आपलेच दात आणि...
एक विचित्र विषय आणि समस्या मांडत आहे, माझ्या बोलण्याचा कृपया कुणीही विपर्यास करून घेऊ नये कारण हा धागा मी तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी अजिबात काढलेला नाही तर कोणाला असे अनुभवले असतील तर त्यांनी अश्या प्रसंगी काय केले हे जाणून घेणे हा एकच या धाग्याचा हेतू.
समस्या अशी आहे कि माझा एक मित्र आहे ज्याने तीन वर्षांपूर्वी लग्न केलं. तो मुंबईच्या एका उपनगरात राहात होता एका चाळीतली वन रूम किचन खोली होती ती काही दिवसांनी त्याची आई त्यांच्याकडे राहायला आली आणि तिचं विक्षिप्त वागणं सुरु झालं. हे नवदाम्पत्य दिवसभर कामानिमित्त बाहेर असायचं अमी आईसाहेब घरी दिवसभर मस्त झोप घ्यायच्या. पण समस्या त्यांच्या झोपण्याची नाहीये, ती आहे रात्रीच्या जगण्याची. आईसाहेब रात्रभर झोपत नव्हत्या. आणि सतत काहीतरी धडपड करत असायच्या. उद्देश एकच- या दोघांना एकत्र येऊ न देणे. आधी या दोघांना काही कळले नाही पण हे प्रकरण चालूच राहिले जेव्हा त्याने चाळीतली खोली सोडून एक वन बेड रूम किचन वाला फ्लॅट भाड्याने घेतला. आता आईसाहेबांची अस्वस्थता वाढली होती कारण घर चाळीच्या मानाने मोठे असल्याने त्यांची उपद्रवक्षमता कमी झाली. पण हार मनातील त्या आईसाहेब कसल्या, त्यांनी उपद्व्याप तीव्र केले जसे कि, रात्री पुन्हा पुन्हा पाणी पिण्यासाठी उठणे, वारंवार लघुशंकेला जाणे, उगीचच मित्राला हाक मारणे, किचनमधली भांडी पाडणे आणि अजून काहीबाही... बरं आईला हे सगळं आवरतं घ्यायला कसं सांगायचं म्हणत दोघे नवरा बायको मूग गिळून गप्प.
एवढं सगळं करूनही आईसाहेबांच्या कानांवर अचानक एक दिवशी बातमी धडकली कि सुनबाई गरोदर आहे. आणि आभाळ कोसळलं. आईसाहेबांना आपल्या कर्तृत्वावर एवढा विश्वास की हे गरोदरपण आपल्या मुलाबरोबरच्या मिलनाने झालं असेल हे मान्य करायला त्या तयार नाहीत. आणि त्यांनी सुंबाईच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली. चक्क बिल्डिंगच्या बाहेर येऊन तमाशे केले. आता तिच्या सुनबाईला डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितलंय आणि आईसाहेबांनी घरकामाला असहकार सुरु केलाय, त्याहून महत्वाचे कि ती कधी सुनबाईंवर हात उचलेल ते सांगता येत नाही. दिवसभर हि जीव मुठीत घेऊन राहते. या समस्येवर आता काय करावे या चिंतेने आम्हाला ग्रासले आहे कारण आईसाहेब हार मानायला तयार नाहीत.
आता तुम्ही म्हणाल कि एखाद्या व्यक्तीचं वागणं असं असू शकते पण खरी मेख पुढे आहे,
आताच एका ओळखीच्या मुलाचे लग्न झाले आणि त्याची बायको माझ्या बायकोची जिवलग मैत्रीण आहे. आणि लग्नानंतर तिच्या सासूच्या वागण्यात तोच विक्षिप्तपणा यायला लागलाय. त्याच्या घरी देखील 'रात्रीस खेळ चाले' अशी परिस्थिती.
आता या दोन्ही प्रकरणात खालील बाबी तंतोतंत जुळतात:
प्रेम विवाह.
प्रेमविवाहाला घरून झालेला विरोध.
दोघांच्या आईचे वैधव्य.
दोघीही सुना तोंड दाबून बुक्यांचा मर दिला तरी गुपचूप सहन करतील अश्या आहेत(अजून तरी).
आणि आई कशीही वागली तरी दोघेही मित्र त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाहीत. तेच त्यांचे आधार आहेत.
हा धागा काहींना मनोरंजक वाटेल कदाचित(काही अंशी आहे ही) पण ही दोन्ही प्रकरणे गंभीरही आहेत कारण दिवसभर दोन्ही सुना त्यांच्या सासवांच्या हवाली असतात.
या अश्या वागण्यामागे नक्की काय कारण असावे आणि यावर काय उपाय करता येऊ शकतात याची जर कोणा जाणकाराला माहिती असेल तर कृपया कळवावी.
