Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by इनिगोय on Sat, 06/10/2017 - 22:59
लेखनविषय (Tags)
संस्कृती
विज्ञान
व्यक्तिचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
संवाद (१) “If you wish to make an apple pie from scratch, you must first invent the universe.” - Carl Sagan ९ – ही मस्त कोट आहे, मला आवडली. ३७ – तुला कळली? ९ – हो. म्हणजे तुम्हाला जर अगदी पहिल्यापासून ऍपल पाय बनवायचा असेल, तर आधी झाड लावावं लागणार. त्याच्यासाठी पृथ्वी बनवावी लागणार. त्यासाठी बिग बँग झाला पाहिजे म्हणजे युनिव्हर्स तयार होईल. ३७ – (!!) कार्ल सगान?? संवाद (२) ९ – हे काय गं, देवाची पूजा नाही केलीस? ३७ – नाही रे बाबा, मला पूजा वगैरे नाही जमत. माझा त्यावर विश्वास नाहीये. देव मानते हां मी, पण तो मूर्तीत असतो असं मला नाही वाटत. ९ – हो, even I think that. ३७ – मग तुला काय वाटतं? देव कुठे असतो? ९ – सगळीकडे! म्हणजे या कापडात, या भांड्यात, या प्लास्टिकमध्ये... ३७ – (!) ९ – ..देव सगळीकडे असतो. ३७ – आणि नेचरबद्दल काय वाटतं तुला? ९ – नेचरचं पण तसंच आहे. ३७ – म्हणजे? ९ – म्हणजे बघ ना, या सगळ्या ज्या वस्तू – कापड, भांडं, प्लास्टिक हे सगळं कुठून येतं? नेचरमधूनच. ३७ – हम्म! मग नेचरला विल असते का? ९ – असणारच ना.. बघ आता पाऊस पडतो, तर आपल्या planet जवळ सूर्य असा असायला पाहिजे, पाणी असायला पाहिजे हे सगळं कोणीतरी ठरवलं असणारच ना? ३७ – (!) ९ – म्हणूनच नेचरमध्ये अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ३७ – बरं नेचरचे कॉम्पोनंट सांग काय काय आहेत? ९ – नेचर तर सगळीकडेच आहे. झाडात, माणसात, डोंगरात. ३७ – नाही.. हे तर नेचर ज्याचा कॉम्पोनंट आहे, त्याची उदाहरणं झाली. नेचरचे कॉम्पोनंट काय आहेत? ९ – ओह.. पृथ्वी, हवा.. अं.. पृथ्वी, हवा.. अरे यार.. ३७ – आणि? ९ - पृथ्वी, हवा, आग.. अरे कुठे गेले ते पाच भूतं?! ३७ – (!!!) ९ - अं.. पाणी.. आणखीन एक आहे, मी नेहमी विसरतो ३७ – या चारांचा अब्सेंस कुठे असतो सांग? ९ – (विचारात) ३७ – स्पेस. किंवा अवकाश, आकाश. ९ – हां. सो हे सगळे मिळून ठरवतात, काय काय करायचं ते. ३७ – (!!!!!!!!!!!) ३७ – (!!!!) ३७ – हे सगळं तुला कुठून कळतं रे? . . . . . . .
  • Log in or register to post comments
  • 6725 views

प्रतिक्रिया

Submitted by सानझरी on Sat, 06/10/2017 - 23:13

Permalink

Img दिसेना..

Img दिसेना..
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Sat, 06/10/2017 - 23:27

In reply to Img दिसेना.. by सानझरी

Permalink

मला जमत नाहीये बहुतेक. संमं

मला जमत नाहीये बहुतेक. संमं मदत करा प्लीज.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Sun, 06/11/2017 - 10:49

In reply to मला जमत नाहीये बहुतेक. संमं by इनिगोय

Permalink

इमेज पब्लिक केली आहे आहे ना?

इमेज पब्लिक केली आहे आहे ना? बाकी काही प्रॉब्लेम दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 06/11/2017 - 15:37

In reply to मला जमत नाहीये बहुतेक. संमं by इनिगोय

Permalink

तुम्ही वापरलेला कोड "इमेजच्या

तुम्ही वापरलेला कोड "इमेजच्या थंबनेल"चा आहे "इमेज"चा नाही. गुगलफोटोत इमेज पूर्ण आकारात (थंबनेल नव्हे) डिस्प्ले करून मग तिच्यावर राईट क्लिक करून तिचा "इमेज कोड" मिळवा व तो इथेच प्रतिसादात टाका... मग संपादकांना तो लेखात हलवता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 06/10/2017 - 23:13

Permalink

काही समजले नाही....

