Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संदीप चित्रे on Mon, 02/23/2009 - 09:33
  • Log in or register to post comments
  • 8194 views

प्रतिक्रिया

Submitted by दशानन on Mon, 02/23/2009 - 09:36

Permalink

भारतीय

भारतीय ऑस्कर विजेते ! अभिनंदन ! * एक गोष्ट विचारतो आहे स्वतःलाच कोणी विदेशी संस्थेने दिलेला पुरस्कार म्हणजेच त्या कलाकाराचे सर्वस्व आहे का ? Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 02/23/2009 - 10:16

In reply to भारतीय by दशानन

Permalink

एक गोष्ट

एक गोष्ट विचारतो आहे स्वतःलाच कोणी विदेशी संस्थेने दिलेला पुरस्कार म्हणजेच त्या कलाकाराचे सर्वस्व आहे का ? निदान संगीताच्या बाबतीत तरी नाही! मुळीच नाही... जिथे ऑस्कर पुरस्कार संपतात तिथे आमचे मदनमोहन साहेब सुरू होतात..! असो, सर्व विजेत्यांचे अभिनंदन.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by हेरंब on Mon, 02/23/2009 - 14:29

In reply to एक गोष्ट by विसोबा खेचर

Permalink

सहमत

तात्या, मदनमोहनसाहेबच का, अनिल विश्वास, दोन्ही बर्मनसाहेब आणि संगीतातले अणि कितीतरी गुरुतुल्य अवतार. पण रेहमानचे हे संगीत उत्कृष्ट अहे असे मला नाही वाटत.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Mon, 02/23/2009 - 15:39

In reply to सहमत by हेरंब

Permalink

पण

पण रेहमानचे हे संगीत उत्कृष्ट अहे असे मला नाही वाटत. सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 02/24/2009 - 08:50

In reply to पण by मराठी_माणूस

Permalink

त्येच्च णा राव

च्यायला ह्या भिकारीकुत्र्यापेक्षा कैक पटींनी भारी म्यूजिक असलेले शिणेमे येऊन गेले .. साधं णामांकण णाही त्यांणा ,,, स्लमडॉगची काहीही लायकी णव्हती पण तिकडच्यांनी इकडे येउण उकिरड्यांचे 'उत्तम' छायाचित्रण केल्याणे तिकडच्यांनी तिकडच्यांनाच दिलेला हा ऑस्कर .. आणि एक तुकडा रेहमान ला .. आजही रोझा चं म्यूझिक स्लमडॉगच्या १०००० पट बरे आहे
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 02/24/2009 - 10:42

In reply to त्येच्च णा राव by टारझन

Permalink

स्लमडॉगची

स्लमडॉगची काहीही लायकी णव्हती पण तिकडच्यांनी इकडे येउण उकिरड्यांचे 'उत्तम' छायाचित्रण केल्याणे तिकडच्यांनी तिकडच्यांनाच दिलेला हा ऑस्कर .. आणि एक तुकडा रेहमान ला .. सहमत आहे...! आपला, (लाचार आणि भिकारी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Mon, 02/23/2009 - 11:09

In reply to भारतीय by दशानन

Permalink

प्रतिक्रिया

रहमान आणि गुलझार , या दोन अशा कलाकारांना, ज्यांच्या कलाकृतींच्या सान्निध्यात माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या अनेक दुपारी , सायंकाळी , वीकेंड्स , तारुण्ये , आयुष्ये व्यतीत झाली त्या दोघांना ऑस्कर मिळाले. यापेक्षा जास्त आनंद अलिकडील काळात केवळ पं भीमसेन जोशींना भारतरत्न मिळाला तेव्हाच झाला होता. एक गोष्ट विचारतो आहे स्वतःलाच कोणी विदेशी संस्थेने दिलेला पुरस्कार म्हणजेच त्या कलाकाराचे सर्वस्व आहे का ? एका विदेशी संस्थेने पुरस्कार दिला किंवा कुठलाही पुरस्कार मिळाला म्हणजेच रहमान आणि गुलझार यांचे "सर्वस्व आहे" (म्हणजे काय नक्की ?) असा उल्लेख मला चित्र्यांच्या या धाग्यात कुठे आढळलेला नाही. त्यामुळे या प्रश्नाचे प्रस्तुत संदर्भातले उद्दिष्टही मला समजले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Mon, 02/23/2009 - 11:16

