एक बाजू अशीही!
काही दिवसांपूर्वी मला whatsapp वर एक लिंक आली होती. विषय होता'A LEGAL RAPIST'. एका विवाहित स्त्रीच्या मनातले विचार मांडले आहेत या लिंकमध्ये.
नवरा कामावर असतो आणि ती घरी. तो घरासाठी कमावतो आहे आणि ती घर सांभाळते आहे. 'तो कमावतो आणि मी घराचे खर्च संभाळते', 'मी नोकरी करत नाही; पण आम्ही दोघेही कंपनीच चालवतो. तो बाहेर काम करून आणि मी घरी काम करून.' अशा काही वाक्यांमधून तिच्या मनात असलेल तिच स्वतंत्र आस्तित्व कुठेतरी जाणवत. याचा अर्थ ती एक सुशिक्षित स्त्री आहे. खोल कुठेतरी तिच्या मनात तिने जपलेल स्वत्रांत्य जाणवत. पण या विडीओ मध्ये पुढे तिनेच एक घटना सांगितली आहे. ज्यातून खरा twist समजतो.
शनिवार रात्र असते. नवरा कामावरून येतो त्यावेळी तिच डोकं दुखत असत. पण तो येतो म्हणून ती उठून त्याच्याकडे जाते. तो तिच्या जवळ येतो. तिची मासिक पाळी सुरु असते त्यामुळे तिची इच्छा नसते. परंतु तरीही तिचा नवरा तिच्याकडून जबरदस्ती शरीर सुख घेतो. घेतो काय ओरबाडतो! त्या त्याच्या एका कृतीनंतर मात्र तिची उद्व्यग्ता आणि तिच्या मनातली घुसमट व्यक्त झाली आहे. बर नसलं तरी; मासिक पाळी असली तरी; केवळ 'नवऱ्याची इच्छा' म्हणून स्त्रीने त्याला स्वतःच शरीर स्वाधीन करायचं? अनेक पिढ्या एक वाक्य मुलींना लहानपणापासून सांगितल जात... 'पतिला जर मुठीत ठेवायचं असेल तर त्याला नाही म्हणू नकोस.' मुळात पतिला मुठीत का ठेवायचं? आणि नाही म्हंटल तर तो त्याचा अपमान कसा? केवळ तो घरासाठी पैसे कमावतो आणि स्त्री घराबाहेर पडून नाही कमावून आणत म्हणून त्याला नाही म्हणायचा अधिकार तिला नाही? तो म्हणतो माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे... केवळ या 'खुप प्रेमा'साठी त्याची कुठलीही मागणी मनाविरुद्ध पूर्ण करायची? प्रसंगी त्याच्या शिव्या, त्याच्या घरच्या व्यक्तिंनी केलेले अपमान सहन करायचे? असे अनेक प्रश्न!!! स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सन्मान असे अनेक विषय या 'A LIGAL REP' विषयाशी निगडीत या विडीओमध्येआहेत.
हेच विषय निगडीत असलेला अजून एक मुद्दा किंवा घटक आहे. मात्र आजवर मी याबद्दल फारशी चर्चा ऐकलेली नाही किंवा माझ्या वाचनात आलेल नाही.
पतिची इच्छा असते म्हणून मनाविरुद्ध स्त्रीने त्याला शरीर स्वाधीन करायचं असत; हा विचार जितका घृणास्पद आहे तितकंच तिची शरीर सुखाची इच्छा असूनही केवळ त्याची इच्छा नाही म्हणून ते घडत नाही हे देखील स्त्रीला मानहानीकारक नाही का? दिवसांमागून दिवस आणि वर्षांमागुन वर्ष अनेक नवरे केवळ जिच्याशी लग्न केल तिच्यावरच मन उडालं किंवा मन भरल म्हणून किंवा आता दुसरी कोणी आवडते म्हणून तिला शरीर सुख द्यायला नाकारतात. तरीही ती स्त्री मात्र आई, सून, आणि पत्नी म्हणून तिची सगळी कर्तव्य पूर्ण करत राहाते. दोघे एकाच खोलीत झोपतात... जगासमोर पती-पत्नीची भूमिका उत्तम वटवतात..... वर्षानुवर्ष एकत्र राहून 'so called' संसार जगतात... मात्र ती स्त्री आतमधून घुसमटत असते... तिच्यावर देखील तेच संस्कार असतात ना.... 'नवऱ्याची इच्छा!' तिचा आदर कर.
कुटुंब सल्ला केंद्राच्या निमित्ताने मी अशा अनेक गरीब स्त्रियांना भेटले आहे ज्या म्हणतात 'काय करू आता त्यांना मी आवडत नाही.' 'माझ्यातच काहीतरी कमी असेल म्हणून ते माझ्याकडे आता बघत नाहीत.' या स्त्रिया किमान मनातली भावना शेजारणीकडे किंवा कुटुंब सल्ला केंद्रात येतात तेव्हा बोलून दाखवतात. परंतु मध्यम वर्गातील अशा अनेकजणी असतील ज्या आवश्यकता असते म्हणून घरासाठी कमावून आणतात. एक आई, एक सून म्हणून प्रत्येक जवाबदारी पूर्ण करतात... तिचं तिच्या पतीवर मनापासून प्रेम असत मात्र पतीचा तिच्यातला इंटरेस्ट संपलेला असतो. त्यामुळे तो अगदी सहज तिला नाकारतो. अर्थात त्याला ती जरी प्रेयसी म्हणून नको असली तरी तिने त्याची पत्नी असण मात्र त्याला हव असत. मग तो बंद बेडरूम मध्ये तिचा कोणीच राहात नाही. तिला हवस असणार प्रेम... शरीरसुख... तो नाकारतो. या नकारामुळे ती मनातून आयुष्यभर जळत राहाते. तरीही समाजात मात्र 'श्रीयुत आमके' यांची पत्नी म्हणून वावरत असते. कदाचित तिच्या मनात देखील 'मी आवडत नाही म्हणजे माझ्यातच काही कमी आहे'; हे येत असेल. या तिच्या मनाच्या घुसमटी बद्दल कधीच कोणीच बोलणार नाही का? आजही स्त्रीला शरीर सुखाची इच्छा झाली तरी त्याबाबतीत बोलण किंवा आपली इच्छा आपल्या पतीकडे व्यक्त करण देखील अवघड वाटत. त्यादोघांमध्ये याविषयातला मोकळेपणा असू नये का?