याद्या
12490
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
मी जे लिहितोय ते गमतीने नाही,
तेच तर होऊ देत नाहीत ना.
In reply to मी जे लिहितोय ते गमतीने नाही, by शैलेन्द्र
पूर्वीच्या चाळीतल्या घरात,
In reply to तेच तर होऊ देत नाहीत ना. by इरसाल कार्टं
हा हा हा...
In reply to पूर्वीच्या चाळीतल्या घरात, by शैलेन्द्र
आहे खरी विचित्र परिस्थिती !
अत्यन्त विचित्र असतात अशी लोक
In reply to आहे खरी विचित्र परिस्थिती ! by माम्लेदारचा पन्खा
आईकडचे नातेवाईक अस्तील तर त्यांना मध्यस्थी करायला सांगून
+111
In reply to आईकडचे नातेवाईक अस्तील तर त्यांना मध्यस्थी करायला सांगून by दुर्गविहारी
खरं बोललात.
In reply to आईकडचे नातेवाईक अस्तील तर त्यांना मध्यस्थी करायला सांगून by दुर्गविहारी
आमच्या एका बहिणीची कथा अशीच
आईला न सांगता तीचं नांव ताबडतोप मॅट्रीमनीला नोंदवा !
हा
In reply to आईला न सांगता तीचं नांव ताबडतोप मॅट्रीमनीला नोंदवा ! by संजय क्षीरसागर
हा पर्याय एका झटक्यात सर्व प्रश्न सोडवणारा
In reply to हा by प्रसाद_१९८२
पर्याय आवडला
In reply to आईला न सांगता तीचं नांव ताबडतोप मॅट्रीमनीला नोंदवा ! by संजय क्षीरसागर
पर्याय आवडला
In reply to आईला न सांगता तीचं नांव ताबडतोप मॅट्रीमनीला नोंदवा ! by संजय क्षीरसागर
इका, धन्यवाद !
In reply to पर्याय आवडला by इरसाल कार्टं
प्रयत्न करतो.
In reply to इका, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
दरम्यानच्या काळात आईश्रींना भक्तीमार्गाचा नाद लावा !
In reply to प्रयत्न करतो. by इरसाल कार्टं
हे जरा कठिणाय...
In reply to दरम्यानच्या काळात आईश्रींना भक्तीमार्गाचा नाद लावा ! by संजय क्षीरसागर
ठीके !
In reply to हे जरा कठिणाय... by इरसाल कार्टं
हा हा हा
In reply to ठीके ! by संजय क्षीरसागर
संक्षिंचे सर्व प्रतिसाद आवडले.
आयला...अश्या पण आया जगात आहेत
ज्वाला मातृ-मोहिनी' विवाह संस्था
साहेब, पण एक-दोन खोल्यांच्या
In reply to ज्वाला मातृ-मोहिनी' विवाह संस्था by चित्रगुप्त
चित्रगुप्तजी, आभार्स !
In reply to ज्वाला मातृ-मोहिनी' विवाह संस्था by चित्रगुप्त
चिरयौवना-युवक- मिलन- मंडळहे नांव सुचवतो. आणि एक स्टेप पुढे जाऊन इकाच्या मित्रानंच हे मॅट्रीमनी पोर्टल चालू करावं जेणे करुन घटना फास्ट घडतील.क्या बात हैं!! जबरदस्त नाव..
In reply to चित्रगुप्तजी, आभार्स ! by संजय क्षीरसागर
चिजो,
In reply to क्या बात हैं!! जबरदस्त नाव.. by चिनार
ज्या सुनबाई गरोदर असतील
उपायात त्रुटी दिसतात !
In reply to ज्या सुनबाई गरोदर असतील by कुटस्थ
ज्या सुनबाई गरोदर असतील त्यांनी सरळ नवऱ्याशी बोलून तिच्या आईकडे जावेमित्राची गैरसोय होईल त्याचं काय ? २)जर सासूबाईंचा रात्री त्रास होत असल्यास चक्क झोपेची गोळी द्यावी काही दिवस आणि कार्यभाग साधावा.सासूबाईंना डाव कळला आणि त्यांनी सूनबाईंनाच पाण्यात विरघळवून गुपचूप गोळ्या दिल्या तर कार्यभागाचं काय ? ३)सासूबाईंच्या नकळत दुसऱ्या गावी जाऊन हनिमून चे बुकिंग करावेपुत्रप्रेमाखातर अचानक आईश्री तिथे दत्त म्हणून हजर झाल्या तर त्यांची सोय तिथेच एक्स्ट्रा बेड लावून करावी लागेल ना ! ४)सासूबाईना किंवा सासूबाईंच्या समवयस्क मैत्रिणींना गळ टाकावीमैत्री घनिष्ठ होऊन सासूबाईंच्या मैत्रिणीपण रात्री मुक्कामाला येवू लागल्या तर काय करणार ? ५)सासूबाईंना एखादा छंद आहे का ते पाहावे आणि दिवसा तो छंद जोपासण्यास उदयुक्त करावे.सासूबाईंचा छंद तुमच्या लक्षात आला नाही काय ? तोच तर त्या जोपासतायंत ! ६)सासूबाईंशी सरळ सरळ या विषयावर बोलावे आणि गरज भासल्यास तंबी देखील द्यावी.हा उपाय योग्य आहे पण अंमलबजावणीस अशक्य दिसतो. मी आधी चुकून तांबी वाचले त्याबद्दल क्षमस्व !यु आर ग्रेट संक्षी
In reply to उपायात त्रुटी दिसतात ! by संजय क्षीरसागर
जिथे राहत असतील तिथे
In reply to ज्या सुनबाई गरोदर असतील by कुटस्थ
जेलसी
संक्षी,
ज्योक होता हो !