In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत

Permalink

एक गोष्ट

एक गोष्ट विचारतो आहे स्वतःलाच कोणी विदेशी संस्थेने दिलेला पुरस्कार म्हणजेच त्या कलाकाराचे सर्वस्व आहे का ? हे स्वगत आहे ! Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Mon, 02/23/2009 - 10:11

Permalink

अभिनंदन !!

ऑस्कर विजेत्यांचे अभिनंदन -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक पाचलग on Mon, 02/23/2009 - 10:18

Permalink

बाकी काहीही असो

ए आर रेहमान चे हार्दीक अभिनंदन त्या चित्रपटाने काहीही कारणामुळे का असेना पण ओस्कर मिळवला आणि हो रेहमानची ऑस्कर मिळण्याची इछा पुर्ण झाली या पुरस्काराचे एका भारतीयाचा केलेला पाश्चिमात्य सन्मान इतकेच महत्व राहो एवढीच इछा (स्वगत्-हे मी लिहिले हो पण ते चॅनेल्वाल्यना कोण सांगणार.......) छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments

Submitted by केदार on Mon, 02/23/2009 - 10:28

Permalink

बेष्ट पिक्चर

स्लमडॉग ला बेष्ट पिक्चर ऍवॉर्ड पण. एकंदरीत आता हॉलीवूड्मध्ये थर्डवल्ड कंट्रीजला प्रमोट करणे सुरु झाले. :) मागे अचानक दोन तिन विश्वसुंदर्‍यांचा सलग पुरस्कार मिळाल्यासारखे. पिक्चरचे तयार करणार्‍यांचे अभिनंदन. पण इतका ग्रेट पिक्चर वाटला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on Mon, 02/23/2009 - 16:41

In reply to बेष्ट पिक्चर by केदार

Permalink

एकंदरीत

एकंदरीत आता हॉलीवूड्मध्ये थर्डवल्ड कंट्रीजला प्रमोट करणे सुरु झाले योग्य सारांश (यु सम्ड इट वेल्) सुज्ञास अधिक.....
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 02/23/2009 - 22:36

In reply to बेष्ट पिक्चर by केदार

Permalink

आश्चर्य वाटते तुमचे राव मला

म्हणजे सुश्मिता सेन व ऍश्वर्या रॉय त्या पुरस्कारासाठी पात्र नव्हत्या की काय? वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 02/25/2009 - 03:28

In reply to आश्चर्य वाटते तुमचे राव मला by वेताळ

Permalink

तसे सांगता

तसे सांगता येणे कठीण आहे. पण विश्वसुंदरी स्पर्धेतल्या सुंदर्‍या मला थोड्याबहूत फरकाने सारख्याच वाटतात.(म्हणजे आवडतात) :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 02/24/2009 - 00:03

In reply to बेष्ट पिक्चर by केदार

Permalink

एकंदरीत

एकंदरीत आता हॉलीवूड्मध्ये थर्डवल्ड कंट्रीजला प्रमोट करणे सुरु झाले. सहमत आहे.. साली आपली लाचारी कधी संपायची देव जाणे!
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद घारे on Mon, 02/23/2009 - 10:57

Permalink

जय हो!

