Skip to main content

सुधारस

लेखक त्रास यांनी बुधवार, 25/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर धडाधड पाककृत्या लिहित आहेत हे पाहिल्यावर हा माझा छोटासा प्रयत्न- ग्वोड मानून घ्यावा- कृती- हवा तेव्हढा साखरेचा पाक करा. त्यात चवीनुसार लिम्बुरस टाका. झाला सुधारस तयार. गरम पोळीबरोबर खा.

वाचने 3606
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

पाणी, साखर, लिंबे (इडलिंबे?? & देवलिंबे??) प्रमाण किती??? ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

अगाग्या सुधारस + पोळि = :)] डाक्तर ला फोन नक्किच ************************************************************** शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|| शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||

त्रासा, साखरेपेक्षा गुळाचा सुधारस ट्राय कर. अन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अभिज्ञ.

आम्ही बिनफोटूच्या पाकृंना प्रतिसाद देत नाही.. क्षमस्व.. आपला, (सगुणरुपाचा प्रेमी) तात्या. किंवा सगुणाचा प्रेमी! ;)

माझा हा आवडता पदार्थ आहे. त्यात थोडेसे कणीदार तुप टाकले की अजुन छान लागतो. पोळी आन सुधारस आसले कि झाले बाकि काहि लागत नाही. या पदार्थाचा कधी कंटाळा आला नाही. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

वर दिलेल्या पाकृ मधे , पिकलेल्या केळ्याच्या चकत्या, किसमीस आणि २ काड्या केशर (गरम वाटीत चुरून) टाकले तर अजून चवदार होतो.

१ वि. विनंती... वरचा प्रयोग क्रुपा करुन स्वता: वर करु नये. आपल्या आयुषयाचे ''धागे'' तुटण्याची शक्यता जास्त आहे. ...आपला १ शरीर रक्षक