काही समजले नाही.... (अज्ञानी) मुवि ताक : समजावून दिले तर आम्ही नक्कीच समजून घ्यायचा प्रयत्न करू.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 06/11/2017 - 15:39

In reply to काही समजले नाही.... by मुक्त विहारि

Permalink

९ = वय वर्षे ९ असलेले मूल

९ = वय वर्षे ९ असलेले मूल (लेखाच्या शीर्षकात 'चिरंजीव' असल्याने तो मुलगा आहे.) ३७ = वय वर्षे ३७ असलेला/ली पालक.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 06/11/2017 - 19:37

In reply to ९ = वय वर्षे ९ असलेले मूल by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

ओके....

धन्यवाद... तशी आमची आकलन शक्ती काही बाबतीत कमीच.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sat, 06/10/2017 - 23:15

Permalink

वय नऊ च्या मानाने खरेच युअर

वय नऊ च्या मानाने खरेच युअर चिरंजीव रॉक्स! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Sun, 06/11/2017 - 08:36

In reply to वय नऊ च्या मानाने खरेच युअर by एस

Permalink

खरंय. त्याच्याशी कोणीही

खरंय. त्याच्याशी कोणीही कोणताही विषय बोलू शकतो. किंबहुना अगदी लहानपणापासूनच तसं करत राहिल्याने आता हे असे संवाद होऊ लागलेत. शिवाय वाचन प्रचंड आहे. त्यामुळे आकलनही चांगलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sun, 06/11/2017 - 10:31

Permalink

भारीच! कार्ल सेगानवाला प्रसंग

भारीच! कार्ल सेगानवाला प्रसंग जास्त आवडला. चिंचोळ्या पट्टीत विचार न करता समोरची गोष्ट आपल्या इतर ज्ञानाशी पडताळून पाहावीशी वाटणं हे अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे. आणखी लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 06/11/2017 - 11:07

In reply to भारीच! कार्ल सेगानवाला प्रसंग by आदूबाळ

Permalink

+ १

+ १
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sun, 06/11/2017 - 14:57

Permalink

<blockquote>हे सगळं तुला कुठून कळतं रे?</blockquote>

इनिगोय,
हे सगळं तुला कुठून कळतं रे?
ज्ञान ही आत्म्याची सहज प्रवृत्ती आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 06/11/2017 - 15:40

Permalink

मस्तं "बालक-पालक" संवाद !

मस्तं "बालक-पालक" संवाद ! बालक हुशार आहे, आमच्यातर्फे त्याला एक चॉकलेट द्या :)
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sun, 06/11/2017 - 19:27

Permalink

अरे, अज्जन महा'गुरू' या

अरे, अज्जन महा'गुरू' या धाग्यावर आले नाहीत का? ;) बाकी धाग्याबद्दल - 9*9*9*9 = 36 कॉमन 9 आणि 36 प्रश्न फक्त एका वर्षांचा राहिला, त्या एका वर्षात काय काय समजायला हवे त्या 9 वर्षाला याचा विचार महत्वाचा. बाकी, गुगल स्काय वापरले की अजून डीप मध्ये सांगता येईल तुम्हाला (37) त्याला/तिला (9).
  • Log in or register to post comments

Submitted by vikramaditya on Mon, 06/12/2017 - 13:43

In reply to अरे, अज्जन महा'गुरू' या by दशानन

Permalink

Mahaguru

Is busy instigating the author of other thread. He wants the author to provide some details, so he can show his wisdom.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Mon, 06/12/2017 - 13:28

Permalink

हे वाचून फोटो बघायची ऊत्सुकता

हे वाचून फोटो बघायची ऊत्सुकता ताणली!!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 06/12/2017 - 14:04

Permalink

भारीच की राव.

भारीच की राव.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Wed, 06/14/2017 - 11:33

Permalink

मस्त! खरच अलीकडे मुलं हुशार

मस्त! खरच अलीकडे मुलं हुशार झाली आहेत
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com