स्नमडॉग मिलिऑनेयर सिनेमाला सन २००८ चा सर्वोत्कृष्ष्ट चित्रपट, 'जय हो' हे सर्वोत्कृष्ष्ट गीत, सर्वोत्कृष्ष्ट संगीत वगैरेंसह अनेक ऑस्कर पुरस्कार मिळाले. "यात आपल्याला चांगले वाटण्यासारखे काय आहे?" असा प्रश्न कांही लोक विचारतील. 'आपले' शहर, 'आपला' देश, 'आपला' धर्म वगैरेंची या सिनेमात बदनामी केली आहे, म्हणून त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, त्या लोकांना कोर्टात खेचावे नाही तर रस्त्यातच बदडून काढावे वगैरे प्रक्षोभक भाषणे केली गेली आहेत. यापुढेही होतील. श्री.ए.आर.रेहमान यांना 'आपला' म्हणायचा की 'परका' याबद्दल कांही लोकांच्या मनात संदेह आहे. 'आपल्या'वर प्रेम आणि 'परक्या'चा द्वेष केलाच पाहिजे अशा मनोधारणेतून हे विचार येतात. एकादी गोष्ट स्वतंत्रपणे चांगली किंवा वाईट हे ठरवणे या विचारसरणीत बसत नसावे. ऑस्कर पुरस्काराचा स्वीकार करतांना ए.आर.रेहमान याने आपल्या अत्यंत छोट्या भाषणात सांगितलेले दोन शब्द, (दोन वाक्ये) खूप बोलके आहेत. १. या सिनेमात आशावादाचा गौरव आहं. २. प्रेम आणि द्वेष यामधून कशाचा स्वीकार करायचा हा पर्याय माझ्या आयुष्यात सतत माझ्यापुढे येत राहिला, त्यातून मी नेहमी प्रेमाचा स्वीकार केला. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Mon, 02/23/2009 - 11:07

Permalink

अभिनंदन

विजेत्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on Mon, 02/23/2009 - 11:29

Permalink

हार्दिक अभिनंदन!

ऑस्कर पुरस्काराबद्दल ए.आर.रेहमान आणि गुलजार साहेबांचे अभिनंदन! स्माइल पिंकी या लघुपटाला सुद्धा ऑस्कर मिळाले आहे. या लघुपटाचे फील्ड प्रोड्यूसर्स नंदिनी राजवाडे आणि गिरीश ठाकूर यांचेही अभिनंदन !
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक पाचलग on Mon, 02/23/2009 - 11:42

In reply to हार्दिक अभिनंदन! by ढ

Permalink

+१

हेच म्हणतो नाहीतर तो स्माइल पिंकी हरवुन जायचा कोठेतरी टी व्ही वर पण काही बोलत नाही आहेत त्याविषयी . मलासुद्धा आता रेडीओ मिरचीवर ऐकल्यावर समजले छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments

Submitted by मिथिला on Mon, 02/23/2009 - 12:06

Permalink

ए.आर्.रहमान

ए.आर्.रहमान चे अभिनंदन!! सगळीकडे अगदी जय हो चाललेय. पण जरा विचार केला तर हे त्याच्या करियर्अचे बेस्ट संगीत आहे का? मला नाही वाटत. पण त्याचे टॅलेंट बघीतले तर he deserves it.
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Mon, 02/23/2009 - 12:38

Permalink

स्व. मदन मोहन

जिथे ऑस्कर पुरस्कार संपतात तिथे आमचे मदनमोहन साहेब सुरू होतात..! तात्या म्हणतात ते अगदी खरं ! थोडे अवांतर : आणि मदनमोहन साहेबांची बहुतेक सर्वच गाणी फारच उच्च दर्जाची होती आणि फिल्म फेअर अवार्ड मिळण्याच्याही लायकीची होती, पण दुर्दॅवाने फक्त "माई रे, मै कासे कहू प्रीत . . . ." चित्रपट : दस्तक - ह्या एकाच गाण्याला मिळालं. परंतु त्याची खंत न बाळगता साहेब उत्तमोत्तम गाणी कायम देत राहिले. असो विजेत्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by खडूस on Mon, 02/23/2009 - 20:48

In reply to स्व. मदन मोहन by दत्ता काळे

Permalink

माझ्या

माझ्या माहितीप्रमाणे दस्तक साठी मदनमोहन यांना National Film Award मिळाले होते and not filmfare award - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Mon, 02/23/2009 - 13:55

Permalink

खुदा का शायद दुसरा नाम है मासुमीयत !

