, ऑर्कूट ह्या सारखी सामाजीक संकेत स्थळे पण चालू झाली.काही मराठी माणसांनी, मराठी माणसांसाठी आणि बर्याच अंशी मराठीतच लिहील्या जाणारी काही संकेत-स्थळे बनवली.
मायबोली, मी-मराठी, मनोगत, मिसळपाव आणि ऐसी अक्षरे ही त्यापैकीच.(माझ्या अंदाजानुसार सध्या तरी मिपा, माबो आणि ऐअ, ही ३च संकेतस्थळे आंतरजालावर टिकून आहेत. )
माणसाचा मूळचा स्वभाव आपापला कंपू जमवायचा, मग हा स्वभाव पण आंतरजालावर उमटणारच.त्यामुळे मराठी संकेत-स्थळात पण विविध कंपू तयार झाले.त्यामुळे मी आंतरजालावरील मराठी संकेत-स्थळाचा सदस्य आहे, इतकेच सांगून भागत नाही, तर "नक्की कुठल्या?" हे पण सांगावे लागते.
म्हणजे तुम्ही "को ह ण ह क ह र?" असा प्रश्र्न कुणी विचारला तर, लगेच तुम्ही माबोकर की मिपाकर की ऐअकर, असे उत्तर द्यावे लागते.
शाळेत जसे विद्यार्थ्याचे ४ स्तर असतात तसेच इथे पण आहेत.चष्मा लावणारी आणि अभ्यासात हुषार असलेली मुले. ही जास्त करून कंपूबाज असतात आणि आपल्या कंपूत उगाच कुणाला घेत नाहीत."अहं ब्रह्मास्मी " हा जप ही मंडळी सतत जपत असतात.
थोडे टवाळ आणि थोडी अभ्यासू मंडळी, दुसर्या स्तरात मोडतात.ही मंडळी फार उच्च स्तरावर असतातहस, पण हे मग साधारण पणे साम्यवाद स्वीकारतात.इथे कंपूबाजी नसते पण टवाळगिरी फार अतिही करत नाहीत.(अर्थात हे सरसकटीकरण नाही. )
मस्ती-खोर आणि आपापल्या क्षेत्रात नांव कमावलेली कलाकर मंडळी तिसर्या क्षेत्रात मोडतात.ही मंडळी नांव पण कमावतात आणि जोडीला प्रचंड दंगेखोर पण असतात.तसा ह्यांचा पण कंपू असतो पण एकमेकात मतभेद पण असतातच.पण मतभेदांचा परीणाम ह्याच्या मैत्रीवर होत नाही.
तर समाजाशी फटकून वागणारी मंड्ळी . ह्या तिन्ही वर्गा पासून दूर राहतात. ही मंडळी सामान्यतः स्वतःचे ब्लॉग काढतात.उडदा-माजी-काळे-गोरे, ह्या उक्ती प्रमाणे काही जण स्वतःच्या ब्लॉग व्यतीरिक्त इतर संकेत-स्थळांवर पण लिहीत असतात.हे सर्व संकेतस्थळांवर असतात आणि जमेल तसे आपापल्या ब्लॉगची जाहीरात पण करत असतात.(हे सरसकटीकरण नाही.)
=================
तर आता तुम्ही जर अभ्यासात हुषार आणि एक नंबरचे कंपूबाज असाल तर, तुमच्यासाठी सर्वात उत्तम संकेत-स्थळ म्हणजे "मायबोली."त्यातूनही तुम्ही जर आम्रिका-वासी असाल (माबोच्या भाषेत "उसगाव") तर फार उत्तम.म्हण्जे तुम्ही जरी नविन असाल तरी, तुम्हाला तुमचा कंपू बनवायला उत्तम.
आता समजा, तुम्ही ह्या वरील कॅटॅगरीत बसत नसाल तरी हरकत नाही.अशावेळी आपण आपलेच डू-आय-डी बनवायचे आणि स्वतःचा कंपू तयार करायचा.अर्थात ह्याला फार चिकाटी लागते.वर्षानुवर्षे सदस्य होवून चालत नाही, तर त्यासाठी माबोच्या पावसाळी सहलीला पण जावे लागते.अर्थात त्या सहलीचा खर्च सामान्यांच्या हाताबाहेरच असतो. त्यामुळे साहजिकच उच्च आर्थिक स्तर असलेलेच त्या सहलीला जावू शकतात.
आता एकदा का तुम्ही कंपूत सामील झाला की, मग पुढचा गड, म्हणजे स्वतःचा आणि आपल्या कंपूतल्या इतर सभासदांचे लेख, सतत पहिल्या पानावर कसे राहतील? ह्याची काळजी घेणे.ह्यासाठी थोडा अभ्यास करायला लागतो.
साधारण १-२ महिन्यात कोण कुठल्या कंपूत आहे, ह्याचा अंदाज घ्यायचा.आणि जो कुणी कुठल्याच कंपूत नसेल, असा आय.डी. शोधून काढायचा.माबोवरच न्हवे तर इतर संकेत-स्थळांवर पण असे "एकटे सदाशिव" बरेच असतात.कंपूतल्या सभासदांच्या लेखावर ताशेरे ओढण्यापेक्षा, ह्या अशा एकट्या सदस्यांवर हल्ला-बोल करणे सोपे जाते.आणि त्यातही असे एकट्या आय.डी.ने हल्ला-बोल करण्यापेक्षा आपले असंख्य डू-आय-डी पण ह्या कामाला जुंपायचे. आपले प्रतिसाद प्रकाशित व्हायला लागतात आणि स्वसंपादनाची सोय असल्याने, प्रकरण जास्त अंगाशी यायला लागले की, स्वसंपादनाचा फायदा पण घेता येतो.