In reply to संक्षी, by कुटस्थ
अगदी अगदी
In reply to ज्योक होता हो ! by संजय क्षीरसागर
तुमच्या मुद्द्यांचा विचार मी खरोखर करत आहे,
In reply to संक्षी, by कुटस्थ
लग्न झाल्यावर सुधारेल
हो ना, रोज उगी "कसला नवरा
In reply to लग्न झाल्यावर सुधारेल by गामा पैलवान
हो ना..आणि परत ते डोपामाईन का
In reply to हो ना, रोज उगी "कसला नवरा by अभ्या..
सासूचं नवीन लग्न लावून दिलं
In reply to लग्न झाल्यावर सुधारेल by गामा पैलवान
कहर...
In reply to सासूचं नवीन लग्न लावून दिलं by श्रीगुरुजी
सगळ्या प्रतिसादांना एकत्र उत्तर देतो !
सासूबाईंची कटकट नव्या नवऱ्याच्या गळ्यात मारली तर जाणार नाही ना?२)"कसला नवरा बघून दिला मला"गामाश्री, फ्रॉईडच्या मते बहुतेक सर्व प्रॉब्लम्सचं मूळ अतृप्त कामेच्छेत आहे. नवा नवरा उत्साही असल्याखेरीज मॅट्रीमनीला डाव लावणार नाही. थोडक्यात, दोघंही (या वयात) एकमेकांना `चालवून' घेणारे असणार. किचन आणि बेडरुम हे दोन मुख्य प्रश्न सुटले की बाकीचे आपसूक सुटतील. तस्मात, तुम्हाला वाटतंय तसं होण्याची शक्यता फार कमी. ३)आणि परत ते डोपामाईन का काय असते त्याच सेक्रेशन नाही झालं तर काय करायचं??कामेच्छा हा `सर्व संप्रेरक' आहे ! वैवाहिक जीवनात `डोपामाईन' हे उगीच काही तरी कारण पुढे करायचं म्हणून सांगितली जाणारी गोष्ट आहे. ४)सासूचं नवीन लग्न लावून दिलं आणि तिची नवीन सासू हिच्या नवीन संसारात हिच्यासारखंच वागायला लागली तर?पन्नाशी उलटलेल्या माणसाची आई असेल किंवा नाही हा पहिला प्रश्न. बरं असली तरी तिला त्या वयात `असला' प्रश्न असायची शक्यता अती धूसर. त्यातून ही तिची त्रास देण्याची क्षमता ती किती असणार ?सुनबाई फारच आशा काळे, अलका
आणि एक, हे व्हॉट्सपवर सकाळी
In reply to सुनबाई फारच आशा काळे, अलका by सूड
+१११११११ अत्यंत योग्य
In reply to आणि एक, हे व्हॉट्सपवर सकाळी by सूड
मुळात समस्या पुरुषप्रधान
समस्येच्या मुळाशीच पोचलात
In reply to मुळात समस्या पुरुषप्रधान by सच्चिदानंद
समस्येच्या मुळाशीच पोचलात
In reply to समस्येच्या मुळाशीच पोचलात by सतिश गावडे
मातृसत्ताक प्रकारात स्वतःच्या
In reply to मुळात समस्या पुरुषप्रधान by सच्चिदानंद
मातृसत्ताक प्रकारात स्वतःच्या
In reply to मातृसत्ताक प्रकारात स्वतःच्या by चिनार
सदाश्री !
In reply to मातृसत्ताक प्रकारात स्वतःच्या by सच्चिदानंद
:O
कठीण परिस्थिती आहे खरी. मुलगा
मी जाती बाहेर प्रेम विवाह
स्वतः माझंही असंच आहे
In reply to मी जाती बाहेर प्रेम विवाह by दशानन