रेहमान च्या संगीतात मासुमीयत (sorry मराठीत काय म्हणतात आठवत नाही ...) झळकते .... This is not his best performance but one of the Best !! त्याचे रोझा चे संगीत तर कधीच विसरु शकत नाही...स्पेशली दिल हैं छोटासा ... चीन्न चीन्न आसय...सिरगळीक मासय ! (तामिल) बाकी भारतीय संगीता समोर तर सारा आसमान झुक गया तर Oscar हे फिकेच त्याने वंदना दिली तर काय नवल ?? ~ वाहीदा ( I would love to put रेहमान as surname ..Sorry Abbu )
  • Log in or register to post comments

Submitted by कालिन्दि मुधोळ्कर on Mon, 02/23/2009 - 14:42

In reply to खुदा का शायद दुसरा नाम है मासुमीयत ! by वाहीदा

Permalink

वाहीदा

वाहीदा रेहमान! इतकं सुंदर नाव असल्यावर मग काय!! >>Oscar हे फिकेच त्याने वंदना दिली तर काय नवल ?? अगदी बरोबर.
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Mon, 02/23/2009 - 15:32

Permalink

जय हो! असेच म्हणतो...

पुरस्कार देशी असो वा विदेशी... पुरस्कार हा पुरस्कारच असतो... पण ज्या दिवशी १००% भारतीय चित्रपटाला पुरस्कार मिळेन तो दिवस नक्कीच सोनियाचा असेन ... पण सध्यातरी सुरुवात झाली आहे असे गृहीत धरायला हरकत नाही.... रहमान व गुलजार यांच्याबरोबरच स्लमडॉग कंपूतील रसूल आणि डॉक्युमेंटरी ' स्माईल पिंकी' च्या भारतीय कलाकारांचेही अभिनंदन.... जय हो! असेच म्हणतो...
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 02/23/2009 - 22:07

Permalink

अभिनंदन..

रेहमान्-गुलझार तसेच नंदिनी राजवाडे आणि गिरिश ठाकूर यांचेही.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 02/23/2009 - 22:32

Permalink

जय हो.........जय हो......

कुणी निंदा कुणी वंदा... आमच्या संगीतातल्या देवाला मिळाला आज खरा बंदा... जय हो......जय हो... वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by गोगलगाय on Tue, 02/24/2009 - 06:34

Permalink

हा खेळ बाहुल्यांचा..

म्हणजे गुलजार आणी सुखवींदर कटाप आता..जय हो..मारा टिचकी खाली.. टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 02/24/2009 - 08:22

Permalink

आता हा

आता हा चित्रपट सरकार करमुक्त करत आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4179575.cms. (बाहेरच्यांच्या प्रशस्तीपत्रकाची आपण वाट पहात होतो तर, आपल्या नेहमिच्या 'करमुक्त' करण्याच्या कसोटीला ते उतरतो की नाही ते पहण्याची आता गरज नाही. कोणी काही तक्रार केली तरी 'ऑस्कर' हे नाव तोंडावर फेकता येईल)
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Tue, 02/24/2009 - 08:38

