वाढणी: ३ व्यक्तींसाठी
साहित्य: अर्धा किलो कोवळी भेंडी, १ टीस्पून तिखट, १ टी स्पून गरम मसाला, १/२ टीस्पून आमचूर पावडर, १/२ टीस्पून धने - जिरे पावडर, १/२ टीस्पून चाट मसाला, १/२ ते पाउण वाटी बेसन, चवीनुसार मीठ, शॅलो फ्राय करण्यासाठी तेल.
कृती: पहिल्यांदा भेंडी धुवून टॉवेल वर कोरडी करून घ्यावी. नंतर दोन्ही बाजूंची टोके कापून प्रत्येक भेंडीला एक एक उभी चीर द्यावी. जर भेंडी खूप मोठी असेल तरच तिचे दोन-तीन तुकडे करावेत. नाहीतर अख्खीच ठेवा.
एका ताटात हे सारे तुकडे ठेवून द्या. एका बाउल मध्ये तिखट, मीठ, धने-जिरे पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला, बेसन आणि मीठ हे सगळं नीट एकत्र करावं. कोरडंच. हा मसाला चिरलेल्या भेंडीवर व्यवस्थित पसरावा आणि हलक्या हाता ने भेंडीमध्ये मिक्स करावा. हे मिश्रण अर्धा तास तसेच मुरत ठेवून द्यावे.
नंतर एका पॅन मध्ये जरा जास्त तेल घ्यावे. आपण भेंडी तळणार नाही. त्याची काही आवश्यकता नाही. तेल तापले की त्यात भेंडीचे तुकडे घालून मंदाग्नीवर सावकाश परतावी. भाजी झाली की मात्र ती गरम गरमच भात-आमटी किंवा पोळी-रस्सा भाजी याबरोबर वाढावी.
टीपः- भेंडी तळली तर ती नंतर लगेच मऊ पडते. शिवाय तेलात बेसन आणि इतर मसाले खाली बसतात. ते तेल नंतर वापरता येत नाही नीट. त्यापेक्षा शॅलो फ्राय भेंडी जास्त वेळ कुरकुरीत रहाते, तेल खराब होत नाही आणि भाजीही जास्त तेलकट होत नाही.

वाचने
11251
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान भेंडी!
नक्की नक्की.
In reply to छान भेंडी! by एस
मलाही हविये ही रेसिपी. नक्की
In reply to नक्की नक्की. by सविता००१
अय्यो.....
In reply to मलाही हविये ही रेसिपी. नक्की by सानझरी
भेंडीसारखी देखणी आणि चविष्ट
In reply to अय्यो..... by सविता००१
भेंडीत दही, मसाला घालून
In reply to छान भेंडी! by एस
मस्त!
In reply to छान भेंडी! by एस
एरवी चकण्यात खाल्लेल्या
मस्त....
रैवारी
सवे मस्त!!! आधीच भेंडी फेवरिट
मस्तच सवि.
मेसमधल्या काकू भेंडी आडवी
नशीबवान आहात, मेसमध्ये भरलेली
In reply to मेसमधल्या काकू भेंडी आडवी by सूड
"सविताताई" पाकृ मस्त, तुम्ही
In reply to नशीबवान आहात, मेसमध्ये भरलेली by रातराणी
जोरदार सुरूये की पाककृती सदर
कुरकुरीत आणि चमचमीतही. मस्त.
मस्त,मस्त,करणे मस्ट आहे.
मस्त सवे!माझ्याकडेही अशी
>>भेंडीत दही, मसाला घालून