
घरच्या सेंद्रीय बागेत भाजीपाला उगवून खाण्याची मजा वेगळीच. वेलीवर पिकलेले टोमॅटो तर बाजारात मिळणार्या कृत्रिमरित्या पिकवलेल्या टोमॅटोपेक्षा कितीतरी लज्जतदार! आमच्या शेजारच्या आजी दर वर्षी त्यांच्या बागेतले खोकेभर टोमॅटो न्युयॉर्कला दिराच्या घरी पाठवतात. त्यांच्याकडून बागकामाचे धडे घेऊन आणि सुरुवातीला काही अवजारे उधार घेऊन आम्हीही जरा सोप्या आणि खारी-पक्षी या मंडळींना फार आवड नसलेल्या अश्या टोमॅटोनेच शेतीकाम सुरु केले.
रोपे लावल्यावर काही दिवसांनंतर एक-एक, दोन-दोन असे टोमॅटो मिळायला लागल्यावर ते असेच खाऊन संपत. पण हळूहळू वेली वाढायला लागल्या आणि त्यावरच्या टोमॅटोची संख्याही. नवर्याचं काम फक्त ते फक्त घरात आणण्यापुरतं.

पण एवढे टोमॅटो कसे वापरावे आणि कसे संपवावे?
मग नेटवर शोधाशोध केल्यावर प्युरे बनवून ठेवायचे ठरवले. ती बनवण्यासाठी -
टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले. धारदार सुरीने खालच्या बाजूने '+' चिन्हासारखे दोन काप दिले. खूप आत चीर देण्याची गरज नाही, फक्त सोलायला सोपे जावे म्हणून द्यायचे. पातेल्यात टोमॅटो मावतील इतपत पाणी घेऊन उकळायला ठेवले. पाणी उकळू लागल्यावर त्यात अलगदपणे टोमॅटो सोडले. ४-५ मिनिटे आणखी उकळू दिल्यावर आच बंद केली. टोमॅटो आता २-३ मिनिटे गार पाण्यात ठेवले. पाण्यातून काढून हाताने साल काढून घेऊन मिक्सरमध्ये पेस्ट करुन घेतली. छोट्या-छोट्या डब्ब्यांमध्ये भरुन फ्रीझरमध्ये ठेवले. अशी प्युरे नंतर सूप, ग्रेव्ही असलेल्या भाज्या यांसाठी वापरता येते.
तर ही 'प्युरे' बनवता बनवता मला टोमॅटो 'पुरी' आठवली. (आम्हांलाही शाब्दिक कोट्या करता येतात म्हटलं!) मग ती बनवून बघायची खुमखुमी आली, आणि लगेच अंमलातही आणली.
मग यातलीच वाटीभर प्युरे घेतली. त्यात मावेल तेवढी पीठे घातली - मी गव्हाचे, थोडे ज्वारीचे आणि थोडे (केप्र) भाजणीचे आणि त्याहून थोडे बेसन पीठ घेतले. तुम्ही आपापल्या अंदाजाने घ्या! ४-५ लसूण पाकळ्या ठेचून, कोथिंबीर बारीक चिरुन, मीठ, लाल तिखट, हळद, तीळ घातले. भरडसर वाटून धने आणि जीरे घातले, आणि थोडेसे तेल घालून पुरीसाठी घेतो तसे घट्ट मळून घेतले. कढईत तेल गरम करायला ठेवले आणि पुर्या तळून घेतल्या. त्या भरडसर धन्यांमुळे आणि अर्थातच टोमॅटोमुळे काय चव आली!
पावसाळ्यात एखाद्या संध्याकाळी नक्की करुन पाहा. केचप, चटणी, लोणचे, दही किंवा यातले काहीच सोबत न घेता अश्याच खा :)
अहाहा वेगळाच प्रकार
In reply to अहाहा वेगळाच प्रकार by जेम्स वांड
धन्यवाद!
रुपे काय दिसताहेत ग टोम्ॅटोज!
प्युरी
क्या बात है!
In reply to क्या बात है! by चांदणे संदीप
बाब्बौ संदीप भाऊ पाकृ मध्ये?
व्वाह...!!!
In reply to व्वाह...!!! by प्रचेतस
असेच म्हणतो.. +१ व्वाह...!
बहोत खूब !
टंबाटी लय भारी दिसत्यात गड्या
आहाहा...मस्तच!
सुंदर लेखन. पाककृती आणि
झकास!
झकास रेसिपी.. करून बघेन..
का ग टाकली पुरीची रेसिपी.
पुऱ्या मस्त टेम्पटिंग आहेत.
सुंदर
पुर्या छानच बनल्या आहेत.
In reply to पुर्या छानच बनल्या आहेत. by पिंगू
धन्यवाद. कल्पना छान आहे..
एखादा बॉक्स पाठवुन दे! मला
In reply to एखादा बॉक्स पाठवुन दे! मला by पिलीयन रायडर
या वर्षीचे टोमॅटो अजून
सर्वांना धन्यवाद
वाह क्या बात है.
आहा किती मस्त
स्वतःच्या बागेत पिकवून ते
घरचे टोमॅटो, सही..
टम्म फुगलेल्या पुर्या बघून
प्रतिसाद देणार्या सर्वांना
टोमाटो अगदी दृष्ट काढण्याऐवढे
झक्कास!
झकास!मस्त टोमॅटो! मस्त प्युरे
व्वा!
मस्तच..
नव्याने प्रतिसाद देणार्या
वाह, भारीये प्युरीची पुरी !
एकदम झक्कास!!
छान आहे ही पाकृ. प्रवासासाठी
अग कसल्या भारी दिसताहेत !
अरे वा..
नव्याने प्रतिसाद दिलेल्या