In reply to आता हा by मराठी_माणूस

Permalink

याच्याइतक

याच्याइतका मूर्खपणा दुसरा नाही. ज्या चित्रपटाने आधीच सगळा पैसा कमावलाय असा विदेशी चित्रपट 'ऑस्कर' मिळाले म्हणून करमुक्त... मग दरवर्षीच का नाही करत हे? आणि आपली, भारतीय शॉर्ट डॉक्यु 'स्माइल पिंकी' जिने हे बक्षीस मिळवलंय त्यांना काय देणार? १०००० रूपयाचे बक्षिस देतील फारतर... शॉर्ट डॉक्यु विभागात आपली फिल्म नॉमिनेट होणे, विजेती होणे हे नवीन नाहीये आता पण अजूनही यातली एकही फिल्म सामान्य माणसांपर्यंत पोचत नाही. त्याची काही व्यवस्था करा या निमित्ताने. पण एवढं कोण विचार करणार... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Tue, 02/24/2009 - 10:47

In reply to याच्याइतक by नीधप

Permalink

सहमत!!!

आणि आपली, भारतीय शॉर्ट डॉक्यु 'स्माइल पिंकी' जिने हे बक्षीस मिळवलंय त्यांना काय देणार? १०००० रूपयाचे बक्षिस देतील फारतर... शॉर्ट डॉक्यु विभागात आपली फिल्म नॉमिनेट होणे, विजेती होणे हे नवीन नाहीये आता पण अजूनही यातली एकही फिल्म सामान्य माणसांपर्यंत पोचत नाही. त्याची काही व्यवस्था करा या निमित्ताने. पण एवढं कोण विचार करणार...
१०१% सहमत -- ह्या फिल्म बघायलाच मिळत नाही कुठे! :(
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Wed, 02/25/2009 - 11:50

In reply to सहमत!!! by मनिष

Permalink

सहमत!

पूर्वी दूरदर्शन वर आठवड्यातून एकदा रात्री उत्तमोत्तम डॉक्युमेंटरी किंवा शॉर्ट फिल्मस लागत होत्या... आता टी आर पी कमी पडत असावा.. नी - तुम्ही या क्षेत्रात आहात. इथे काय नक्की प्रॉब्लेम आहे लिहाल का? डॉक्युमेंटरी किंवा शॉर्ट फिल्मस या इतक्या पडद्याआड का गेल्या आहेत किंवा फक्त कोर्स चा भाग यापुरत्याच का राहिल्या आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Wed, 02/25/2009 - 13:27

In reply to सहमत! by मैत्र

Permalink

टेलिव्हिज

टेलिव्हिजनच्या संदर्भात टि आर पी चा प्रश्न निश्चितच आहे. एक्झिबिटर्स थिएटरमधे डॉक्यु किंवा शॉर्टस लावत नाहीत कारण कलेक्शन नसतं. प्रेक्षकांनाही हे असं काही बघायची सवय नाही. त्यामुळे तिकीट काढून डॉक्यु किंवा शॉर्टस बघायला जाणार नाहीत. डॉक्यु आणि शॉर्ट फिल्ममेकर्स जे आहेत त्यातले अर्धे लोक हे कमिशन्ड म्हणजे कुणासाठी तरी (एखादी एन जी ओ, एखादी संस्था, एखादी कंपनी इत्यादी) डॉक्यु बनवतात. त्या अश्या प्रदर्शित केल्या जातातच असं नाही. उरलेले अर्धे फिल्ममेकर्स जे खरोखरीचं फिल्ममेकींग म्हणून डॉक्यु वा शॉर्टस बनवतात त्यांची पैशाची आणि एकुणात इतरही ताकद इतकी कमी असते की वितरक आणि एक्झिबिटर्स वर त्यांचं काहीच वजन पडू शकत नाही. सरकार एकुणातच चित्रपट उद्योगाच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने क्रियाशील आहे त्यामुळे तिथून काही मदत मिळणे शक्य नाही. तस्मात डॉक्यु, शॉर्टस ह्या गोष्टी केवळ डिस्कव्हरी सारखे चॅनेल्स, निरनिराळे फिल्म फेस्टीव्हल्स आणि प्रायव्हेट सर्क्युलेशन एवढ्यापुरत्याच मर्यादीत रहातात. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Wed, 02/25/2009 - 10:53