एकदा का येन केन प्रकारेण आपली प्रसिद्धी व्हायला लागली, की मग आपल्या नादी कोण लागत नाही.त्यातूनही, कधी आपला आय.डी. नामशेष झाला तरी आपले इतर आय.डी. असल्याने आपण परत माबोवर मुक्त संचार करायला मोकळे होतो.
मोबोवर प्रतिसाद लिहितांना एक काळजी मात्र घ्यायची, तिथे सभासदांच्या नावापुढे "जी" लावायचा. म्हणजे मुवि न म्हणता, "मुविजी" असे म्हणायचे.कारण असे तुम्ही लिहिलेत तर "तुम्ही एक इतरांना आदर देणारी व्यक्ती आहात." असा भ्रम इतर सभासदांमध्ये पसरायला मदत होते.असा माझा अंदाज.खरे खोटे माबोकर जाणे.
अर्थात एकट्या दुकट्या सभासदांच्या प्रतिसादांना मात्र अनावश्यक प्रतिसाद देतांना त्यांच्या नावापुढे "जी" लावायची गरज नसते.हा प्रघात साधारण पणे डू-आय-डी पाळतात.त्यामुळे तुमचे जर माबो मध्ये डू-आय-डी नसतील तर "जी"चा वापर जास्तीत जास्त करा, असा सल्ला.
=================
आता तुम्हाला "ऐअ" कर व्हायचे असेल तर, एक गोष्ट मात्र पाळा.इथे फार प्रतिसाद येत नाहीत.तसे इथे वावरणे फार म्हणजे फारच सोपे.एक तर इथे डू-आय-डीचा त्रास फार कमी.एक्द दुसरा असला तरी इतर सभासद पण त्यांच्या प्रतिसादाकडॅ जास्त लक्ष देत नाहीत.आपसूकच त्यांचा (डू-आय-डींचा) तोरा मावळतो.
ऐअ बद्दल जास्त न लिहिता, एका वाक्यात सांगायचे तर, तुमचे लेख उत्तमच हवेत.जास्त करून विचार पुर्वक लिहिलेले.
=================
आता तुम्हाला "मिपाकर" व्हायचे असेल तर, मात्र थोडा विचार करा.कारण इथे "अहं ब्रह्मास्मी" ह्याला अर्थ नाही.अहं गुंडाळून जर तुम्ही जगू शकत असाल तर आणि तरच "मिपाकर" व्हा.
इथे कुणीही कुणाला "जी" वगैरे म्हणत नाही.ताई, दादा. काका अशा कौटुंबिक बिरुदावलींनीच शक्यतो प्रतिसाद दिल्या जातात.इथे शक्यतो मामू (मारून मुटकून) नौकरी करणारे आणि योग्य वेळ आली की स्वतः साठी जगणारे बर्यापैकी.जाणून बुजुन नौकरी करणारे असलेच तर तेही उच्च व्यावसायिक पदासाठी झटणारे.
शाळेतील हा दुसर्या किंवा तिसर्या स्तरातील मंडळी.त्यामुळे ह्यांना कंपूची गरज नसते.तुम्ही आलात तरी उत्तम आणि नाही आलात तरी उत्तम.
"मिपावर" तुम्ही वाट्टेल ती लिहू शकता पण थोडे तारतम्य मात्र बाळगायला लागते.
उदा.
लेखामध्ये आपल्या बायकोचे थोडे दोष दाखवले तरी येथील महिलावर्ग त्याकडे कानाडोळा करतात पण असा लेख तुम्ही माबो वर टाकलात तर मात्र तेथील महिलावर्ग तुमच्या पाठीशी हात न धूता लागतो.
तस्मात थोडी थट्टा-मस्करी मिपावर केलीत तरी चालते.
पब फालतू धागे मात्र मिपावर अजिबात चालत नाहीत.
उदा. गाण्यांच्या भेंड्या किंवा एखाद्या मालिकेवरील लेख. हे असे लेख माबो वर बर्यापैकी टिकतात.पण मिपावर मात्र असा प्रयत्न चुकुनही करू नका.
==========================
तसा आमचा ह्या तिन्ही संकेतस्थळांबाबत सुरुच आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ऐअ
ऐसीवर इथल्यापेक्शा मोकळे
तुला ओसाड म्हणायचं आहे का?
हा हा हा
कश्या दृष्टीने मोकळे? म्हणजे
आपले मिपाच सर्वोत्तम
+ १
सहमत +१११११११
सहमत.
मलाही असंच वाटते.
मुविकाका सध्या लैच फॉर्मात
सध्या रजेवर आहे....
पिंपरीत कधी येताय?
पिंपरीत कधी येताय?
धा वेळा कन्फर्म करून जा हो...
वल्लींच्या बरोबर कट्टा करायचा असेल तर साधा उपाय....
(No subject)
मिपाची हीच गोष्ट आवडते ना!!
"को ह ण ह क ह र" म्हणजे काय?
:)
जॉबर जाहाला
"को ह ण ह क ह र" म्हणजे काय?
हो लक्षात आले :)
दुरूस्ती
को ह ण ह क ह र
मस्त !!!!
मिपाबद्दल अजून दिलखुलास लिहा की !
मी पहिला असा माणूस असेन की
ऐसी अक्षरे वर लिहिणारे अत्यंत अभ्यासू आहेत.
माझ्या सर्व प्रकारच्या काड्या
तसा मी पण.....
नाही, मन इत्यादी काही दुखत
तो एक प्रयोग होता.....
नक्कीच, पण सध्या एकच गोष्ट
मी समजू शकतो....
:)
ऐसीचे तसे नाही. एक तर तिथे
ऐसी अक्षरे
मित्रा ....