कदाचित एक असाही विचार पुढे येईल या विषयात की तिची इच्छा असेल आणि नवरा ती पूर्ण करत नसेल तर तिने हे सुख बाहेर जाऊन मिळावावं. पण म्हणजे परत एकदा तिच्या पतीने तिला जे नाकारलं आहे ते मान्य केल जातंय अस नाही का? दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तिच जितक तिच्या संसारावर प्रेम आहे तितकच तिच्या पतीवर प्रेम आहे. मग तिने बाहेर का जाव? दोघेही सुधृढ असूनही केवळ त्याची इच्छा नाही म्हणून तिने कुचंबणा सहन करायची हे किती अन्यायकारक आहे! अर्थात ज्याप्रमाणे 'पतीच्या इच्छेला नाही म्हणू नकोस;' हे स्त्रीला कायम सांगितल जात तसाच तिला हे देखील सांगितल जात की तुझ्या इच्छांना मुरड घालायला शिक.
खर तर शरीरसुख हा तस बघितल तर वयक्तिक आणि तरीही चर्चेचा विषय आहे. पती-पत्नीसाठी वयक्तिक आणि तरीही पती-पतींमध्ये चर्चेचा! हे आपण समाज म्हणून स्वीकारलं आणि आपल्या मुलीला सांगितल की तुझी इच्छा दडपणे म्हणजे स्त्रीत्व नाही; तर कदाचित कुठेतरी बदल घडू शकतो. अलीकडे विविध स्तरांवर मुख्यत्वाने एक चर्चा घडते की 'इच्छा नसताना शरीरसुख घेतलं तर लग्न झालेलं असल तरीही तो legal rep आहे', तसच 'इच्छा असूनही शरीरसुख दिल जात नाही' हे देखील 'legal harresment आहे' हा विचार देखील आपण मान्य करून चर्चेत आणला पाहिजे.
'माझी इच्छा नाही त्यामुळे तू माझ्या शरीराला हात लावायचा नाही', हे मोकळेपणी स्त्रीने सांगितले पाहिजे हा विचार जितका महत्वाचा आहे आणि अलीकडे तो सहजपणे मांडला जातो आहे; तितकाच 'माझी इच्छा आहे.. मला शरीरसुख हव आहे' हे देखील तिला स्पष्टपणे सांगण जमलं पाहिजे. तू नाकारू शकतेस... तो तुझा हक्क आहे! ही चर्चा जशी अलीकडे होताना दिसते; तसेच तू मागू शकतेस; तो देखील तुझा हक्क आहे! हा विचार देखील पुढे येणे गरजेचे आहे अस मला वाटत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सहमत आहे. या विषयावर अजून
पूर्ण एकतर्फी. इत्यलम.
सहमत
अगदी सहमत आहे गवी, लेख पूर्ण
लेखाशी सहमत आहे.
माझी इच्छा नाही त्यामुळे तू माझ्या शरीराला हात लावायचा नाही
एक बाजू अशीही…
+1.
स्त्री ची इच्छा नसते तशी
ज्योतीजी,
मला वाटतं मी जो मुद्दा
बरोबरे पण ....
गा. पै.
बाईची बाजू लंगडी
गा. पै. जी
कायदा गाढव असतो.
ओरबाडून? या शब्दाच प्रयोजन
ज्योतिजी,
कायद्याने पत्नीला हा अधिकार
बाईश्री !
अलीकडे 'तू नाकारू शकतेस' याची जशी तिला जाणीव करून देण्यासाठी अनेक चर्चा, youtube वरील व्हिडीओ, परिसंवाद, कायदे आहेतहे अलीकडे नाही फार पूर्वीपासून, म्हणजे शिकवण्यापूर्वीपासून स्त्रीयांना माहिती आहे ! आणि सुशिक्षितात याचाच सर्रास वापर चालू असतो. २)तसेच 'तू मागू शकतेस' या विचाराचा देखील मोकळ्या मनाने आणि अशाच विविध फोरम वर स्वीकार झाला पाहिजे;तुम्ही कशावरनं हा निष्कर्श काढला माहिती नाही पण `ती मागते' हा दिवस कित्येक संसारात सुवर्ण क्षण असेल. पुरुष वेड्यासारखे पैश्यामागे धावायचे थांबतील, राजकारणात शिरुन लोकांना डॉमिनेट करण्याच्या फंदात पडणार नाहीत, अखिल कॉर्पोरेट सेक्टरमधले बॉसेस घरचा वैताग कंपनीत काढायचे थांबतील, उगीचच्या उगीच देशाचा सीमाविस्तार किंवा संरक्षणाच्या नांवाखाली जान की बाजी लावून युद्धात उड्या मारणार नाहीत.... इतकं सुख घरातंच मिळतंय म्हटल्यावर कोण नतद्रष्ट बाहेर पडतोयं ?संजयजी
बाईश्री !
स्त्री नाईलाजास्तव का होईना
अहो जर पत्नी प्रेयसी म्हणून
कायद्याकडून ओरबाडणे