Permalink

काही वाईट नाही

त्याचा मूळ कथानकाशी फारकत घेणं आणि गरजेपेक्षा जास्त बटबटीत करणं हे सोडलं तर काय वाईट आहे? ट्रॅफिक सिग्नल सारखे चित्रपट चांगले आणि तेच बाहेर कोणी यु के हॉलीवूड वाल्याने केलं तर वाईट - का तर त्यांना वाईट तेच दिसतं. हे नक्की खरं की सगळंच असं दारिद्र्य नसेल आपल्या देशात. सुसंस्कृत आणि समृद्ध देश आहे. पण जे दाखवलं आहे ती वस्तुस्थितीच आहे ना? कोणी एक कथानक घेतलं आहे आणि एक चित्रपट बनवला तर काय वाईट? हाच हिंदी मध्ये चांगल्या पद्धतीने केला तर कौतुक झालं असतं ना? हे म्हणतानाही यातला पाश्चात्यवाद मी नाकारत नाही. सकाळ मध्ये नीती बडवे यांचा लेख वाचला आणि चांगलाही वाटला. दोन्ही बाजूंचा विचार व्हावा असं वाटतं. दुसरी बाजू रेहमान ची. सर्वस्वाचा काय प्रश्न येतो? जर असं असेल तर राष्ट्रीय पुरस्कार ही बंद करावेत. अकॅडमी अवॉर्डस हे या क्षेत्रातले सर्वात मानाचे समजले जातात. भारतीय कलाकारांचा / तंत्रज्ञांचा खुल्या कॅटॅगरी मधल्या इंग्रजी चित्रपटात सहभाग फारसा नव्हता त्यामुळे नसतील मिळाले हे आत्तापर्यंत. बस. आणि प्रत्येक पुरस्कार हे त्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट कामासाठी असतात. त्या कलाकाराच्या कारकीर्दितल्या सर्वोत्तम कामगिरी साठी नव्हे. मग जय हो पेक्षा रेहमान किंवा गुलजार साहेबांची शंभर चांगली हिंदी / तमीळ गाणी चांगली असतील पण त्याचा इथे काहीही संबंध नाही. या वर्षी त्यांचं काम चांगलं होतं बस्स. दोन निर्विवाद गुणवंतांचं जागतिक पातळीवर सर्वोच्च पुरस्काराने कौतुक झालं याचं दु:ख कसलं? आणि यात लाचारी किंवा भिकारडे पणा कसला? असो... या पेक्षा एफ टी आय आय मधल्या पोकुट्टीचं कौतुक आणि अभिनंदन करा. ते तर स्वतःचं यश आहे! का तिथेही लाचारी दिसतेय? अवांतरः या समारंभात आणि मुलाखतींमध्ये अनिल कपूर उगाचच फारच खूश वाटला. राम लखनच्या काळात तो असा उगाच हसत फिरायचा तसा :)
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Wed, 02/25/2009 - 11:02

In reply to काही वाईट नाही by मैत्र

Permalink

प्रतिसाद आवडला...

प्रतिसाद खूप आवडला आणि मी जवळजवळ सगळ्याच बाबींशी सहमत आहे! त्यामुळे +१०००
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 02/25/2009 - 11:25

In reply to काही वाईट नाही by मैत्र

Permalink

+१

सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Wed, 02/25/2009 - 11:28

In reply to काही वाईट नाही by मैत्र

Permalink

उत्तम प्रतिसाद !

>>ट्रॅफिक सिग्नल सारखे चित्रपट चांगले आणि तेच बाहेर कोणी यु के हॉलीवूड वाल्याने केलं तर वाईट - का तर त्यांना वाईट तेच दिसतं. हे नक्की खरं की सगळंच असं दारिद्र्य नसेल आपल्या देशात. सुसंस्कृत आणि समृद्ध देश आहे. पण जे दाखवलं आहे ती वस्तुस्थितीच आहे ना? कोणी एक कथानक घेतलं आहे आणि एक चित्रपट बनवला तर काय वाईट? हाच हिंदी मध्ये चांगल्या पद्धतीने केला तर कौतुक झालं असतं ना? सहमत !! >>अवांतरः या समारंभात आणि मुलाखतींमध्ये अनिल कपूर उगाचच फारच खूश वाटला. राम लखनच्या काळात तो असा उगाच हसत फिरायचा तसा अन अनिल कपूर बध्द्ल बोलायचे झाले तर ... त्याच्या मुलीचा Delhi 6 पण खुप चर्चेत आहे ... म्हणजे... ५ उंगलि यां घी में और उसका सर (बहुतेक) कढाई में ..असेल :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Wed, 02/25/2009 - 11:35

In reply to काही वाईट नाही by मैत्र

Permalink

>>ट्रॅफिक

>>ट्रॅफिक सिग्नल सारखे चित्रपट चांगले<< उत्तम विनोद. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Wed, 02/25/2009 - 11:47

In reply to >>ट्रॅफिक by नीधप

Permalink

डिसक्लेमरः असं माझं वैयक्तिक मत नाही...

त्या स्वरुपाच्या समांतर चित्रपटांबद्दल जे मत असतं ते लिहिलं आहे. ट्रॅफिक सिग्नल हे एक उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Wed, 02/25/2009 - 13:06

In reply to डिसक्लेमरः असं माझं वैयक्तिक मत नाही... by मैत्र

Permalink

कल्पना

कल्पना आहे. उदाहरण म्हणून पण विनोद वाटला. असो! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 02/25/2009 - 10:55

Permalink

अकॅडमी

अकॅडमी अवॉर्डस हे या क्षेत्रातले सर्वात मानाचे समजले जातात. हे कोणी ठरवले ?
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Wed, 02/25/2009 - 11:09

In reply to अकॅडमी by मराठी_माणूस

Permalink

तुम्ही ठरवा !

इंग्रजी मधल्या अमेरिकन किंवा ब्रिटीश चित्रपटांसाठी कुठले अवॉर्डस जास्त मानाचे ते तुम्ही ठरवा... http://en.wikipedia.org/wiki/Academy_Award १९२९ पासून हे दिले जातात. जर हे बरोबर वाटत नसेल तर हॉलीवूड मधल्या लोकांसाठी जास्त मानाचे किंवा मोठे पुरस्कार कुठले ते ठरवा आणि समस्त हॉलीवूड तारे तारका दिग्दर्शक निर्माते तंत्रज्ञ यांना सांगा की तुम्हाला अकॅडमी अवॉर्डस महत्त्वाचे वाटत असतील पण ते बरोबर नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 02/25/2009 - 11:38

In reply to तुम्ही ठरवा ! by मैत्र

Permalink

त्यांच्या

त्यांच्या साठी असतील , आपल्यासाठी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Wed, 02/25/2009 - 11:44

In reply to त्यांच्या by मराठी_माणूस

Permalink

बरोबर आहे

हे बरोबर की अकॅडमी हॉलीवूड साठी महत्त्वाचा आपल्यासाठी नाही. पण हा पुरस्कार एका ब्रिटिश इंग्रजी चित्रपटासाठी आहे. मग त्या कॅटॅगरी मध्ये आपल्या साठी महत्त्वाचा पुरस्कार कुठला आहे ते सांगाल का? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लगान, स्वदेस, श्वास, तारें जमीं पर यांना ऑस्कर मिळण्याची आस धरणे आणि त्यासाठी आटापिटा करणे हे तितकंसं बरोबर नाही. कारण ते त्यांच्या यशाचं किंवा दर्जाचं द्योतक असेलच असं नाही. स्लमडॉग चा गट मात्र नक्कीच वेगळा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 02/25/2009 - 12:42

Permalink

स्लमडॉग चा

स्लमडॉग चा गट मात्र नक्कीच वेगळा आहे. तो कोणता ?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com